मधुकर विश्वनाथ दिवेकर

प्रा.मधुकर विश्वनाथ दिवेकर(जन्म: ०८ जुलै १९५८ लोणी प्रवरानगर, राहाता तालुका, अहमदनगर - हयात) हे मराठीतील विज्ञानकथालेखक व सर्पकथालेखक आहेत.

हे सर्पसंवर्धनाचे काम करीत असल्याने सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध आहेत. सर्पदंशावरील उपचारासाठी ते परिसरातील डॉक्टरांना मदत करतात. बालपणापासून सापांविषयी विशेष प्रेम असल्याने त्यांनी सर्पकथालेखन केले. साप माणसाच्या सान्निध्यात आल्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम, माणूस व साप यांचे नाते, त्या अनुषंगाने माणसांचे परस्पर संबंध अशा विषयांवर ते लेखन करतात. सापांविषयी माणसाला असलेली भीती घालविणे आणि वैज्ञानिक माहिती देणे हे त्यांच्या सर्पकथा लेखनामागील उद्दिष्ट आहे. परिसरातील डॉक्टर, निसर्गप्रेमी, विद्यार्थी यांच्यासाठी ते 'सर्पसंवर्धन व प्रशिक्षण' अशा कार्यशाळा आयोजित करतात. पुणे विद्यापीठ त्यासाठी त्यांना विशेष अनुदान देते. गेल्या दहा वर्षात त्यांनी या कार्यशाळेत ४०० जणांना प्रशिक्षित केले आहे. परिणामी परिसरात सर्पदंशाचे प्रमाण आणि सर्पदंश मृत्यूचे प्रमाण जवळपास शून्यावर आले आहे.

मधुकर विश्वनाथ दिवेकर
मधुकर विश्वनाथ दिवेकर

शिक्षण

अध्यापन

१९८२ ऑगस्ट ते आजतागायत : प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग, संगमनेर महाविद्यालय, संगमनेर, अहमदनगर जिल्हा

लेखन कारकीर्द

प्रा.दिवेकर यांनी विज्ञान कथा या प्रकारात स्वतंत्र शैलीने 'सर्पकथा' हा कथाप्रकार रूढ केला. त्यांच्या एकूण कथा ३७ आहेत. त्यापैकी २२ विज्ञानकथा असून त्यात तीन दीर्घकथा, १९ लघुकथा १३ सर्पकथा आणि दोन इतर सामाजिक कथा आहेत. याशिवाय त्यांनी एक विज्ञान लघुकादंबरी आणि तीव वैज!ञानिक लेख लिहिले आहेत. विज्ञानयुग, धनंजय, कादंब, वसा, हेमांगी, पद्मगंधा, विवेक, यज्ञ इत्यादी दिवाळी अंकांत त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. 'निवडक धनंजय': विज्ञानकथा - मे २०१५' या ग्रंथसंग्रहात चार आणि 'मन्वंतर मे २०१५' या ग्रंथसंग्रहात एक कथा समाविष्ट झाली आहे..

विज्ञान लघुकादंबरी

  • स्पर्शवेल

विज्ञान लेख

  • दशकातलं देवत्व
  • वनस्पतींचं कामजीवन
  • सर्पपुराण

विज्ञानकथा संग्रह

  • तेथे जीवाणू जगती, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २००२
  • विश्वामित्राची प्रतिसृष्टी, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती ०७ ऑगस्ट २०१३ ISBN 987-81-86177-35-8
  • सर्पपुराण, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती १० मार्च २०१३ ISBN 978-93-82161-935-4

अभ्यासक्रमात समावेश

'पुनर्जन्म' ही विज्ञानकथा पुणे विद्यापीठाच्या मराठी विषयांतर्गत २००८-२०१४ दरम्यानच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली.

कथांवरील संशोधन

प्रा. दिवेकर यांच्या कथांवर आणि त्यांच्या मराठी कथेतील योगदानासंबंधी Some Trends in Marathi Vidnyankatha By M. V. Divekar हा प्रा. रवींद्र ताशीलदार यांचा संशोधन निबंध आहे.

पुरस्कार

  • २०१५ :'मराठीतून विज्ञान प्रसारासाठी' - प्रा. मो. वा. चिपळोणकर पुरस्कार २०१५ - इंडियन फिजिक्स असोसिएशन (पुणे विभाग)
  • २०१४ :'उत्कृष्ट शिक्षक' - संगमनेर महाविद्यालय, संगमनेर
  • २०१३ :'आदर्श निसर्गप्रेमी' स्वामी विवेकानंद राष्ट्रगौरव पुरस्कार -२०१३, लोकमान्य मित्र मंडळ, पुणे
  • २००६ :'Best Practices in Community Engagement': Wild Life Conservation and Protection - राष्ट्रीय मूल्यमापन आणि अधिमान्यता समिती (National Assessment and Accreditation Council)- देशातील १५ उत्तम सामाजिक कार्यांच्या यादीत समावेश.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

मधुकर विश्वनाथ दिवेकर शिक्षणमधुकर विश्वनाथ दिवेकर अध्यापनमधुकर विश्वनाथ दिवेकर लेखन कारकीर्दमधुकर विश्वनाथ दिवेकर अभ्यासक्रमात समावेशमधुकर विश्वनाथ दिवेकर कथांवरील संशोधनमधुकर विश्वनाथ दिवेकर पुरस्कारमधुकर विश्वनाथ दिवेकर संदर्भ आणि नोंदीमधुकर विश्वनाथ दिवेकरअहमदनगर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भाषारॉयल चॅलेंजर्स बंगलोरसात बाराचा उताराचाफाशरद पवारभोपाळ वायुदुर्घटनासायबर गुन्हाशब्द सिद्धीपाणीआंग्कोर वाटभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तपानिपतची तिसरी लढाईकेंद्रशासित प्रदेशगोरा कुंभारवेरूळ लेणीमानसशास्त्रबिबट्यातुळजाभवानी मंदिरहरितक्रांतीसूर्यमालाविठ्ठलआचारसंहिताभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हधोंडो केशव कर्वेवाघवेदशिक्षणकोल्हापूर लोकसभा मतदारसंघअकबरज्ञानेश्वरएकनाथकलापुरंदरचा तहमुख्यमंत्रीइंदिरा गांधीमंगळ ग्रहवि.स. खांडेकरलोकमान्य टिळकताराबाईपुणे जिल्हामराठी विश्वकोशभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीसांगली लोकसभा मतदारसंघराणी लक्ष्मीबाईआंबेडकर कुटुंबफुलपाखरूशेतीविनोबा भावेमराठा आरक्षणहडप्पा संस्कृती२००६ फिफा विश्वचषकसूत्रसंचालनभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघगणेश चतुर्थीव्यापार चक्रबुद्धिबळकेंद्रीय लोकसेवा आयोगसमीक्षाजागतिक तापमानवाढप्रज्ञा विवर्धन स्तोत्रवर्धमान महावीरकेळराजरत्न आंबेडकरससाकात्रजवीर सावरकर (चित्रपट)अजित पवारयेशू ख्रिस्तक्रिकेटचा इतिहासयशवंत आंबेडकरभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनआळंदीइतिहासनगर परिषदशुक्र ग्रहनाटकाचे घटकमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीबीड लोकसभा मतदारसंघ🡆 More