फळ किवी

किवी हे हिरवट चॉकलेटी रंगाचे केसाळ आंबट-गोड फळ आहे.

न्यू झीलंडमध्ये किवी नावाचा प्रसिद्ध पक्षी असला तरी हे फळ मुळात न्यू झीलंडमधील नसून चीनमधील आहे. चीनचे हे 'राष्ट्रीय फळ' आहे. याच झाडाला पूर्वी चायनीज गूजबेरी असे म्हणत. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे 'अ‍ॅक्टिनिडिया डेलिसिओसा' (Actinidia deliciosa).

फळ किवी
मोठे आणि लहान किवी फळ
फळ किवी
किवी फळाचे काप

समशीतोष्ण हवामानात किवीची वाढ चांगल्या तऱ्हेने होते. चीन, न्यू झीलंड या देशांप्रमाणेच आता भारतात हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, सिक्कीम, उत्तर प्रदेश, मेघालय या राज्यांत व निलगिरी पर्वत रांगांच्या प्रदेशात किवीचे उत्पन्न घेतले जाते.

लागवड

किवीचा द्राक्षाच्या वेलीसारखा एक वेल असतो. एखाद्या आधारावर या वेली वाढतात. त्यांना फुलेही येतात. नैसर्गिकरीत्या परागीकरण होण्यासाठी किवीची फुले कीटकांना अजिबात आकर्षून घेणारी नसतात. पण या फळाचे उत्पादन घेणारे शेतकरी या फुलांचे परागकण वाफारून फुलांच्या आणि झाडांच्या प्रजजनास मदत करतात.

ज्या भागात किवीची लागवड असेल तेथे माश्या किंवा कीटकांसाठी पोळी तयार करून त्यात माश्या सोडल्या जातात. जवळजवळ एक हेक्टर जागेत मोठी ८ पोळी असे प्रमाण असते. झाड फुलांनी बहरले की माश्या-माश्यांमध्ये फुलातील मध खाण्यासाठी स्पर्धा सुरू होते. या स्पर्धेपोटीच 'परागीकरण' घडविले जाते. वेलींवर एका वर्षांतच फळे धरायला सुरुवात होते. ऑक्टोबर ते डिसेंबर या पिकाचा बहर जास्त असतो. किवीची फळे साधारण कच्ची असतानाच हाताने खुडून काढली जातात. जर योग्य पद्धतीने साठवण केली तर किवी फळ बरेच दिवस राहते.

सेवन

किवी हे फळ बहुगुणी आहे. त्यात क, के आणि ई या जीवनसत्त्वांचे तसेच फॉलिक आम्ल, पोटॅशिअम यांचे प्रमाण भरपूर असते. शरीराला आवश्यक असणारी 'ॲंटीऑक्सिडन्ट्स'देखील असतात. इटली या देशात केलेल्या प्रयोगांतून असेही निष्पन्न झाले आहे की 'किवी' या फळाच्या सेवनामुळे श्वसनाचे विकार, मुख्यत: रात्री येणारा खोकला, श्वासात येणारे अडथळे इत्यादी दूर होण्यास मदत होते.

संदर्भ

किवी फळ कशा प्रकारचे जमिनीवर येते व त्यांच्या बिया किंवा रोप कुठे उपलब्ध होतील?

Tags:

चीनन्यू झीलंड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मानवी शरीरनांदेड लोकसभा मतदारसंघसेंद्रिय शेतीकृष्णलता मंगेशकरक्लिओपात्रामहाराष्ट्र दिनगालफुगीशिवाजी महाराजांची राजमुद्राराज ठाकरेवाचनहातकणंगले लोकसभा मतदारसंघओशोईशान्य दिशास्नायूएकनाथ खडसेदलित एकांकिकाप्रज्ञा विवर्धन स्तोत्रगोपाळ गणेश आगरकरभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तव्यवस्थापननाथ संप्रदायसंस्कृतीसत्यशोधक समाजभीमराव यशवंत आंबेडकरकर्ण (महाभारत)ओमराजे निंबाळकरमहेंद्र सिंह धोनीधृतराष्ट्रसंभाजी भोसलेमहिलांसाठीचे कायदेपुणे जिल्हाभारताची जनगणना २०११जागतिकीकरणगुकेश डीसंदीप खरेज्ञानेश्वरराजगडजागतिक तापमानवाढकोल्हापूरसावित्रीबाई फुलेजालियनवाला बाग हत्याकांडऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघरामटेक लोकसभा मतदारसंघ३३ कोटी देवभारताचा इतिहासगहूभूगोलजालना जिल्हायशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठराष्ट्रवादी काँग्रेस पक्षबहावामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीतरसनाचणीवर्णनात्मक भाषाशास्त्रज्ञानेश्वरीनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघज्वारीभारतीय स्टेट बँकमहात्मा गांधीप्रदूषणभारताचे राष्ट्रचिन्हबुलढाणा विधानसभा मतदारसंघअमेरिकेची संयुक्त संस्थानेविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीसावता माळीॐ नमः शिवायमहाभारतपूर्व दिशानामउदयनराजे भोसलेनांदेडभाऊराव पाटीलबडनेरा विधानसभा मतदारसंघप्रेमकालभैरवाष्टकऊस🡆 More