बहादूरगड: महाराष्ट्रातील एक भुईकोट किल्ला

बहादूर गड किंवा धर्मवीरगड तथा पेडगावचा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक भुईकोट किल्ला आहे.

हा किल्ला अहमदनगर जिल्ह्यात दौंड जवळ आहे.

बहादूरगड / धर्मवीरगड
धर्मवीरगड / पेडगाव चा किल्ला
अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
बहादूरगड / धर्मवीरगड is located in Maharashtra
बहादूरगड / धर्मवीरगड
बहादूरगड / धर्मवीरगड
बहादूरगड / धर्मवीरगड is located in India
बहादूरगड / धर्मवीरगड
बहादूरगड / धर्मवीरगड
Coordinates 18°30′28.63″N 74°42′14.88″E / 18.5079528°N 74.7041333°E / 18.5079528; 74.7041333
प्रकार भुईकोट किल्ला
उंची ५०३ मीटर (१,६५० फूट)
जागेची माहिती
मालक भारत सरकार
द्वारे नियंत्रित
  • बहादूरगड: स्थान, वर्णन, इतिहास मराठा (१६३७ पर्यंत)
  • मुघल (१६३८ - १७५८)
  • बहादूरगड: स्थान, वर्णन, इतिहास मराठा (१७५९ - १८१८)
  • Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
    • बहादूरगड: स्थान, वर्णन, इतिहास ईस्ट इंडिया कंपनी (१८१८ - १८५७)
    • बहादूरगड: स्थान, वर्णन, इतिहास जुलमी ब्रिटीश राज (१८५७ - १९४७)
  • भारत ध्वज भारत (१९४७ पासून)
सर्वसामान्यांसाठी खुले होय
परिस्थिती अवशेष
Site history
साहित्य दगड

स्थान

बहादूरगड पुण्यापासून सुमारे १०० किलोमीटर (६२ मैल) अंतरावर आहे. जवळचे शहर दौंड आहे. हा किल्ला भीमा नदीच्या उत्तरेकडील दौंड शहराच्या पूर्वेस सुमारे १५ किलोमीटर (९.३ मैल) अंतरावर पेडगाव या गावात आहे.

वर्णन

हा किल्ला आयताकृती आकाराचा आहे. या किल्ल्याला आठ प्रवेशद्वारे आहेत. गावाकडे जाण्याचा दरवाजा चांगल्या अवस्थेत आहे तर नदीच्या दिशेला असलेला दरवाजा मोडकळीस आलेला आहे.सध्या टीम धर्मवीरगडच्या माध्यमातून त्याचे संवर्धन सुरू आहे. किल्ल्याच्या आत ५ फूट (१.५ मी) उंचीचा हनुमानाचा पुतळा आहे. या किल्ल्यामध्ये यादव काळात निर्माण झालेल्या ६ मंदिरांचा गट आहे. हेमाडपंती मंदिरे बालेश्वर, लक्ष्मी-नारायण, मल्लिकार्जुन, रामेश्वर, पाताळेश्वर आणि भैरवनाथ यांची आहेत. भैरवनाथ मंदिरासमोर अनेक वीर दगड, सतीगल, तोफांचे गोळे, दीपमाळ आणि शिव मूर्ती आहेत.

