नासदीय सूक्त

नासदीय सूक्त (ऋग्वेद, मंडल १०,सुक्त १२९) हे ऋग्वेदातील दहाव्या मंडलातील १२९ वे सूक्त आहे.

‘नासदासीन्नो सदासीत्तदानीं’ या सुरुवातीच्या ओळीवरून ते नासदीय सूक्त म्हणून ओळखले जाते. विश्वाच्या उत्पत्तीचे हे मानवी इतिहासातील सर्वात प्राचीन अनुमान आहे. यात एकूण सात ऋचा आहेत. या सूक्ताची रचना त्रिष्टुप् या छंदात असून देवता हे भाववृत्त आहे. यामध्ये विश्वाच्या निर्मितीचे श्रेय परमेश्वराला दिलेले नसून, सर्व देव हे उत्पत्तीच्या नंतर आले आहेत, असे मत मांडले आहे. या सूक्तात विश्वाच्या उत्पत्तीविषयी शंका व्यक्त केल्या आहेत तसेच त्यांची उत्तरे बरोबर आहेत की नाहीत अशाही शंका आहेत. एकमेवाद्वीतीय ब्रह्मामध्ये सर्वप्रथम ‘काम’ म्हणजे इच्छा निर्माण झाल्याने विश्वाचा जन्म झाला आणि पुढे सृष्टी वाढत गेली असा विचार यात मांडला आहे.

हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतर  ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा · छंद
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
महाकाव्य
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत

शंकराचार्य तसेच मध्वाचार्य यांनी याचा अर्थ उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच यावर सायण या विजयनगर साम्राज्यातील विचारवंताने, तेराव्या शतकात रचलेली टीका 'सायणाचे भाष्य' या नावाने उपलब्ध आहे. या नासदीय सूक्ताचे लोकमान्य टिळक यांनी गद्य भाषांतर केले होते. हिंदी रूपांतर प्रा. वसंत देव यांनी केले आहे. ते भारत एक खोज या दूरदर्शन मालिकेत शीर्षकगीत म्हणून वापरले गेले होते. या सूक्ताचा उल्लेख प्रसिद्ध नासाचे वैज्ञानिक कार्ल सेगन यांनी त्यांच्या कॉसमॉस ह्या पुस्तकात केला आहे.

सिद्धान्त

मानवी इतिहासात जगदुत्पत्तीसंबंधी जे अनेक सिद्धान्त किंवा तर्क मांडले गेले आहेत त्यातील नासदीय सूक्त हा सर्वात प्राचीन सिद्धान्त असावा. जगदुत्पत्तीच्या अंगाने प्रश्न निर्माण करून त्यासंबंधी काही तर्कसिद्धान्त मांडले आहेत. या सूक्तामधली कल्पनाशक्ती व अज्ञाताचा शोध घेऊ पाहणारी रचनाकर्त्यांची प्रतिभा यासाठी हे सूक्त नावाजलेले आहे. यातील अनेक सूक्तांचे कवी (ऋषी) वेगवेगळे होते असे मानले जाते. काही ठिकाणी प्रजापतिपुत्र परमेष्ठी असा ऋषीचा उल्लेख आहे.

सूक्ताचे उदाहरण (पहिली द्विपदी/ ऋचा):

नास॑दासी॒न्नो सदा॑सीत्त॒दानीं॒ नासी॒द्रजो॒नो व्यो॑मा प॒रो यत् । किमाव॑रीवः॒ कुह॒ कस्य॒ शर्म॒न्नम्भः॒ किमा॑सी॒द्गह॑नं गभी॒रम् ॥ १ ॥ 

मराठी रूपांतरण

तेव्हाना सत्य होते,ना असत्य होते.  वायूही नव्हता आणि त्याच्यावर आकाशही नव्हते. तसेच रात्र आणि दिवसांचे प्रकटणे नव्हते.  सर्वत्र निर्वात पोकळी होती. त्याशिवाय तेथे काहीच नव्हते. 

