मेरी क्युरी

मारिया स्क्लोदोव्स्का-क्युरी, Maria Salomea Skłodowska-Curie (७ नोव्हेंबर, इ.स.

१८६७">इ.स. १८६७ - ४ जुलै, इ.स. १९३४) या शास्त्रज्ञ होत्या. इ.स. १९०३ साली पदार्थ विज्ञानातील (भौतिकशास्त्र) संशोधनामुळे व इ.स. १९११ साली रसायनशास्त्रातील संशोधनामुळे दोन वेळा नोबेल पारितोषिकाने सन्मानित होण्याचा मान मेरी क्युरी यांच्याकडे जातो.

मेरी क्युरी
मेरी क्युरी
मेरी क्युरी हिचे इ.स. १९११ मधील नोबेल पारितोषिकावेळचे प्रकाशचित्र
पूर्ण नावमारिया स्क्लोदोव्स्का-क्युरी
जन्म नोव्हेंबर ७, इ.स. १८६७
वॉर्सा, पोलंड
मृत्यू जुलै ४, इ.स. १९३४
सॉंसेलमोत्स, फ्रान्स
निवासस्थान पोलिश मेरी क्युरी
फ्रेंच मेरी क्युरी
धर्म नास्तिक
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र
कार्यसंस्था सोर्बोन
प्रशिक्षण सोर्बोन
ईएसपीसीआय
डॉक्टरेटचे मार्गदर्शक ऑन्‍री बेकेरेल
डॉक्टरेटकरता विद्यार्थी आंद्रे-लुई डेबिएर्न
मार्गरीटा पेरे
ख्याती किरणोत्सर्ग
पुरस्कार मेरी क्युरी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (१९०३)
मेरी क्युरी रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक (१९११)
पती पिएर क्युरी
अपत्ये इरेन जुलिओ-क्युरी, एवा क्युरी

जन्म व बालपण

मेरी क्युरी यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८६७ साली पोलंड देशाची राजधानी वॉर्सामध्ये एका अत्यंत अशा गरीब कुटुंबात झाला. त्यांचे मुळ नाव मारिया स्क्लोडोव्ह्स्का असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव वाल्दिस्लाव असे होते. ते गणितविज्ञान या विषयांचे शिक्षक होते. मेरी क्युरी यांच्या आईचे नाव, ब्रोनिस्लावा असे होते. त्या शिक्षिका व उत्तम पियानोवादक होत्या. मेरी क्युरी यांना जोसेफ, जोफिया, हेलेना, ब्रोनिस्लावा ही भावंड होती. मेरी क्युरी यांच्या आईंना क्षयरोग झाला होता. त्यामुळे मेरी क्युरी यांना त्यांची साथ फार काळ लाभली नाही. ९ मे १८७८ साली मेरी क्युरी यांच्या आईचा मृत्यू झाला.

विवाह

२६ जुलै इ.स. १८९५ साली त्यांचा विवाह पिएर क्युरी या संशोधकाशी झाला.

संशोधन व कार्य

वयाच्या सोळाव्या वर्षी तिने शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ह्यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात क्ष-किरण व्हॅन उभारली, क्ष-किरण यंत्रे पुरवली तसेच क्ष-किरण यंत्रे चालविण्याचे प्रशिक्षणही दिले. कॅन्सर या आजारावर काम करण्यासाठी मेरी क्युरीने रेडियम संशोधन संस्था उभारली होती. याच संस्थेत मेरी क्युरी यांची मुलगी आयरीन क्युरी सुद्धा सक्रिय होती. पुढे आयरीन क्युरीलाही नोबेल पारितोषिक मिळाले. किरणोत्सारीता या शब्दाचे श्रेय मेरी क्युरी यांच्याकडे जाते. मेरी आणि पिएर क्युरी या दोघांनी पिचब्लेंडसारखी खनिजे युरेनियमपेक्षाही जास्त प्रमाणात बेक्वेरल किरण उत्सर्जित करतात हे दाखवून दिले. मेरीने पिचब्लेंडमधून मोठ्या प्रमाणात किरणोत्सार करणारा पदार्थ वेगळा करून एका नवीन मूलद्रव्याची भर घातली. या नवीन मूलद्रव्यास मेरीने आपल्या पोलंड देशावरून पोलोनियम असे नाव दिले. पुढे मेरी आाणि पिएर क्युरी यांना पोलोनियमपेक्षाही जास्त किरणोत्सारी रेडियम नावाचे मूलद्रव्य सापडले. रेडियम हे युरेनियमपेक्षा १६५० पट जास्त किरणोत्सारी आहे. एक ग्रॅम रेडियममून दर सेकंदाला जितका किरणोत्सार बाहेर पडतो त्याला १ क्युरी किरणोत्सार असे म्हटले जाते.

मृत्यू

मेरी क्युरी यांचा मृत्यू ४ जुलै १९३४ या दिवशी रेडिएशनमुळे झालेल्या ल्युकेमियाने झाला.

मेरी क्युरी यांची चरित्रे

पुरस्कार

नोबेल पारितोषिक पटकावणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. तसेच दोन नोबेल पारितोषिके मिळवण्याचा पहिला मानही त्यांनी मिळवला.

  • भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक (इ.स. १९०३)
  • डेव्ही पदक (इ.स. १९०३)
  • मात्तॉय्ची पदक (इ.स. १९०४)
  • इलियत क्रेसन पदक (इ.स. १९०९)
  • रसायनशास्त्रात नोबेल (इ.स. १९११)

बाह्यदुवे


Tags:

मेरी क्युरी जन्म व बालपणमेरी क्युरी विवाहमेरी क्युरी संशोधन व कार्यमेरी क्युरी मृत्यूमेरी क्युरी यांची चरित्रेमेरी क्युरी पुरस्कारमेरी क्युरी बाह्यदुवेमेरी क्युरीइ.स. १८६७इ.स. १९०३इ.स. १९११इ.स. १९३४नोबेल पारितोषिकभौतिकशास्त्ररसायनशास्त्रशास्त्रज्ञ४ जुलै७ नोव्हेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अमरावती जिल्हाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाभारताचे राष्ट्रपतीतरसमुलाखतस्त्री सक्षमीकरणतबलाभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रामौर्य साम्राज्यशिवराम हरी राजगुरूतुळजाभवानी मंदिरहार्दिक पंड्याआंबाजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)तिरुपती बालाजीजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढजिजाबाई शहाजी भोसलेवेदभारतातील शेती पद्धतीशेळी पालनराजगडनाणेसमीक्षागाडगे महाराजरेडिओजॉकीढेमसेभारताचा स्वातंत्र्यलढासापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य फरकरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघव्यवस्थापनमार्च २८समाज माध्यमेयशवंत आंबेडकरनामदेवगोंधळविहीरज्योतिबा मंदिरमराठा साम्राज्यखान अब्दुल गफारखानमराठा आरक्षणभारतीय अंतराळ संशोधन संस्थामहाराष्ट्रातील घाट रस्तेछगन भुजबळभारतअकोला जिल्हासंवादभारतीय रिझर्व बँकमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीजळगाव जिल्हाहिंदू धर्मपूर्व दिशाकांदाफुफ्फुसमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थासाखरचौथ गणेशोत्सवरवींद्रनाथ टागोरकार्ल मार्क्सअण्णा भाऊ साठेचिमणीमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहितामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीनीती आयोगचंद्रयान ३हिरडामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीखेळमंगळ ग्रहपहिले महायुद्धपेशवेक्रियापदतोरणाशब्द सिद्धीजन गण मन🡆 More