इतिहास

या किल्ल्याचा फार कमी इतिहास सर्वांना माहित आहे. मुघल साम्राज्याच्या काळात पेडगाव हे मुघल सैन्याचे मुख्य ठिकाण होते. १६७२ मध्ये दख्खनेतील मुघल सेनापती बहादूर खान (औरंगजेबाचा दुधभाऊ) आणि त्याचा मामा याने येथे तळ ठोकला आणि शिवाजी महाराजांच्या मराठा सैन्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. भीमा नदीतून पाणी आणण्यासाठी बहादूरखान याने जलवाहिनी बांधली. यावरील मोट आणि पर्शियन चाक आजही शाबूत आहेत. बहादूरखानाने या किल्ल्याचे नाव बहादूरगड असे ठेवले. यानंतर त्याच्या विरुद्ध स्वराज्यात पेडगावची मोहिम आखली गेली आणि त्या मोहिमेचे प्रमुख सरदार होते स्वतंत्र स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांच्या सोबत होते अनाजीपंत, मोरोपंत पिंगळे, येसाजी कंक, म्हाळोजी घोरपडे व त्यांचा मुलगा संताजी घोरपडे, धनाजी जाधव, बहिर्जी नाईक व त्यांचा साथीदार नंदी इ. या पेडगाव मोहिमेचा खरा उद्देश होता तो त्या बहादूर खानाने लुटून आणलेले हिंदू देव-देवता त्याच्याकडून परत आणायचे त्यात होता मोरगावचा मयुरेश्वर, कुरकुंभ गावची ग्रामदेवी फिरंगाईदेवी, आणि अनेक मंदिरांचे कळस इ. या मोहिमेत सरसेनापतींनी ९,००० सेनेच्या दोन तुकड्या केल्या होत्या, त्यापैकी स्वतःसोबत त्यांनी २,००० सेना आणि बाकिची ७,००० सेना ही येसाजी कंक, म्हाळोजी घोरपडे आणि मोरोपंत पिंगळे यांना दिली होती, त्यांनी पेडगाव लुटायचा बेत आखला होता तो असा बहादूरगडच्या मुख्य दरवाजावर त्यांची ७,००० सेना उभी केली आणि त्यांना आदेश दिला कि बहादूरखानाची सेना आली तर उल्ट जंगलात पळायच म्हणजे इकडे त्यांना देव परत आणायला वेळ मिळेल आणि अशाप्रकारे हंबीररावांची सरसेनापती म्हणून पहिली मोहिम फत्ते झाली. आत औरंगजेबाचा दुमजली महाल आहे. १७५९ मध्ये पेडगाव हे सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी ताब्यात घेतले आणि ते १८१८ पर्यंत मराठ्यांकडे राहिले.

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

बहादूरगड स्थानबहादूरगड वर्णनबहादूरगड इतिहासबहादूरगड संदर्भबहादूरगड बाह्य दुवेबहादूरगडअहमदनगर जिल्हादौंडभारतभुईकोट किल्लामहाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राणाजगजितसिंह पाटीलमाती प्रदूषणऊसयोनीनातीअष्टांगिक मार्गभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यासूर्यमालाऔद्योगिक क्रांतीनवरी मिळे हिटलरलाभारतातील राजकीय पक्षभारताचे सर्वोच्च न्यायालयभारतातील शेती पद्धतीक्रिकेटचा इतिहासमहात्मा फुलेसंभोगभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेस्वामी समर्थकलारायगड (किल्ला)गणपतीकोटक महिंद्रा बँकचिपको आंदोलनवाचननाममहाराष्ट्रातील पर्यटनजवसप्रतापगडमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९राम गणेश गडकरीक्रियाविशेषणगजानन महाराजआईस्क्रीमविराट कोहलीमासिक पाळीअर्थ (भाषा)श्रीनिवास रामानुजनअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९शिवभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीपानिपतची पहिली लढाईबिरजू महाराजभाषाज्योतिबाआर्य समाजपंकजा मुंडेचोळ साम्राज्यपश्चिम दिशासाईबाबासौंदर्यायवतमाळ जिल्हामेष रासलोकशाहीतापमानग्रंथालयभोवळमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेवि.स. खांडेकरताम्हणअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षअरिजीत सिंगमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळहनुमान जयंतीजालना विधानसभा मतदारसंघकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीअतिसारशेवगाशिर्डी लोकसभा मतदारसंघमिलानसोनारबुलढाणा विधानसभा मतदारसंघलोकमतनृत्यसत्यनारायण पूजापृथ्वीचे वातावरण🡆 More