हठ योग

हठ योग ही एक विशिष्ट योगविद्या आहे.

१५व्या शतकातील ऋषी योगी स्वात्माराम ह्यांनी हठ योगाची रचना केली. ह्या रचनेत स्वात्मारामांनी "राज योगाच्या प्राप्ततेसाठी आवश्यक असलेली उंची गाठण्याची शिडी" अशी हठ योगाची ओळख करून दिली.

शरीराच्या दृष्टीने हठयोगाला वैशिष्टय़पूर्ण स्थान आहे. मानवी शरीर हे पार्थिव तत्त्व ते आत्मतत्त्व यांना जोडणारा पूल आहे. मन आणि आत्मा यांना पार्थिवाच्या पकडीतून सोडविणाऱ्या शक्ती शरीरात असतात. अज्ञानाशी, दुःख-भोगांशी सामना करायला शरीर सशक्तच हवे. सशक्त शरीर आणि मन आध्यात्मिक गतीचे साधन ठरते. हठयोगात आसने, बंध, षट्क्रिया, प्राणायाम यांचा अभ्यास असतो. पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाशी, मूलाधारात, सर्पाकार वेटोळे घालून निजलेली कुंडलिनी उभी होते. ती वर वर जाऊ लागते. शरीरात एकावर एक असणाऱ्या निरनिराळय़ा केंद्रांतून चित्शक्तीचा प्रवाह सुरू असतो. शेवटी मस्तकातील हजार पाकळय़ांच्या कमळावर कुंडलिनी विसावते. सारे शरीर दिव्य शक्तीने आणि अदम्य उत्साहाने भारावते. प्राणायामाने आपल्या विविध हालचालींवर आपण ताबा मिळवू शकतो. जीवनशक्ती मज्जातंतूत खेळविली जाते. शरीर स्वच्छ, मुक्त होते. ‘ह’ म्हणजे सूर्य. ‘ठ’ म्हणजे चंद्र. यांचा जो योग तो हठयोग. हा श्वासोच्छ्वासाचा शास्त्रोक्त अभ्यास होय. ‘अ साउंड माइंड इन ए साउंड बॉडी’ हे हठयोगात आहे. याने शरीरात उत्साह राहतो. फुफ्फुसांचे सामथ्र्य वाढते. मनाची एकाग्रता आणखी वाढविते. सर्व नाडय़ांमध्ये प्राणशक्ती खेळते. इडा, पिंगला, सुषुम्ना ही नाडय़ांची आध्यात्मिक त्रिपुटी कार्यक्षम होते. प्राणायामाभ्यासाने मनावर संयम येतो. देह हा सुंदर आहेनी तो शेवटपर्यंत सुंदरच राहिला पाहिजे. त्याच्या कार्यतत्परतेसाठी मोठमोठय़ा योग्यांनी हठयोगाचे महत्त्व आवर्जून सांगितले आहे. फक्त हठयोगात जेव्हा देहाची सर्कस सुरू झाली तेव्हा ज्ञानदेवांना हठयोग आवरा, भक्तीची कास धरा, असे आग्रहाने ज्ञानेश्वरीत सांगावे लागले. देहाचा अतिरेकी वापर करण्यामुळे योग संपलानी तांत्रिकता उरली. जाणकारांनी हठयोगाचे महत्त्व पुन्हा नेमके सांगितले. भारतीय योगदर्शनात त्याला आदराचे स्थान लाभले.

Tags:

योगराज योग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मराठी भाषा दिनयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठपिंपळवर्णमालाअकबरभारतकापूसबहिणाबाई चौधरीलोणार सरोवरपुणे लोकसभा मतदारसंघनाणेशिखर शिंगणापूरमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाकुटुंबजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)कलिना विधानसभा मतदारसंघनागपूरइंग्लंडनामदेवशास्त्री सानपराजरत्न आंबेडकरधृतराष्ट्रकुणबीउमरखेड विधानसभा मतदारसंघक्रिकेटचा इतिहासशेवगाकन्या रासमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीतरसताराबाई शिंदेकरमराठी साहित्यराज्यपालसुभाषचंद्र बोसअन्नप्राशनकडुलिंबपोक्सो कायदाआईएकविरानिवडणूकलोकमान्य टिळकश्रीया पिळगांवकरहिंदू तत्त्वज्ञानमेरी आँत्वानेतनियतकालिकभोवळमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीजिजाबाई शहाजी भोसलेशिवनेरीधुळे लोकसभा मतदारसंघविदर्भमुघल साम्राज्यआंब्यांच्या जातींची यादीवि.वा. शिरवाडकरपांढर्‍या रक्त पेशीस्त्रीवादी साहित्यप्रेमलक्ष्मीसमाज माध्यमेधनु रासचाफासुप्रिया सुळेमराठी भाषा गौरव दिनभारतातील मूलभूत हक्करामजी सकपाळवर्धा विधानसभा मतदारसंघतापी नदीए.पी.जे. अब्दुल कलामवेरूळ लेणीपोवाडाउद्धव ठाकरेएकांकिकामण्यारभारत सरकार कायदा १९१९अध्यक्षसमाजशास्त्रधनगरशरद पवारज्ञानेश्वरीजन गण मन🡆 More