संताजी घोरपडे: मराठा साम्राज्याचे सरसेनापती

संताजी घोरपडे ( - १८ जून १६९७) हे मराठा साम्राज्याचे १६८९ ते १६९७ या काळात सरसेनापती होते.

हे छत्रपती राजाराम यांच्या सत्ताकाळात घोरपडे सरसेनापतीपदावर होते

धनाजी जाधव यांच्यासोबत घोरपडे यांनी जवळजवळ १७ वर्षे मुघल सैन्याशी लढा देउन मराठा साम्राज्य तगवून धरले होते. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुर्णता: नष्ट होत असताना, सरसेनापतीपदाची वस्त्रे मामलकत मदार हे भुषण स्वरुपी पद व काळ्या पांढऱ्या रंगाचा झेंडा छत्रपती राजाराम महाराजांनी सरसेनापती संताजी म्हाळोजी घोरपडे ह्यांना देवुन स्वराज्याची पुनश्च बांधणी करण्याचा विडा दिला.

सरसेनापती संताजी घोरपडे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील भाळवणी येथे इ.स १६४५ साली भाऊबीजेच्या दिवशी झाला होता. औंधच्या यमाई/ संताई देवीच्या नावावरून संताजी हे नाव ठेवले होते.

एक वेळ अशी होती राज्य नव्हते, खजाना नव्हता, सैन्यही नव्हते. त्यावेळी सरसेनापती संताजीनी हिंदवी स्वराज्याची पुर्नबांधनी केली व मराठ्यांच्या इतिहासात सर्वात मोठा पराक्रम घडवला. मुघलांच्या साम्राज्याची पुर्णता: धुळदाण केली. औरंगजेब वत्याचे मोठे सैन्य ह्यांना महाराष्ट्राच्या मातीत गाडले. त्यांनी मुघलांची आर्थिक, शारीरिक व मानसिक हानी मोठ्या प्रमाणात केली.अशीहानी करणारे सरसेनापती संताजी घोरपडे हे मराठ्याच्या इतिहासातील एकमेव पराक्रमी वीर होते. संताजींच्या बलीदानानंतर,हिंदवीस्वराज्याचा कारभार करणे छत्रपतीना सोपे झाले व त्यांचा विस्तारही मोठ्या प्रमाणात झाला.

संताजी घोरपडे यांची स्वराज्य सेवा

संताजी घोरपडे यांची स्वराज्य सेवा इ.स १६७४ ते १६९७ मधील आहे. त्याबद्दलची थोडक्यात माहीती खालीलप्रमाणे.

