निर्वाण

निर्वाण (पाली : निब्बान; प्राकृत : णिव्वाण) ही मोक्षासोबत मनाला मिळणाऱ्या असीम शांतीसाठी भारतीय धर्मांमध्ये वापरली गेलेली प्राचीन संस्कृत संज्ञा आहे.

श्रमण मतात ही दुःखापासून मुक्त झाल्याची अवस्था आहे. हिंदू तत्त्वज्ञानात ही ब्रह्माशी (सर्वोच्च सत्तेशी) झालेल्या एकरूपतेची अवस्था आहे.

निर्वाणाचा शब्दशः अर्थ "विझून जाणे" (मेणबत्तीप्रमाणे) असा होतो आणि बौद्धमताच्या संदर्भात त्याचा अर्थ इच्छा, माया, भ्रम यांच्या आगी विझून गेल्यानंतर मिळणारी मनाची अक्षुण्ण शांतता असा होतो.– भारतीय दर्शन शास्त्रातील नास्तिक दर्शनामध्ये बौद्ध दर्शनाचा समावेश होतो. बौद्ध तत्त्वज्ञानात जीवन विषयक जो विचार मांडला आहे त्यामध्ये निब्बाण – निर्वाण हा शब्द येतो. या शब्दाच्या अनेक अर्थछटा आहेत. त्यातील एक अर्थ समाधान, तृप्ती, सुख, आनंद असाही आहे. वस्तुतः निब्बाण म्हणजे विझणे, नष्ट होणे, मृत्यू, मोक्ष इत्यादी. निर्वाण शब्दा्चे समाधान, तृप्ती, सुख, आनंद हेही अर्थ आहेत. तथागतांनी निब्बान विषयी भंते पटीसेन यांना उपदेश करताना म्हटले जो राखूण बोलतो,विचारांचा संयम करतो,जो आपल्या देहाने दुसऱ्यास उपद्रव करीत नाही असा मनुष्य निब्बान मिळवू शकतो.

बौद्ध तत्त्वज्ञानात निर्वाणाचे उपाधिशेष व निरूपाधिशेष असे दोन प्रकार मानले आहेत.

  1. निरूपाधिशेष निर्वाण – म्हणजे अंतिम मुक्ती, अर्हत पदाची प्राप्ती
  2. उपाधिशेष निर्वाण – मनुष्य जिवंत असताना प्राप्त होणारे निर्वाणपद. जिथे अज्ञान वासनांचा नाश होतो. (संदर्भ - तत्त्वज्ञान कोश)

संदर्भ व नोंदी

Tags:

पालीप्राकृतसंस्कृतहिंदू तत्त्वज्ञान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नालंदा विद्यापीठगाडगे महाराजसह्याद्रीठाणे जिल्हापुंगीभाषामहाराष्ट्रातील किल्लेसुषमा अंधारेभारतीय रेल्वेनर्मदा नदीबटाटापांडुरंग सदाशिव सानेक्रियापदनाटकइंग्लंडच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीअकबरसावित्रीबाई फुलेदादाभाई नौरोजीक्रियाविशेषणसमाजशास्त्रठाणेअयोध्यापालघरकुटुंबनियोजनमानसशास्त्रतणावनगर परिषदमुंबईकुस्तीजवाहरलाल नेहरू बंदरराजेश्वरी खरातभारतीय अंतराळ संशोधन संस्थातरसग्रामपंचायतबौद्ध धर्मशब्द सिद्धीध्यानचंद सिंगलोहगडगोदावरी नदीनर्मदा परिक्रमाग्राहक संरक्षण कायदाइंग्लंड क्रिकेट संघगणपतीमांजरपरशुराम घाटमहाराष्ट्र केसरीलोकसभेचा अध्यक्षमराठी रंगभूमी दिनभीमाशंकरसप्तशृंगी देवीवल्लभभाई पटेलसंवादवि.वा. शिरवाडकरबहिष्कृत भारतसाडेतीन शुभ मुहूर्तहिमोग्लोबिननाटकाचे घटकवीणाभारतामधील उच्च न्यायालयांची यादीगेटवे ऑफ इंडियामेरी क्युरीनातीजाहिरातमूकनायकपुणेनैसर्गिक पर्यावरणमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाराणी लक्ष्मीबाईशहाजीराजे भोसलेसर्वनामशंकर पाटीलबिब्बाजय श्री रामहरीणफुलपाखरूराजकीय पक्षअहवालमानवी हक्कमहाराष्ट्रातील आदिवासी समाज🡆 More