राज्य निवडणूक आयोग

राज्य निवडणूक आयोग हा एखाद्या राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था (जसे:नगरपालिका, महानगरपालिका,पंचायत, जिल्हा परिषद इत्यादी) यांचे निवडणुकींचे अधिक्षण, दिशानिर्देश व नियंत्रणासाठी स्थापण्यात आलेला आयोग आहे.

त्याची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम 243Z(A) व 243K अन्वये करण्यात आलेली आहे. राज्यघटनेच्या, नरसिंहराव सरकारच्या, सन 1992 मध्ये पारित झालेल्या ७३व्या घटनादुरुस्तीनुसार, हा बदल करण्यात आला. २६ एप्रिल १९९४ पासून हा बदल लागू झाला. राज्य निवडणूक आयोगास स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत अनन्य अधिकार आहेत. त्यात निवडणूक कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कार्यवाहीचेही अधिकार आहेत. तसेच, ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा तपशिल सादर केला नाही त्यांना अपात्र ठरविणे इत्यादी अधिकारही या आयोगास आहेत.

निर्मिती व कार्य

भारतीय संविधानाच्या ७३ व ७४ दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना दि.२६ एप्रिल,इ.स. १९९४ रोजी करण्यात आली. संविधानातील भाग -९ मधील अनुच्छेद 243 ट (243 K) नुसार ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हा परिषद, पंचायत समितीग्रामपंचायत) व अनुच्छेद 243 यक (243 ZA) नुसार नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायत) यांच्या निवडणुका घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आलेली आहे. संविधानातील सदर अनुच्छेदातील तरतुदीनुसार ‘निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे अधिक्षण, संचलन आणि नियंत्रण आणि अशा निवडणुकांचे आयोजन ’ अशी जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविलेली आहे. हा आयोग भारतीय निवडणूक आयोगाच्या आधिपत्त्याखाली काम करतो व त्याचे निर्णय याला बंधनकारक असतात.

संदर्भ आणि नोंदी

हे सुद्धा पहा

Tags:

इ.स. १९९४२६ एप्रिल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ग्रंथालययोनीउत्पादन (अर्थशास्त्र)भारतीय संसदउदयनराजे भोसलेफुटबॉलपसायदानखाजगीकरणमलेरियाआर्य समाजमातीरत्‍नागिरी जिल्हाताराबाईविनायक दामोदर सावरकरहवामानसांगली विधानसभा मतदारसंघ२०१४ लोकसभा निवडणुकाम्हणीपोक्सो कायदातणावप्रेमानंद महाराजगुरू ग्रहरत्‍नागिरीशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पानिपतची दुसरी लढाईनवनीत राणाधनगरकुपोषणमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीगोंडसिंहगडपरभणी लोकसभा मतदारसंघधनु राससुधा मूर्तीभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहितानगर परिषदवायू प्रदूषणशुभेच्छामेरी आँत्वानेतउच्च रक्तदाबअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)नोटा (मतदान)एकनाथ खडसेकराड उत्तर विधानसभा मतदारसंघचाफापानिपतची तिसरी लढाईसंभाजी भोसलेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९संगीत नाटकस्त्री सक्षमीकरणशिवदौंड विधानसभा मतदारसंघबीड जिल्हामहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीनरेंद्र मोदीशहाजीराजे भोसलेभारताची जनगणना २०११कलाजय श्री रामशरद पवारशेतीसमर्थ रामदास स्वामीअहमदनगर लोकसभा मतदारसंघकुर्ला विधानसभा मतदारसंघशिक्षणमूलद्रव्यमराठी भाषा दिनरक्तगटभारताच्या अधिकृत भाषांची यादीप्रल्हाद केशव अत्रेगौतम बुद्धसमासभारताच्या राष्ट्रपतींची यादीवि.स. खांडेकर🡆 More