डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्ल

डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्ल (इंग्लिश: Deoxyribo nucleic acid, डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक अ‍ॅसिड) हे मानवी शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेया केंद्रबिंदूमध्ये असलेले एक प्रकारचे आम्ल होय.

या प्रकारच्या आम्लांना न्यूक्लेइक[मराठी शब्द सुचवा] आम्ल असे म्हणतात. डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लाच्या म्हणजेच डीएनए मध्ये जीवित प्राण्याबद्दलची माहिती साठवून ठेवलेली असते. ही माहिती एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या गुणदोषांना कारणीभूत असते. ही माहिती केंद्रबिंदूत २३ जोड्या असलेल्या गुणसूत्रांद्वारे साठवली जाते. गुणसूत्रांच्या प्रत्येक जोडीत एक गुणसूत्र पित्याकडून व एक मातेकडून येतो. मानवी शरीर रचनेमध्ये मानवी रूप, रंग, बुद्धिमत्ता, कौशल्य, डोळ्याचा रंग, आकार, रूप, कातडीचा रंग हे सर्व महत्त्वाचे घटक असतात. हे घटक गुणसूत्रे ठरवतात. गुणसूत्रतंत्राधारे डीएनए चाचणीतून व्यक्तीच्या मातापित्यांची ओळख निश्चित करता येते. न्यायसहायक शास्त्रात (फोरेन्सिक) याचा उपयोग होतो.प्रत्येक व्यक्क्तीच्या सेल न्युक्लिअस मध्ये डी एन ए असते.. सन १८६९ मध्ये स्वीडिश फिजिशिअन फ्रायड्रिच माईस्चर याने एका वापरलेल्या सर्जिकल बॅंडेजमधील पू व रक्त यामधून एक सूक्ष्म पदार्थ वेगळा केला. सेलच्या (पेशीच्या) न्युक्लिअसमध्ये त्याचे अस्तित्व असल्याने त्याला 'न्युक्लेईन' असे नाव दिले गेले. हेच न्यूक्लेइन पुढे डीएनए म्हणून ओळखले जाऊ लागले.

डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्ल
डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्लाची रचना दाखवणारे चित्र

डीएनए मध्ये कोडिंग आणि नॉनकोडिंग असे क्रम असतात. नॉन कोडिंग डीएनए बेसेसचा क्रम प्रत्येक व्यक्तीचा वेगळा असतो. व्यक्तीचे वेगळेपण या क्रमावर अवलंबून असते. त्यामुळे व्यक्तीची ओळख नॉन कोडिंग बेसेसच्या क्रमावरून होते. आई, वडील, मुलगा, मुलगी यांचे डीएनए ठसे समप्रमाणात आढळतात. सावत्र मुलाचे ठसे मात्र वेगळे असतात. आयडेन्टिकल जुळ्यांमध्ये डीएनए ठसे एकसारखेच असतात.

डीएनए टेस्ट करताना व्यक्तीच्या रक्त, केस, वीर्य, इत्यादी नमुन्यातून डीएनए वेगळी केले जातात. त्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. त्यानंतर पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शनच्या सहाय्याने घेतलेल्या डीएनए नमुन्यातील मात्रा वाढवण्यात येते. व त्याचे तुकडे केले जातात. या प्रक्रियेला फ्रॅगमेंटेशन असे म्हणतात. नंतर इलेक्ट्रोफोरेसीनने हे तुकडे वेगळे करून त्यांचे सदर्न ब्लॉटिंग पद्धतीने नायलॉन मेंब्रेनवर स्थलांतरण करण्यात येते. त्या ठशांमध्ये स्पष्टपणा यावा यासाठी रेडिओअ‍ॅक्टिव्ह रसायनाने लेबलिंग करण्यात येते. मेंब्रेनवर एक्स रे फिल्म ठेवण्यात येते. आणि मग रेडिओ अ‍ॅक्टिव्ह किरणांनी ती डेव्हलप केली जाते. मग हे ठसे पट्ट्याच्या रूपात दिसू लागतात. अशा प्रकारे डीएनए ठसे मिळवले जातात.आणि मग ते ठसे इतर ठशांबरोबर जुळतात की नाही ते पाहिले जाते व निष्कर्ष काढले जातात.

