श्रीपाद महादेव माटे

श्रीपाद महादेव माटे (जन्म : विदर्भातील शिरपूर, २ सप्टेंबर, १८८६ - २५ डिसेंबर, १९५७) हे मराठी लेखक होते.

१८८६">१८८६ - २५ डिसेंबर, १९५७) हे मराठी लेखक होते. एम.ए.पर्यंत शिक्षण घेणाऱ्या माटे यांना रँगलर परांजपे, वासुदेवराव पटवर्धन, देवधर यांच्यासारखे गुरू अध्यापक म्हणून लाभले. लोकमान्य टिळक, संस्कृत पंडित वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. ते माटे मास्तर म्हणून ओळखले जात.

श्री.म.माटे

साताऱ्यातील आणि पुण्यातील ‘न्यू इंग्लिश स्कूल’मधून काही काळ अध्यापन केल्यावर माटे यांनी पुण्याच्या एस.पी. कॉलेजात इंग्रजी व मराठी विषयांचे प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. ‘रोहिणी’ या मासिकाचे माटे पहिले संपादक. यानंतर ‘केसरी प्रबोध’, ‘महाराष्ट्र सांवत्सरिक’ (तीन खंड) या ग्रंथांचे संपादन करून माटे यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. ‘विज्ञानबोध’ या त्यांनी संपादित केलेल्या ग्रंथाची त्यांनीच लिहिलेली २०० पानी प्रस्तावना खूप गाजली. विज्ञानयुगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या प्रस्तावनेतून त्यांनी दिला.

माटे यांनी आयुष्यभर अस्पृश्योद्धाराचे काम केले.

प्रासादिक, प्रसन्न, शैलीदार माटे हे विसाव्या शतकाच्या प्रथमार्धात कसदार व विपुल लेखन करणाऱ्यांपैकी एक होते. शिक्षक, कृतिशील सुधारक, नितळ-निर्व्याज 'माणूस' ही गुणविशेषणे त्यांना सार्थपणे लावली गेली.त्यांच्या आयुष्यातील लेखनपर्व तसे उशिरा सुरू झाले, पण एकदा सुरू झाल्यावर वीस वर्षे ते लिहीत राहिले. दहा हजारांहून जास्त भरतील इतकी छापील पृष्ठे त्यांच्या खात्यावर जमा आहेत. लेखनकाळ १९३० ते १९५५. संशोधन, संकलन, चरित्रे, वैचारिक, तत्त्वचिंतनात्मक, इतिहासमंथन, चालू घडामोडी, निबंध, ललितलेख... असा प्रचंड मोठा पट या लिखाणाचा आहे.

पक्षिकेचा वारा ही त्यांची एकमेव कादंबरी.

श्री.म. माटे यांचे प्रकाशित साहित्य

  • अनामिक
  • अस्पृशांचा प्रश्न
  • उपेक्षितांचे अंतरंग
  • केसरी प्रबोध (संपादित)
  • गीतातत्त्वविमर्श
  • चित्रपट : मी व मला दिसलेले जग
  • निवडक श्री.म. माटे - (एकाहून अधिक खंड, संपादक - म.श्री. माटे आणि विनय हर्डीकर)
  • परशुराम चरित्र व पंचमानव हिंदुसमाज
  • पक्षिकेचा वारा (कादंबरी)
  • भावनांचे पाझर
  • मधूला सांगितलेल्या गोष्टी
  • महाराष्ट्र सांवत्सरिक (३ खंड-संपादित)
  • माणुसकीचा गहिवर
  • रसवंतीची जन्मकथा - (भाषेच्या विकासाबद्दलचे पुस्तक)
  • श्री रामदास स्वामींचे प्रपंचविज्ञान
  • विचारमंथन
  • विचारशलाका
  • विज्ञानबोध (संपादित)
  • विज्ञानबोधाची प्रस्तावना (२०० पानी)
  • संत, पंत, तंत - (संत कवी, पंडित कवी आणि शाहीर यांच्या काव्याचा परामर्श घेणारे पुस्तक)
  • साहित्यधारा
  • सुगंधी फुले

श्री.म.माटे यांच्या गाजलेल्या कथा

  • कृष्णाकाठचा रामवंशी
  • तारखोऱ्यातील पिऱ्या
  • मांगवाड्यातील सयाजीबोवा; इत्यादी.
  • बन्सिधर ! तू आता कुठे रे जाशील ?

कार्य

  • संस्थापक, "अस्पृश्य निवारक मंडळ"

अस्पृश्य वस्तीमध्ये जाऊन ते त्यांना शिकवीत 1945 सालच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्याने कल्याण येथे योजलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते ते पुण्यातील हिंदुवादी होते

गौरव


Tags:

श्रीपाद महादेव माटे श्री.म. माटे यांचे प्रकाशित साहित्यश्रीपाद महादेव माटे श्री.म.माटे यांच्या गाजलेल्या कथाश्रीपाद महादेव माटे कार्यश्रीपाद महादेव माटे गौरवश्रीपाद महादेव माटेइ.स. १८८६इ.स. १९५७मराठी भाषालोकमान्य टिळकवासुदेवशास्त्री अभ्यंकर२ सप्टेंबर२५ डिसेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बडनेरा विधानसभा मतदारसंघसामाजिक कार्यअदृश्य (चित्रपट)महाविकास आघाडीनगर परिषदसिंधुदुर्गज्ञानेश्वरचलनवाढवाचनअंकिती बोसआर्थिक विकासतमाशापु.ल. देशपांडेमहाराष्ट्र विधान परिषदकोल्हापूर जिल्हादूरदर्शनमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीरावेर लोकसभा मतदारसंघॐ नमः शिवायभूगोलदिशानेतृत्व२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लासुभाषचंद्र बोसजलप्रदूषणयूट्यूबरविकांत तुपकरमहाराष्ट्रातील खासदारांची यादीअष्टविनायकलोकशाहीसात आसरापिंपळमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदाप्राण्यांचे आवाजरोहित शर्माव्यंजनभारताचे सर्वोच्च न्यायालयओमराजे निंबाळकरमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीभारतरत्‍नअहिल्याबाई होळकरमहाराष्ट्रातील पर्यटनभोपळामहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीकरवंदहापूस आंबाअकोला लोकसभा मतदारसंघप्रकाश आंबेडकरजागतिक पुस्तक दिवसकडुलिंबभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तइंग्लंडजत विधानसभा मतदारसंघसातारा लोकसभा मतदारसंघस्वामी विवेकानंदखासदारजागतिक कामगार दिनभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीसातव्या मुलीची सातवी मुलगीदीपक सखाराम कुलकर्णीनवनीत राणाकर्करोगदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनानीती आयोगचैत्रगौरीअध्यक्षपसायदानपश्चिम दिशासाम्यवादमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभीमराव यशवंत आंबेडकरग्रामपंचायतआचारसंहिताबखरमराठा घराणी व राज्येसंवादगाडगे महाराजदेवनागरीबलवंत बसवंत वानखेडे🡆 More