  • १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पागेच्या जूमलेदार हुद्यावर रूजू झाले.
  • १६७७ साली कोप्पळ प्रांतात कासिमखान व हुसेनखान या मियाणा बंधूंशी झालेल्या लढाईत संताजीनी पराक्रम गाजवला.
  • १६७९ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्याबरोबर जालनाच्या स्वारीत संताजीनी पराक्रम गाजवला.
  • ऑक्टोबर १६८१ साली कर्नाटक प्रांतात मोहीम आखून पठाण व बेरडांचा पराभव केला, अनैक ठाणी सर केली. छत्रपती संभाजीमहाराजांकडून सन्मान मिळाला.
  • ऑगस्ट १६८९ साली श्रावणी बैल पोळ्याच्या दिवशी औरंगजेबाच्या तूळापूर छावनीत हल्ला करून सोन्याचे कळस कापले. लोकशाहीर बशीर मोमीन कवठेकर लिखित 'भंगले स्वप्न महाराष्ट्राचे' या नाटकात तुळापूर छावणी वरील या धाडसी हल्ल्याचा प्रसंग रोमहर्षक पद्धतीने प्रस्तुत केलेला आहे. या हल्ल्यात सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी ज्याप्रकारे श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या युद्धविषयक नियमांचा (धार्मिक पूजाअर्चना करताना कोणास मारू नये) आदर करत मोगल बादशाह औरंगजेब यास कोणतीही इजा केली नाही परंतु छावणीचे कळस कापून नेत मोगल सैन्यात धडकी भरवली. यातून संताजी- धनाजी यांचे शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम तसेच राजाराम महारांच्या सुखरूपतेसाठी केलेल्या पराक्रम पराकाष्टेचे रेखांकन करण्यात आलेले आहे. तुळापूर मोहीम फत्ते करून परत येताना रायगडास वेडा घालून बसलेल्या इतिकाद खानावर हल्ला केला.
  • ऑक्टोबर १६८९ साली बेन्नूरच्या राणीवर चालून जाणाऱ्या जान निसारखान, मतलबखान, शर्जाखान यांचा संताजीकडून पराभव झाला.
  • एप्रिल १६९० साली साताऱ्याच्या पायथ्याशी शर्जाखान याचा पराभव व त्याला कैद केली.
  • जून १६९० साली म्हसवड जवळ पिलीवच्या घाटात लुत्फुल्लाखानावर हल्ला केला.
  • ६ जुलै १६९० साली लुत्फुल्लाखानाच्या छावणीवर रात्रीचा छापा घालून दाणादाण उडवली.
  • ऑगस्ट १६९० साली संताजीनी कसबे नांदगज, परगणे, कडेवली येथील गढ्यांवर हल्ला केला.
  • १६९१ साली संताजीना सरसेनापती पदाची प्राप्ती झाली.
  • जून १६९१ साली जाननिसारखान व तहव्वुरखान यांचा संताजी कडून पराभव झाला.
  • ऑक्टोबर १६९२ संताजीनी बेळगांव,धारवाड प्रदेशात जबरदस्त धुमाकूळ घातला.
  • १४ डिंसेबर १६९१ साली कांचीचा फौजदार अलिमर्दखान याचा संताजी कडून पराभव व कैद.
  • ५ जानेवारी १६९३ साली जुल्फकारखानावर देसूर येथे संताजीनी हल्ला केला.
  • ७ फेब्रुवारी १६९३ साली संताजीचा कासीमखानावर हल्ला करून पराभव केला.
  • एप्रिल १६९३ साली संताजीचा त्रिचन्नापल्लीस वेढा व नायकाची शरणागती.
  • ऑक्टोबर १६९३ साली संताजीची नजीबखान बहाद्दर याच्याबरोबर लढाई झाली.
  • नोव्हेंबर १६९३ साली विक्रमहळ्ळीजवळ हिमतखान, हमिउद्दीनग ख्वाजाखान यांच्या बरोबर लढाई.
  • नोव्हेंबर १६९३ साली संताजीची उत्तर कर्नाटकात मोहिमेवर चैथाईची वसुली.
  • नोव्हेंबर १६९३ साली संताजींकडून आलूर गढी समोर हिंमतखानाचा पराभव.
  • फेब्रुवारी १६९४ साली संताजीची गोवळकोंडा प्रदेशात मोहीम.
  • मार्च १६९४ साली संताजीनी मलकूर गावाजवळ चैत्रसाल राठोडवर हल्ला.
  • नोव्हेंबर १६९४ साली संताजीच्या विजापूर सुभ्यात हिंमतखानाशी लढाया झाल्या.
  • डिंसेबर १६९४ साली संताजीची नळदुर्गजवळ हिंमतखानाशी लढाई.
  • नोव्हेंबर १६९५ साली संताजीचा कासिमखान याच्याबरोबर दोड्डेरीच्या लढाईत महान विजय.
  • २० जानेवारी १६९६ साली बसवापट्टाणच्या लढाईत हिंमतखान संताजी कडून ठार.
  • २५ फेब्रुवारी १६९६ साली संताजीची हमिदुद्दीनखानाशी लढाई.
  • एप्रिल १६९६ साली संताजीची जुल्फकारखानाशी लढाई.
  • ऑगस्ट १६९६ साली जूल्फिकारखानाबरोबर लढाई.
  • मे १६९७ साली शंभू महादेवाच्या डोंगरात आश्रयाला आले.

