गयाना जोन्सटाउन

जोन्सटाउन ही गयानामधील वसाहत होती.

अमेरिकेतील पीपल्स टेंपल या धार्मिक संघटनेने जंगलात ही जागा घेउन तेथे सार्वजनिक घरे व इतर सुविधा निर्माण केल्या. जिम जोन्स या धर्मगुरूने मुख्यत्वे अमेरिकेतील लोकांना तेथे स्थलांतर करण्यास उद्युक्त केले. १८ नोव्हेंबर, इ.स. १९७८ रोजी जोन्सने आपल्या सगळ्या अनुयायांना सायनाइडयुक्त पेय पिण्यास भाग पाडून आत्महत्या करायला लावली. तेथे ९००पेक्षा अधिक व्यक्ती मृत्यू पावल्या. त्याच दिवशी पीपल्स टेंपलच्या अनुयायांनी इतर ठिकाणी अनेक लोकांची हत्या केली. हत्या झालेल्यांत अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी लिओ रायनचाही समावेश होता.

जोन्सटाउन is located in गयाना
जोन्सटाउन
जोन्सटाउन
जोन्सटाउनचे गयानामधील स्थान

पीपल्स टेंपलचे अनुयायी १९७४ साली गयानाला आपल्या नवीन वसाहतीसाठी जागा शोधण्यास गेले. गयानाच्या अधिकाऱ्यांसह जागा नक्की केल्यावर तेथील ३,८०० एकर (१५.४ वर्गकिमी) जमीन भाडेपट्ट्यावर घेण्याचा करार केला. गयानाची राजधानी जॉर्जटाउनपासून २४० किमी पश्चिमेस जंगलात असलेली ही जागा मुख्यत्वे नापीक होती. येथे पिण्याचे पाणी ११ किमी अंतरावर होते. ही जागा घेण्यात जिम जोन्स आणि पीपल्स टेंपलचा फायदा होता कारण इतक्या लांब जंगलात त्यांचा माग काढत येणे इतरांना मुश्किल होते. गयानाच्या सरकारला ही जागा पीपल्स टेंपलला देणे सोयीस्कर होते कारण ही जागा व्हेनेझुएलाच्या सरहद्दीपासून जवळ होती. वादात असलेल्या या सरहद्दीवरून वेनेझुएलाने चढाई करायचे ठरवलेच तर त्यांनी या भागातून येणे टाळले असते कारण असे केले असता जिम जोन्सच्या वसाहतीतील अमेरिकन लोक धोक्यात आली असती. अमेरिकेचा रोष ओढविण्यापेक्षा वेनेझुएलाने इतर ठिकाणाहून चढाई करणे पसंत केले असते.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइ.स. १९७८गयाना१८ नोव्हेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दिवाळीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेसाम्यवादरामायणबौद्ध धर्मबखरमराठी साहित्यओशोहनुमान चालीसानांदेडअश्वगंधाकृष्णभारतातील जागतिक वारसा स्थानेखाजगीकरणमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)२०२४ लोकसभा निवडणुकाहवामान बदलघनकचरापाणीभाषामहादेव जानकरनरेंद्र मोदीसंत जनाबाईसह्याद्रीकोकण रेल्वेमहाविकास आघाडीअकोला लोकसभा मतदारसंघसरपंचपृथ्वीचाफाविठ्ठलबारामती लोकसभा मतदारसंघमानसशास्त्रशिर्डी लोकसभा मतदारसंघदिशानामदेवशास्त्री सानपसाहित्याचे प्रयोजनसोलापूरविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीसांगली विधानसभा मतदारसंघविश्वजीत कदमनाटकअर्थ (भाषा)मतदानमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीन्यूझ१८ लोकमतमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीशनिवार वाडापानिपतची पहिली लढाईदक्षिण दिशाराज्यशास्त्रमीन रासनालंदा विद्यापीठपवनदीप राजनराज्य निवडणूक आयोगतुळजापूररक्तगटशेवगालावणीमाळीताराबाई शिंदेअकोला जिल्हाराणाजगजितसिंह पाटीलउंबरअर्जुन वृक्षमहाराष्ट्रातील आरक्षणबाराखडीरत्‍नागिरी जिल्हामण्यारप्रतापगडजिंतूर विधानसभा मतदारसंघ३३ कोटी देवकुत्रारत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघउद्धव ठाकरेगुकेश डीईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघमहालक्ष्मीरोहित शर्मा🡆 More