सांता क्लॉज: नाताळ सणाशी संबंधित व्यक्तिरेखा

सांता क्लॉज (मराठी नामभेद: सँटा क्लॉज ; इंग्लिश: Santa Claus) हे पाश्चिमात्य ख्रिश्चन धर्मात आणि संस्कृतीत आढळणारे काल्पनिक पात्र आहे.

सांता क्लॉजाचे नाताळ सणाशी अतूट नाते आहे. सांता क्लॉज जगभरातील मुला-मुलींना नाताळच्या आदल्या रात्री म्हणजे २४ डिसेंबरला खेळणी व इतर भेटवस्तू वाटतो असा ख्रिश्चन लोकांमधे समज आहे. जगभरातील लहान मुलांचे सांताक्लॉज हे अनोखे आणि आवडते पात्र आहे. बालमनावर सांता क्लॉजच्या प्रेमळ व्यक्तिमत्त्वाची छाप पडलेली आहे. पाश्चिमात्य देशात विशेषतः युरोपात आणि भारतातही हा नाताळ हा सण उत्साहाने साजरा केला जातो. सुमारे महिनाभर आधीपासून या सणानिमित्त आयोजन सुरू होते.

सांता क्लॉज: संकल्पना, वर्णन, इतिहास आणि विकास
सांता क्लॉजाच्या वेषातील माणूस

संकल्पना

सांता क्लॉज हा सेंट निकोलस, क्रिस क्रीनगल, नाताळ बाबा किंवा नुसताच संता अशा विविध नावांनी ओळखला जातो. चौथ्या शतकातील ग्रीक धर्मगुरू संत निकोलस हे भक्तांना भेटवस्तू देत असत. त्यांच्यापासूनच सांता क्लॉज या संकल्पनेचा आधुनिक काळात उगम झाला असावा, असे मानले जाते. ब्रिटिश आणि डच संस्कृतींमध्ये उदयाला आलेली "सांता क्लॉज" जी संकल्पनाही तेथूनच आलेली असावी. नाताळचा उगम प्राचीन पगान संस्कृतीपर्यंत जाऊन पोहोचत असल्याने पगानच्या हिवाळी सणाशीही सांताचे नाते मानले जाते.

वर्णन

सांता क्लॉज: संकल्पना, वर्णन, इतिहास आणि विकास 
मिरवणुकीत सांताक्लॉज

सांता क्लॉज ही व्यक्तिरेखा लाल रंगाचा आणि पांढरा फरचा पोशाख घालते. त्याला पांढरी लांब दाढी असते. वयस्कर रूपातील या व्यक्तीने काही वेळेला चष्मा लावलेला असतो. पायात काळे बूट कमरेला काळा पट्टा, हातात किंवा पाठीवर खाऊ आणि खेळणी यांनी भरलेली मोठी कापडी पिशवी असे याचे रूप असते. १९व्या शतकात अमेरिका आणि कॅनडा मध्ये सांता क्लॉजचे हे विशिष्ट रूप अधिक लोकप्रिय झाले.

इतिहास आणि विकास

सांता क्लॉज: संकल्पना, वर्णन, इतिहास आणि विकास 
फ्रान्स मधील सांता क्लॉज
  • मायरा येथील इसवी सनाच्या चौथ्या शतकातील ग्रीक ख्रिस्ती बिशप सेंट निकोलस हे गोर-गरिबांना भेटवस्तू वाटप करीत असत आणि त्यांच्या या कार्यासाठी ख्रिस्ती धर्मात ते विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांनी आयुष्यभर समर्पित भावाने ख्रिस्ती धर्माचे कार्य केले.

मध्ययुगात त्यांच्या स्मरणार्थ ६ डिसेंबर या दिवशी लहान मुलांना भेटवस्तू देण्याची प्रथा सुरू झाली. ही प्रथा नंतरच्या काळातही सुरूच राहिली फक्त संत निकोलस यांच्या ऐवजी सांता क्लॉज असे नाव झाले आणि मुलांना भेटवस्तू देण्यासाठी नाताळची पूर्वसंध्या हा दिवस निवडला गेला.

  • सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये 'नाताळबाबा'(Father Christmas) या नावाने नवी संकल्पना पुढे आली. पुनरुत्थान, आनंद, शांती, उत्तम प्रतीचे अन्न घेऊन येणारा, हिरव्या रंगाच्याच फरच्या कपड्यांनी सजलेला हा शांतिदूत ख्रिस्ती धर्मात लोकप्रिय झाला.
  • नेदरलँड आणि बेल्जियम या देशांत सिंटरक्लास (Sinterklaas) या नावाला महत्त्व आहे. या ठिकाणीही लहान मुलांना भेटवस्तू देणारी व्यक्ती म्हणूनच याची ओळख आहे.
सांता क्लॉज: संकल्पना, वर्णन, इतिहास आणि विकास 
सिंटरक्लास

संत निकोलस आणि नाताळ बाबा (Father Christmas) या दोन संकल्पनांचे एकीकरण होऊन त्यातून सांताक्लॉज ही व्यक्तिरेखा प्रचारात आली आहे असे मानले जाते.