१८ जून १६९७ साली इस्लामपूर (राजापूर) मधील महादेव मंदिराजवळ ओढ्यात आंघोळ करून ध्यानस्थ बसले असतांना याच ठिकाणीसंताजीचा गलिच्छ राजकारणाला बळी पडून खून झाला. त्यानंतर कलेवर द्वारका बाईसाहेब घोरपडे सरकार यांनी धडास कुरुंदवाड घाटावर आनून आग्नी देण्यात आला

सरसेनापती संताजी घोरपडे व घोरपडे घराण्यावर लिहलेली पुस्तकें आणि लेखकाचे नाव

संताजी घोरपडे: मराठा साम्राज्याचे सरसेनापती 
Bhangale Swapn Maharashtra @Bharat Naty Mandir 1st show on Republic Day, 1976
  1. कापशीकर सेनापती घोरपडे घराण्याची पत्रे (शं.ह. वर्टीकर)
  2. कापशीकर सेनापती घोरपडे घराण्याचा इतिहास खंड १ व २ (स.मा. गर्गे, शं.ह. वर्टीकर)
  3. हिंदुराव घोरपडे घराण्याचा दक्षिणेकडील इतिहास (स.मा. गर्गे)
  4. मुधोळकर घोरपडे घराण्याचा ईतिहास(बाबुराव घोरपडे)
  5. मुधोळ संस्थानच्या घोरपडे घराण्याचा इतिहास (द.वि. आपटे)
  6. सेनापती संताजी घोरपडे (डॉ जयसिंगराव पवार)
  7. मराठा सत्तेचा उदय (डॉ जयसिंगराव पवार)
  8. शिवपुत्र छत्रपती राजाराम (डॉ जयसिंगराव पवार)  
  9. मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद् (डॉ जयसिंगराव पवार)  
  10. भंगले स्वप्न महाराष्ट्राचे - ऐतिहासिक नाटक (लोकशाहीर बशीर मोमीन कवठेकर)
  11. अद्वितीय सेनानी सेनापती संताजी घोरपडे (बाळासाहेब माने)
  12. संताजी कादंबरी (काका विधाते)
  13. झुंजार सेनापती संताजी घोरपडे (प्रभाकर बागुल)
  14. नरवीर सेनापती संताजीराव घोरपडे (शशिकांत पाटील)
  15. रणझुंजार सेनापती संताजी घोरपडे (महेश तेंडुलकर)
  16. रणधुरंधर संताजी घोरपडे (शीला रिसबुड)
  17. पराक्रमाची शर्थ जाहली (नयनतारा देसाई)
  18. सेनापती (सचिन कानिटकर)
  19. घोडदौड संताजींची (प्रभाकर भावे)
  20. अजिंक्य (दशरथ पाटील)
  21. इचलकरंजीकर घोरपडे घराण्याचा इतिहास (ह.ग. खरे)

संदर्भ

Tags:

छत्रपती राजाराममराठा साम्राज्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

उंटकविता२०२४ मधील भारतातील निवडणुकाग्रामपंचायतधनगरपरभणी विधानसभा मतदारसंघलोकमान्य टिळकभगवानबाबामृत्युंजय (कादंबरी)महाराष्ट्राचे प्रशासकीय विभागबाराखडीकुपोषणनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघखो-खोधुळे लोकसभा मतदारसंघगालफुगीखासदारप्रकाश आंबेडकरबहावाएप्रिल २५बहिणाबाई पाठक (संत)वृत्तपत्रआणीबाणी (भारत)काळभैरवअरिजीत सिंगमहाराष्ट्रातील राजकारणभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीजिजाबाई शहाजी भोसलेवर्तुळप्रज्ञा विवर्धन स्तोत्रस्त्रीवादी साहित्यक्रियाविशेषणवाशिम जिल्हाएकांकिकामहाराष्ट्रातील किल्लेअजिंठा-वेरुळची लेणीसूर्यनमस्कारमाळीअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघऊसदूरदर्शनमांगहिरडामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीगणितभारताच्या अधिकृत भाषांची यादीमहाराष्ट्रातील नद्यांची यादीअशोक चव्हाणरमाबाई रानडेमहाराणा प्रतापपृथ्वीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेशिल्पकलाकोल्हापूर लोकसभा मतदारसंघदिल्ली कॅपिटल्सप्रेम२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकानरसोबाची वाडीमहाराष्ट्रामधील जिल्हेमिया खलिफालोकगीतभारतसंत जनाबाईमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीमुखपृष्ठजालना विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीबैलगाडा शर्यतदिवाळीऔंढा नागनाथ मंदिरदेवेंद्र फडणवीसताराबाईसायबर गुन्हाजागतिक लोकसंख्यामहादेव जानकरहत्तीतेजस ठाकरेयवतमाळ विधानसभा मतदारसंघ🡆 More