बुद्धांनी सांगितलेले पाच अडथळे

गौतम बुद्ध यांनी मानवाच्या ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ मार्गातले पाच अडथळे किंवा पाच विषे सांगितलेली आहेत.

तथागतांनी २६०० वर्षापुर्वी सदाचार मार्गातील तसेच अंतीम सत्याकडे मार्गक्रमण करू पाहणाऱ्या मनुष्यास येणाऱ्या पाच अडथळयांवरील, बंधनावरील उपाय सांगीतलेले आहेत. हे पाच अडथळे किंवा बंधने म्हणजेच धम्ममार्गातील पाच विषे होत. यावर तथागतांनी उपायही सांगीतलेला आहे. तो येणे प्रमाण केल्यास ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असेच होईल, अशी बौद्धांत मान्यता आहे. ही पाच अडथळे ध्यानाद्वारे नष्ट करता येतात. ती पाच अडथळे खालीलप्रमाणे आहेत.

  1. अस्थिरता
  2. तृष्णा
  3. द्वेश
  4. अहंकार
  5. अविद्या

अस्थैर्य

अस्थैर्य किंवा अस्थिरता म्हणजेच धरसोडवृत्ती, जीवनात किंवा कोणत्याही कामात मन नसणे ह्यावर उपाय म्हणजे आनापान सती ध्यान. या ध्यानाने चित्ताची एकाग्रता होवुन चित्त कुशलावर व केवळ कुशलावर एकाग्र होते. बुद्धप्रवाहाचा प्रवाह माणसाच्या जीवनात प्रवाहीत होतो. माणसाचे जीवन ज्ञानाच्या प्रकाषाने प्रवाहीत होवुन सर्वोच्च ज्ञान प्राप्त झाल्यामुळे १) चख्खु उद्पात्रीत्र्त्राण, २) उदापात्री पत्र्त्रा, ३) उद्पादी, ४) विज्जाउद्पादी, ५) आलोका.

उद्पादी म्हणजेच धम्मचक्षुचा उदय, ज्ञानाचा उदय, प्रज्ञेचा विकास, विदयेचा उदय, प्रकाशाचा उदय होतो. अशाप्रकारे माणसाची प्रबुद्ध मानव होण्याची क्षमता या ध्यानात आहे. आनापान सती ध्यान म्हणजेच बुद्धत्वावर मन केंद्रीत करणे त्याने जीवन व मानवी मन सागरासारखे सुंदर व प्रशांत होते तर, आकाशासारखे विस्तार पावते.

तृष्णा

तृष्णा ही मानवाला पुन्हा पुन्हा जन्म घेण्यास भाग पाडते. तृष्णा तीन प्रकारची आहे — १) काम तृष्णा २) भव तृष्णा ३) विभव तृष्णा. पुन्हा या तीन प्रकारच्या तृष्णेचे दोन भागात विभाजण होते — १) लौकिक अन, २) आध्यात्मिक म्हणजेच तृष्णा ह्या सहा प्रकारच्या झाल्या. या सहा प्रकारच्या तृष्णा षडायतन मध्ये गेल्यास ३६ तृष्णा होतात. षडायतन म्हणजेच सहा इंद्रिये होय, यातील पाच तर ज्ञानेंद्रीय (कान, नाक, डोळा, जिभ आणि त्वचा) व एक मानसिक म्हणजेच आपले मन होय. अश्या या ३६ तृष्णा तीन काळामध्ये मिळुन एकूण १०८ तृष्णा होतात. हे माणसाला समजले तर नित्य सम्यक व्यायाम करणे किती गरजेचे आहे हे समजते. रूद्राक्षाच्या माळेची गरज नसुन तृष्णा म्हणजेच आग होय. ही आग विझवण्यासाठी ध्यान धारणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी शरीरातील बत्तीस भागांवर अशुभाची भावना करणे (अ) प्रेताच्या दहा अवस्थांवर चिंतन करणे आणि (ब) स्मशानावरील ध्यान करणे हे दोन्ही ध्यान करण्या आधी स्वतःवर खुप मैत्री केली पाहिजे अन्यथा निराशा व स्वतःप्रतीच घृणा निर्माण होते. रितसर व स्वतःवर मैत्री असल्याने शरीरातील बत्तीस भागावर अशुभाची भावना करीत हे दोन्ही ध्यान केल्याने तृष्णा कमी होते.