एखाद्या व्यक्तीची डीएनए चाचणी करण्यासाठी कायदेशीर परवानगी घेणे मात्र अत्यावश्यक आहे. भारतात हैदराबाद, बंगलोर इत्यादी ठिकाणी अत्याधुनिक डीएनए चाचणी केंद्रे आहेत.

सर्वसामान्यपणे शास्त्रीय पद्धतीने गुन्ह्याचा तपास करण्यासाठी डीएनए चाचणी केली जात असली तरी इतरही ठिकाणी ती चाचणी उपयुक्त ठरते.उदाहरणार्थ --
१) अनुवंशिक रोग, विकार, विकृती यांची माहिती नवजात बालकाच्या जन्माआधी डीएनए चाचणीने मिळावता येते. व त्यावर वेळीच योग्य उपचार करता येतात.
२) डीएनए चाचणीचा वापर करून बी-बियाणे, तसेच विक्रीसाठी ठेवले मांस, मशरूमसारखे पदार्थ यांचा दर्जा तपासता येतो.
३) डीएनए चाचणीवरून स्थलांतरित व्यक्तीचे, प्राण्याचे वा वनस्पतीचे मूळ स्थान ओळखता येते.
४) डीएनए चाचणीमुळे व्यक्तीचे मातृत्त्व vaa पितृत्त्व सिद्ध करता येते.

डीएनए चाचणी

    मुख्य लेख: डीएनए चाचणी

Tags:

आम्लइंग्रजी-मराठी पारिभाषिक संज्ञाइंग्लिश भाषागुणसूत्रगुणसूत्रेन्यायसहायक शास्त्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

स्त्रीवादतेजस ठाकरेबलवंत बसवंत वानखेडेफिरोज गांधीसुशीलकुमार शिंदेसिंधुदुर्गनाथ संप्रदायमहाराष्ट्र विधानसभालोकसभा सदस्यचोखामेळाआमदारमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीआकाशवाणीध्वनिप्रदूषणताम्हणसुषमा अंधारेमहाराष्ट्र पोलीसलिंगभावगांडूळ खतउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघसमुपदेशनछत्रपती संभाजीनगरवि.वा. शिरवाडकरकादंबरीमुखपृष्ठलता मंगेशकरकार्ल मार्क्सचलनवाढनाचणीविद्या माळवदेभाषापुरस्कारपोलीस पाटीलसोलापूरक्रियाविशेषणराहुल कुलआईभगवानबाबाधनु रासबावीस प्रतिज्ञामराठवाडा मुक्तिसंग्राम दिनराणी लक्ष्मीबाईभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेप्रकाश आंबेडकरमाहिती अधिकारअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघधर्मो रक्षति रक्षितःबौद्ध धर्मसंभाजी भोसलेपोक्सो कायदाअहमदनगर लोकसभा मतदारसंघचिमणीभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीग्रामपंचायतजागतिक लोकसंख्याप्रीतम गोपीनाथ मुंडेजालना लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील किल्लेनरेंद्र मोदीरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघभोपळाअजिंठा लेणीसम्राट अशोक जयंतीतोरणाभारताच्या अधिकृत भाषांची यादी२०२४ मधील भारतातील निवडणुकाजागतिक कामगार दिनअमरावती लोकसभा मतदारसंघउमरखेड विधानसभा मतदारसंघचैत्रगौरीमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीअजिंठा-वेरुळची लेणीगुकेश डीमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाराजकारणविजय कोंडकेदौंड विधानसभा मतदारसंघपुणे🡆 More