रदरफोर्ड बी. हेस: अमेरिकन राजकारणी

रदरफोर्ड बर्चर्ड हेस (इंग्लिश: Rutherford Birchard Hayes) (४ ऑक्टोबर, इ.स.

१८२२ - १७ जानेवारी, इ.स. १८९३) हा अमेरिकेचा १९वा राष्ट्राध्यक्ष होता. याने ४ मार्च, इ.स. १८७७ ते ४ मार्च, इ.स. १८८१ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळली. याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत अमेरिकेच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया पुरी होऊन अमेरिका दुसऱ्या औद्योगिक क्रांतीत प्रवेशली. त्याच्या प्रयत्नांमुळे त्याच्या अध्यक्षीय कार्यकाळात अमेरिकेच्या मुलकी सेवांमध्ये काही मूलभूत सुधारणा घडून आल्या. अध्यक्षपदावर निवडून येण्याअगोदर हेस ओहायोत लोअर सॅंडस्की (आताचे फ्रीमॉंट) येथे वकिली करत असे. इ.स. १८५८ त्व इ.स. १९६१ या काळात तो सिनसिनाटीचा नगर-सॉलिसिटर होता. अमेरिकन यादवी युद्धास आरंभ होताच राजकीय व वकिली कारकीर्द सोडून हेस उत्तरेकडील संस्थानांच्या युनियन सैन्यात भरती झाला. यादवी युद्धात पाच वेळा जखमी झाला असला, तरी त्याने मोठा पराक्रम गाजवत मेजर जनरल पदापर्यंत बढती मिळवली. यादवी युद्धानंतर इ.स. १८६५ ते इ.स. १८६७ या काळात तो रिपब्लिकन पक्षातर्फे अमेरिकन प्रतिनिधिगृहात निवडून गेला. इ.स. १८६७ साली प्रतिनिधिगॄहातील सदस्यत्व सोडून तो ओहायोच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीस उभा राहिला व इ.स. १८६७ साली पहिल्यांदा, तर इ.स. १८७१ साली दुसऱ्यांदा, अश्या दोन कार्यकाळांसाठी गव्हर्नरपदी बसला. गव्हर्नरपदाचा दुसरा कार्यकाळ संपल्यावर त्याने पुन्हा काही काळ वकिली केली. परंतु इ.स. १८७५ साली राजकारणात पुन्हा प्रवेश करत तिसऱ्यांदा ओहायोचा गव्हर्नर बनला.

रदरफोर्ड बर्चर्ड हेस
रदरफोर्ड बी. हेस: अमेरिकन राजकारणी

सही रदरफोर्ड बी. हेसयांची सही

बाह्य दुवे

  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2013-05-13. 2011-09-19 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ६, २०१० (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  • "रदरफोर्ड बी. हेस: अ रिसोर्स गाइड (रदरफोर्ड बी. हेस: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

अमेरिकन यादवी युद्धअमेरिकेची संयुक्त संस्थानेअमेरिकेच्या प्रतिनिधींचे सभागृहइंग्लिश भाषाओहायोरिपब्लिकन पक्ष (अमेरिका)सिनसिनाटी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

साईबाबापिंपळरविकिरण मंडळछत्रपती संभाजीनगर जिल्हागूगलसतरावी लोकसभा२०२४ लोकसभा निवडणुकालीळाचरित्रअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघएप्रिल २५मराठी व्याकरणतरसबलवंत बसवंत वानखेडेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनादूरदर्शनप्राजक्ता माळीभारतकोल्हापूरमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेब्राझीलची राज्येदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील स्थानिक शासनवि.वा. शिरवाडकरनेतृत्वनिलेश लंकेविवाहएकविरामहाराष्ट्रातील किल्लेपांडुरंग सदाशिव सानेधनुष्य व बाणभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहितासामाजिक कार्यभारूडहवामान बदलसेवालाल महाराजभारताचा इतिहासलिंग गुणोत्तरबहावामहाराष्ट्रातील आदिवासी समाजदिवाळीकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघशिवाजी महाराजांची राजमुद्रारामपारू (मालिका)भरड धान्यसूर्यमालाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीभगवद्‌गीतालोकमान्य टिळकमातीकुष्ठरोगदशावतारविधानसभाशाश्वत विकासप्रहार जनशक्ती पक्षसंत जनाबाईगोदावरी नदीनैसर्गिक पर्यावरणईशान्य दिशाभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तबाळ ठाकरेप्रकल्प अहवालतुळजापूरनीती आयोगभारत सरकार कायदा १९१९करमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीभारतीय संस्कृतीहिवरे बाजारसोलापूर लोकसभा मतदारसंघखंडोबामहात्मा गांधीलोणार सरोवरनाटकमराठी भाषेमधील वृत्तपत्रेमुलाखत🡆 More