द्वेश

द्वेशावरील उपाय म्हणजेच मैत्री ध्यान होय. मैत्रीभावना व मेत्ताभावना, स्वतःवर, मित्रावर, त्रयस्थावर, व शत्रुवर मैत्री या प्रमाणे क्रमाक्रमाणे तिचा विकास करीत विश्वातील सर्व सजीवांवर मैत्री करणे हा मैत्री ध्यानाचा उद्देश असल्याने मानवाच्या विधायक भावना अधिक उन्नत होवुन विस्तारीत जाते. मानव इतरांप्रती व स्वतःप्रती जागृत राहुन संवेदनशील बनतो. त्याचा तरतम्यभाव नष्ट होतो. समतेच्या अभिवृद्धीसाठी मैत्रीध्यान आवश्यक आहे.

अहंकार

अहंकार व मान घालवण्यासाठी अनित्य व अनात्मवादाचा सिद्धान्त समजावुन घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सहा धातुंवरील ध्यान करणे महत्त्वाचे आहे. हे सहा धातू म्हणजेच ज्याच्यामुळे मानवी शरीर बनले आहे — १) पृथ्वी, २) आप (पाणी), ३) तेज (उर्जा), ४) वायु, ५) अवकाश किंवा पोकळी आणि ६) विज्ञान. आपले अस्तीत्व हे स्वयंभु नसुन ते प्रकृतीतील या सहा घटकांपासुन बनलेले आहे. तसेच त्याचा विलय सुद्धा या सहा घटकांतच होतो हे पूर्ण सत्य जाणुन ध्यान करणे. ‘मी’ म्हणजेच स्वयंभु आहे. आत्मा आहे सुद्धा भावना या ध्यानाने नष्ट होते आणि आपले खरेखुरे दर्शन या ध्यानभावनेमुळे होते. त्यामुळे संसाररूपी चक्रातले आपले अस्तीत्व आपला मान, अहंकार, गर्व, अभिमान नष्ट होतो.

अविद्या

बुद्धांनी अज्ञानाला मानवी जीवनातला एक अडथळा मानले आहे. अविद्या म्हणजेच अज्ञान महात्मा फुले यांनी अज्ञानाबद्दल बोलताना म्हटले आहे की "विदये विना मती गेली, मती विना निती गेली, निती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित विना शुद्र खचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले." या अविद्येवरील उपाय म्हणजेच बारा निदानाचे ध्यान होय. मानवी जीवनालाना सुरुवात आहेना अंत आहे, ती एक वर्तृळाकार प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया वेगाने घड्याळाप्रमाणे फिरते या वर्तुळाकार फिरणाऱ्या चक्रालाच भवचक्र, संसारचक्र, किंवा जीवनचक्र असे म्हणतात. याला अशोकचक्र असेही संबोधतात. याला चोवीस कडया किंवा आऱ्या आहेत. अंधारातील अविदया ते दुःख या पर्यंत बारा आऱया आहेत तर प्रकाषातील दुःख ते निर्वाण पर्यंत बारा आऱ्या आहेत. मानवाच्या जीवनात दोन प्रकारचे मार्ग आहेत एक अधोगतीचा आणि दुसरा प्रगतीचा मार्ग. प्रगतीच्या मार्गाने गेल्यास मानवास निर्वाण प्राप्त होते.