नासदीय सूक्ताचे श्री धनंजय यांनी केलेले समश्लोकी भाषांतर उपक्रम या संकेतस्थळावर आहे, ते असे :-

तेव्हाना असणेना नसणे होते,
धूळही नव्हती,ना आकाश पल्याड
कुठे, काय आश्रय, काय आवरण होते?
होते का पाणी गहन आणि गाढ? ||१|

ना होता मृत्यू,ना अमृतत्त्व तेव्हा
रात्री-दिवसांचे प्रकटणे नव्हते
निर्वाताने एका स्वतःला आणले जेव्हा,
आणिक नव्हते नाही, काहीच नव्हते. ||२||

अंधार होता, अप्रकट पाणीच पाणी
अंधाराने होते ते सगळे लपवले -
हे पोकळ झाकलेले, न-झालेले... आणि
त्यात तपातून एक महान उपजले ||३|

पुढे उद्भवला प्रथम तो काम
काम म्हणजे काय तर रेत मनाचे
मनीषेने हृदयात कवींना ये ठाव -
कळे नसण्याशी नाते असण्याचे ||४||

ओढलेले आडवे किरण... यांपैकी
काय होते खालीनी काय बरे वर?
महिमान होते, होते रेतधारी,
स्वयंसिद्ध येथे, प्रयत्न तेथवर ||५||

कोण बरे जाणतो, कोण सांगतो बोलून
कुठून उद्भवली, ही झाली कुठून?
देवही त्यापुढचे, झाले हे होऊन
कोण मग जाणतो, ही झाली कुठून? ||६||

उद्भवले हे होते होय ज्याच्यापासून धारण याला करतो, का नाहीच मुळी धरत? बघणारा जो आहे परम आकाशातून, तो हे जाणतोच - की नाही तोही जाणत? ।।७।।

पुस्तके

  • नासदीय सूक्त भाष्य. लेखक - शंकर रामचंद्र राजवाडे, प्रकाशन वर्ष १९५५.

बाह्य दुवे

Tags:

ऋग्वेदवृत्त

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लक्ष्मीकांत बेर्डेसंशोधनमहाराष्ट्रातील खासदारांची यादीभारूडमेरी क्युरीकडुलिंबमराठी भाषेमधील वृत्तपत्रेराहुल गांधीशब्दयोगी अव्ययमराठी व्याकरणगोवामुंबई उच्च न्यायालयराजकारणमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रनाटकभारतीय लष्करवासुदेव बळवंत फडकेसुषमा अंधारेखासदाररतिचित्रणसमाज माध्यमेजेजुरीहळदी कुंकूइंदिरा गांधीॐ नमः शिवायबृहन्मुंबई महानगरपालिकाराशीगरुडत्रिकोणमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमेंढीसरोजिनी नायडूगुढीपाडवावि.वा. शिरवाडकरमहात्मा फुलेतुरटीभगतसिंगश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीमांगमूळव्याधवंदे भारत एक्सप्रेसशाश्वत विकास ध्येयेसह्याद्रीमहाराष्ट्र भूषण पुरस्कारआग्नेय दिशामराठी रंगभूमी दिनकंबरमोडीसंयुक्त राष्ट्रेकृष्णा नदीअहवालबलुतेदारकालिदाससम्राट अशोकटोमॅटोकापूससिंधुताई सपकाळताराबाईज्ञानपीठ पुरस्कारतुळजाभवानी मंदिरअमरावती जिल्हासायली संजीवभारताची जनगणना २०११राष्ट्रवादरवींद्रनाथ टागोरज्वारीदुसरे महायुद्धविजयदुर्गनियतकालिकवेदअर्थव्यवस्थापी.टी. उषाकेळतुर्कस्तानरत्‍नागिरी जिल्हामहाराष्ट्रातील आरक्षणइजिप्तउच्च रक्तदाबशेतीची अवजारे🡆 More