घनता

भौतिकशास्त्रामध्ये पदार्थाची घनता म्हणजे त्या पदार्थाचे वस्तुमान व आकारमान यांचे गुणोत्तर होय.

एखाद्या छोट्या पण जड वस्तूची घनता तेवढ्याच वस्तूमानाच्या मोठ्या वस्तूपेक्षा जास्त असते.

घनता
वेगवेगळ्या घनतेचे द्रव पदार्थ भरलेली परीक्षा नळी

दोन सारख्याच आकारमानाचे डबे घेतले. एका डब्यात काठापर्यंत चुरमुरे भरले व दुसऱ्या डब्यात काठापर्यंत तांदूळ भरले. तांदुळाने भरलेला डबा जड लागतो पण चुरमुऱ्यांनी भरलेला डबा मात्र तुलनेने हलका लागतो. दोन्ही डबे सारख्याच आकाराचे, चुरमुरे तांदळाचेच बनलेले असतात. मग एक डबा हलका व दुसरा जड, असे होण्याचे कारण घनता. चुरमुरे करतांना तांदूळाचा प्रत्येक दाणा फुगतो. म्हणजेच त्याचे आकारमान वाढते. आकारमान वाढल्याने एक डबाभर तांदळाचे सर्व चुरमुरे त्याच डब्यात भरले तर ते त्या डब्यात मावत नाहीत. काही बाहेर राहतात. वस्तुमानाचे एकक ग्रॅम व आकारमानाचे एकक घन सेंटीमीटर म्हणून ग्रॅम प्रति घनसेंटीमीटर हे घनतेचे एकक आहे.

वरील उदाहरणात तांदळाच्या एका दाण्याचे वस्तुमान व त्याचे आकारमान यांचे गुणोत्तर (भागाकार) घेतल्यास काहीतरी संख्या मिळेल. आकारमानातील या वाढीमुळे मूळ तांदळाची घनता व चुरमुऱ्याची घनता यात फरक मिळेल. तांदुळाची घनता जास्त असेल; तर त्या पासून बनलेल्या चूरमुऱ्याची घनता कमी असेल.

वेगवेगळ्या धातूंची घनता वेगवेगळी असते. याचाच दुसरा अर्थ सारख्याच आकारमानाचे वेगवेगळ्या धातूंचे ठोकळे घेतल्यास त्यांचे वस्तुमान भिन्न असेल. त्याचाच तिसरा अर्थ; सारख्याच वस्तुमानाचे वेगवेगळ्या धातूंचे ठोकळे घेतल्यास त्यांचे आकारमान भिन्न असेल. याचे व्यवहारातील उदाहरण बघू. १० ग्रॅम शुद्ध सोन्याचा एक ठोकळा केल्यास, त्याचे आकारमान ०.५२ घनसेंटीमीटर असेल; परंतु तितक्याच वस्तुमानाचा म्हणजे १० ग्रॅम शुद्ध अल्युमिनियमचा ठोकळा केल्यास, त्याचे आकारमान ३.७ घनसेंटीमीटर असेल.

शुद्ध सोन्याची घनता १९.३२ ग्रॅम प्रति घनसेंटीमीटर तर शुद्ध अल्युमिनियमची घनता २.७० ग्रॅम प्रति घनसेंटीमीटर आहे. शुद्ध सोन्याची घनता ही शुद्ध अल्युमिनियमच्या घनतेपेक्षा जास्त आहे. शुद्ध धातूची घनता माहीत असल्याने वस्तुमान व आकारमान मोजून त्या धातूची शुद्धता तपासता येते.


Tags:

आकारमानभौतिकशास्त्रवस्तुमान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मराठी साहित्यआंतरराष्ट्रीय नाणेनिधीसातारा लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र दिनभारतीय संस्कृतीजत विधानसभा मतदारसंघअभंगमहाराष्ट्राचा भूगोलअमित शाहनृत्यज्ञानपीठ पुरस्कारसंयुक्त महाराष्ट्र समितीवाक्यअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षसांगली लोकसभा मतदारसंघअर्थसंकल्पराजरत्न आंबेडकरभरड धान्यआदिवासीभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशबंगालची फाळणी (१९०५)सावता माळीगोवरराजाराम भोसलेप्रीतम गोपीनाथ मुंडेमृत्युंजय (कादंबरी)चंद्रकोल्हापूर जिल्हामहात्मा गांधीनोटा (मतदान)तिथीवित्त आयोगआर्य समाजरेणुकाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकबँकभारताचा इतिहासलोकगीतप्राजक्ता माळीसाम्राज्यवादबच्चू कडूदक्षिण दिशापर्यटनअष्टांगिक मार्गछावा (कादंबरी)जैवविविधताभारतीय राष्ट्रीय काँग्रेसमाहिती अधिकारचोळ साम्राज्यवेदजगातील देशांची यादीदिवाळीनंदुरबार लोकसभा मतदारसंघ२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाबाबासाहेब आंबेडकरनिसर्गआंबेडकर कुटुंबसमाजशास्त्रवसंतराव नाईककर्करोगछत्रपती संभाजीनगरकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघमहालक्ष्मीअमरावतीअमेरिकेची संयुक्त संस्थानेमाढा लोकसभा मतदारसंघसंग्रहालयवर्धा लोकसभा मतदारसंघसंजय हरीभाऊ जाधवपांडुरंग सदाशिव सानेकुटुंबनियोजनज्योतिबा मंदिरघनकचराविजय कोंडकेउच्च रक्तदाबदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघजलप्रदूषणवातावरणशेती🡆 More