तेव्हा अविद्येविषयी म्हणजेच अधोगती विषयी बारा निदान माहीत असणे गरजेचे आहे ते म्हणजेच १) अविद्या, २) संस्कार, ३) विज्ञान, ४) नामरूप, ५) षडायतन, ६) स्पर्ष, ७) वेदना, ८) तृष्णा, ९) उपादान (ग्रहण), १०) भव, ११) जाती (जन्म), १२) दुःख हे ते मानवाच्या अधोगती मार्गातले बारा निदान होत. बारा निदानांच्या ध्यानामुळे अविद्येचे मुळ म्हणजेच अविद्या, अज्ञान नाहीसे करण्याच्या मार्गाचे दर्शन होते. ज्यावेळेस अज्ञान नष्ट होते त्याच वेळेस अंतीम सत्याचे दर्शन होते आणि माणुस अंतीम सत्याकडे मार्गक्रमणा करू लागतो. म्हणजेच कुशल अशा सम्यक मार्गाकडे कुच करतो व तो प्रज्ञावान बनतो.

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अन् प्रकृती या उक्ती प्रमाणे मानवात अशा अनेक प्रवृत्ती किंवा अडथळे विद्यमान आहेत. उपरोक्त सर्व ध्यानांच्या ध्यानधारणेने मानवाने प्रयत्न करून ते अंगीकारले तर मानवाची वाटचाल बुद्धत्वाकडे सुरू होईल व मानव प्रबुद्ध मानव म्हणुन ओळखला जाईल.

संदर्भ

तृष्णा म्हणजे लालसा लालच लोभ मिळवणे प्राप्त करणे अशी वृत्ती होय या वृत्तीमुळे माणूस त्याची समजण्याची वृत्ती नष्ट करतो आज यश धेय्य स्वप्न सहा गोष्टी प्रत्येकजण करत असतो परंतु तेच त्याच्या अधोगतीचे मार्ग असतात धेय्य ठेवावे परंतु ते स्वतःतील बुद्ध बाहेर काढण्यासाठी प्रत्येकाने बुद्ध हे धेय्य ठेवून धम्म मार्गाचे अनुसरण करावे

Tags:

बुद्धांनी सांगितलेले पाच अडथळे अस्थैर्यबुद्धांनी सांगितलेले पाच अडथळे तृष्णाबुद्धांनी सांगितलेले पाच अडथळे द्वेशबुद्धांनी सांगितलेले पाच अडथळे अहंकारबुद्धांनी सांगितलेले पाच अडथळे अविद्याबुद्धांनी सांगितलेले पाच अडथळे संदर्भबुद्धांनी सांगितलेले पाच अडथळेगौतम बुद्ध

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गंगा नदीशिवनेरीउंबरगुळवेलमहाराष्ट्र लोकसेवा आयोगमराठवाडाकार्ल मार्क्सगगनगिरी महाराजमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीशिवाजी महाराजपन्हाळाशहाजीराजे भोसलेआनंद शिंदेआनंद दिघेमुलाखतभारतीय निवडणूक आयोगमायकेल जॅक्सनकोरफडअश्वत्थामादूधसोळा संस्कारशांता शेळकेप्रज्ञा विवर्धन स्तोत्रस्वामी समर्थपुरंदर किल्लासर्वनामहळददेवदत्त साबळेसंगीतातील रागसम्राट हर्षवर्धनमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनबृहन्मुंबई महानगरपालिकानीती आयोगअहमदनगर जिल्हाराजगडलोकसंख्याकाळूबाईरमाबाई आंबेडकरजैन धर्मदादोबा पांडुरंग तर्खडकरलावणीभारतीय संविधानाचे कलम ३७०लोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील शहरांची यादीभारताची जनगणना २०११राष्ट्रपती राजवटक्रिकेटचा इतिहासआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५कुळीथजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)भारतीय रेल्वेराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)शिव जयंतीजॉन स्टुअर्ट मिलआयुर्वेदजागतिक व्यापार संघटनाशेतकरीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेहनुमानसांगली जिल्हापंजाबराव देशमुखराष्ट्रवादजुमदेवजी ठुब्रीकरमराठीतील बोलीभाषामोहन गोखलेवेदब्रिज भूषण शरण सिंगपिंपरी चिंचवडपंचांगगुरुत्वाकर्षणईशान्य दिशाजायकवाडी धरणतापी नदीदादाभाई नौरोजीजिया शंकरवृषभ रासभरड धान्यकोकण रेल्वेपरकीय चलन विनिमय कायदाभारतातील शेती पद्धती🡆 More