इजिप्त फुटबॉल संघ (अरबी: منتخب مصر لكرة القدم; फिफा संकेत: EGY) हा उत्तर आफ्रिकामधील इजिप्त देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे.
आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला इजिप्त सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ३६व्या स्थानावर आहे. आजवर इजिप्त १९३४ व १९९० फिफा विश्वचषक तसेच १९९९ व २००९ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे. इजिप्तने आजवर आफ्रिकन देशांचा चषक सर्वाधिक ७ वेळा जिंकला आहे.
This article uses material from the Wikipedia मराठी article इजिप्त राष्ट्रीय फुटबॉल संघ, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.