  • १९ व्या शतकात-सांताक्लॉजच्या व्यक्तिरेखेला विविध नव्या संकल्पना जोडल्या गेल्या. यामध्ये बर्फ़ाच्या घसरत्या गाडीचे चित्रण, त्या गाडीला लावलेली रेनडिअर नावाची हरणे अशा गोष्टी जोडल्या गेल्या.पाश्चात्य जगातील लेखक, व्यंगचित्रकार यांनी या व्यक्तिरेखेला नवनव्या गोष्टी जोडल्या ज्या आजही लहान मुलांच्या भावविश्वात महत्त्वाच्या ठरतात.

लहान मुलांसाठी आकर्षण

थॉमस नास्त नावाच्या लेखकाने सांताक्लॉजचे घर ही नवी संकल्पना मांडली. उत्तर ध्रुवाच्या बर्फ़ाळ प्रदेशात सांताक्लॉजचे निवासस्थान आहे. जगभरातील हजारो मुले सांताक्लॉजला त्याच्या घरच्या पत्त्यावर पत्रे पाठवीत असतात. आणि नाताळच्या रात्री बर्फ़ावरून घसरत आपल्या गाडीवरून तो मुलांना भेटण्यासाठी आणि भेटवस्तू देण्यासाठी येतो ही कल्पना लहान मुलांच्या कथा, गाणी यामधून अधिक लोकप्रिय झाली. आपल्या हातातील घंटा वाजवत, मेरी ख्रिसमस अशा नाताळच्या शुभेच्छा देत सांताक्लॉज येतो अशी काल्पनिक धारणा आहे. सांताक्लॉज या विषयावरील विविध पुस्तकेही लेखकांनी लिहिलेली आहेत. आपल्या निवासस्थानातून सांताक्लॉज एक आकाशवाणी केंद्रही चालवितो. चित्रपट, मालिका याद्वारेही लहान मुलांसाठी सांताक्लॉज व्यक्तीरेखेचे चित्रण केले जाते.

हे ही पहा

सांताक्लॉजचे प्रसिद्ध गीत

Jingle Bells (Calm) (Kevin MacLeod) (ISRC USUAN1100188)

नाताळ शुभेच्छा ध्वनी

चित्रदालन

संदर्भ

Tags:

सांता क्लॉज संकल्पनासांता क्लॉज वर्णनसांता क्लॉज इतिहास आणि विकाससांता क्लॉज लहान मुलांसाठी आकर्षणसांता क्लॉज हे ही पहासांता क्लॉज सांताक्लॉजचे प्रसिद्ध गीतसांता क्लॉज नाताळ शुभेच्छा ध्वनीसांता क्लॉज चित्रदालनसांता क्लॉज संदर्भसांता क्लॉजइंग्लिश भाषाख्रिश्चन धर्मनाताळभारतयुरोप

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अर्थसंकल्पसमाजशास्त्रसर्व शिक्षा अभियानहवामान बदलपुन्हा कर्तव्य आहेविरामचिन्हेसिंधुताई सपकाळनांदा सौख्य भरेसचिन तेंडुलकरस्वामी विवेकानंदभगवद्‌गीताचिखली विधानसभा मतदारसंघकर्पूरी ठाकुरबहावापुसद विधानसभा मतदारसंघमराठावर्णनात्मक भाषाशास्त्रभारत छोडो आंदोलनहंपीहवामानजिल्हा परिषदशहाजीराजे भोसलेसूर्यजालना विधानसभा मतदारसंघशिवनेरीदत्तात्रेयमराठी भाषा दिनविष्णुसहस्रनामवेदइतर मागास वर्गकरवंदपाकिस्तानसिंधुदुर्गव्यवस्थापनकन्या राससाताराविनायक दामोदर सावरकरसह्याद्रीसाहित्याचे प्रयोजनसाहित्याची निर्मितिप्रक्रियाम्युच्युअल फंडरेणुकाभगतसिंगगूगल क्लासरूमजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)घनसावंगी विधानसभा मतदारसंघचैत्रगौरीमराठी व्याकरणराज्यसभाकल्याण स्वामीकाळाराम मंदिर सत्याग्रहविंडोज एनटी ४.०रायरेश्वरनाथ संप्रदायराज्यपालप्रेमानंद गज्वीसेरियमजिल्हाधिकारीयवतमाळ जिल्हादक्षिण दिशाअन्नप्राशनराष्ट्रीय रोखे बाजारभारताचे सर्वोच्च न्यायालयनेल्सन मंडेलाजगदीश खेबुडकरआचारसंहितामुंबईजागतिक तापमानवाढजिजाबाई शहाजी भोसलेस्वरराज्य मराठी विकास संस्थाहिंगोली विधानसभा मतदारसंघभारतातील शासकीय योजनांची यादीगूगलहिंदू कोड बिलमुक्ताबाईशिर्डी विधानसभा मतदारसंघ🡆 More