प्रा.
केशव रंगनाथ शिरवाडकर (जन्म : इ.स. १९२६; - २५ मार्च २०१८) हे साहित्यसमीक्षक होते. ते मराठीत वैचारिक लेखन करत. मराठी साहित्यिक वि.वा. शिरवाडकरांचे हे धाकटे बंधू होत. के.रं. शिरवाडकर हे तत्त्वज्ञान विषयातले भारतीय शिक्षण क्षेत्रातील एक प्रख्यात नाव होते. त्यांनी आयुष्यभर प्राध्यापकी आणि संशोधन-लेखन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि पुढे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भाषा या विषयात त्यांनी अध्यापनाचे काम केले. त्यांच्या वाचन-लेखन-चिंतनाचे सार असलेले 'आपले विचारविश्व' हे पुस्तक वयाच्या ८४व्या वर्षी लिहिले. भारतीय विचारांच्या संदर्भात जगातील महत्त्वाच्या तत्त्वज्ञानाचे परिशीलन त्यांनी या ग्रंथात केले आहे.
शिरवाडकर यांचे शिक्षण पुणे येथे झाले. ग.प्र. प्रधान आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्याचे ठरवले.त्यानुसार त्यांनी नांदेड येथील पीपल्स कॉलेजच्या उभारणीत योगदान दिले.या महाविद्यालयात ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून १९५० सालापासून अध्यापन करू लागले. नंतर ते तेथे १९५५ ते १९७३ या काळात प्राचार्य होते.
This article uses material from the Wikipedia मराठी article के.रं. शिरवाडकर, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.