एझ्रा पाउंड

एज्रा वेस्टन लूमिस पाउंड (३० ऑक्टोबर, १८८५ - १ नोव्हेंबर, १९७२) हे एक अमेरिकन कवी आणि समीक्षक होते.

१८८५">१८८५ - १ नोव्हेंबर, १९७२) हे एक अमेरिकन कवी आणि समीक्षक होते. ते आधुनिकतावादी कविता चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व, आणि एक फॅसिस्ट सहानुभूतीवादी होते. त्यांच्या कवितेच्या योगदानाची सुरुवात त्यांच्या इमॅजिसम पासून झाली. इमॅजिसम ही एक चळवळ आहे जी शास्त्रीय चीनी आणि जपानी कवितांपासून तयार केलेली होती. यात स्पष्टता, सुस्पष्टता, संक्षिप्तता आणि भाषेचा काळजीपुर्वक वापर करण्यावर भर दिला जातो. त्यांच्या कामांमध्ये रिपोस्टस (१९१२), ह्यू सेल्विन मॉबरली (१९२०) आणि अर्धवट १२०-भागाचे महाकाव्य, द कॅन्टोस (१९१७ – १९६९) यांचा समावेश आहे.

२० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात पाउंडने लंडनमध्ये अनेक अमेरिकन साहित्यिक मासिकांचे परदेशी संपादक म्हणून काम केले आणि टी. एस. इलियट, जेम्स जॉयस, रॉबर्ट फ्रॉस्ट आणि अर्नेस्ट हेमिंग्वे सारख्या समकालीन लोकांचे कार्य शोधून काढण्यास मदत केली. पहिल्या महायुद्धाच्या नरसंहारामुळे संतप्त झालेल्या पाउंडचा ग्रेट ब्रिटनवरील विश्वास कमी झाला. त्यांच्या मते युद्धासाठी उसने घेतलेल्या मुद्दलाचे व्याज आणि आंतरराष्ट्रीय भांडवलशाही जबाबदार होती. इ.स.१९२४ मध्ये ते इटलीला गेले. १९३० आणि १९४० च्या दशकात त्यांनी बेनिटो मुसोलिनीच्या फॅसिझमचा स्वीकार केला, अ‍ॅडॉल्फ हिटलरला पाठिंबा दर्शविला आणि ब्रिटीश फॅसिस्ट सर ओसवाल्ड मॉस्ले यांच्या मालकीच्या प्रकाशनांसाठी लिखाण केले. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी, इटालियन सरकारने अमेरिका, फ्रॅंकलिन डी. रूझवेल्ट आणि यहुदी लोकांवर टीका करण्यासाठी त्यांना पैसे दिले. हे काम त्यांनी शेकडो रेडिओ प्रक्षेपणाद्वारे केले. या कारणास्तव अमेरिकेच्या सैन्याने इटलीमध्ये देशद्रोहाच्या आरोपाखाली १९४५ मध्ये त्यांना अटक केली होती. त्यानंतर पिसा येथील अमेरिकेच्या सैन्य छावणीत त्याने अनेक महिने नजरकैदेत घालवले. यादरम्यान त्यांना ६-by-६-फूट (१.८ by १.८ मी) आकाराच्या स्टीलच्या पिंजऱ्यात तीन आठवडे ठेवले होते. यामुळे त्यांच्यात मानसिक विकृती निर्माण झाली होती. पुढच्या वर्षी त्यांच्यावर खटला भरण्यास आणि चालवण्यास ते मानसिक रित्या अयोग्य आहेत असे समजून त्यांना १२ वर्षांहून अधिक काळ वॉशिंग्टन, डी.सी. मधील सेंट एलिझाबेथ मनोरुग्णालयात तुरुंगात ठेवले.

इटलीमध्ये कोठडीत असताना पाउंडने कॅंटोसच्या काही भागांवर काम सुरू केले. हे भाग ‘पिसान कॅंटोस’ या नावाने इ.स. १९४८ मध्ये प्रसिद्ध केले गेले. यासाठी त्यांना १९४९ मध्ये काँग्रेसच्या लायब्ररीतर्फे बोलिनजेन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. या पुरस्कारामुळे प्रचंड विवाद झाला होता. त्याच्या सहकारी लेखकांच्या एका मोठ्या मोहिमेमुळे, त्यांना १९५८ मध्ये सेंट एलिझाबेथमधून सोडण्यात आले. त्यानंतर ते मृत्यूपर्यत इटलीमध्येच राहिले. त्यांच्या राजकीय विचारांमुळे हे नक्की आहे की त्यांचे कार्य त्यांच्या हयातीत जितके विवादित होते तितकेच आजही विवादास्पद आहे. इ.स. १९३३ मध्ये टाईम मासिकाने त्यांच्यावर असे विधान केले की "एक मांजर स्वतःहून चालणारी, निर्भय, निराश आणि मुलांसाठी अत्यंत असुरक्षित". हेमिंग्वेने लिहिले: "पाउंडचे सर्वोत्कृष्ट लिखाण कॅंटोसमध्ये आहे" जोपर्यंत साहित्य आहे तोपर्यंत ते टिकेल.

संदर्भ

बाह्यदुवे

Tags:

इ.स. १८८५इ.स. १९७२१ नोव्हेंबर३० ऑक्टोबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जागतिक कामगार दिनविंचूऔरंगजेबअर्थसंकल्पमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीलता मंगेशकरसौंदर्यामराठी भाषाअंगणवाडीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९संजय हरीभाऊ जाधवआर्थिक विकासलोकमतओटराष्ट्रीय रोखे बाजारबावीस प्रतिज्ञाइंदिरा गांधीपृथ्वीअमरावती जिल्हासमीक्षागजानन महाराजभारतीय जनता पक्षबसवेश्वरनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघकोल्हापूर लोकसभा मतदारसंघसातारा विधानसभा मतदारसंघभूकंपकासारपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरछत्रपती संभाजीनगरपरभणीकाळभैरवमाहितीजिल्हा परिषदभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तमहाराष्ट्रातील किल्लेइंडियन प्रीमियर लीगग्रामपंचायतपवनदीप राजनवाशिम जिल्हाराहुल कुलगुरू ग्रहनगर परिषदहातकणंगले लोकसभा मतदारसंघकोल्हापूर जिल्हाकादंबरीकर्ण (महाभारत)कळसूबाई शिखरशिवाजी महाराजांची राजमुद्रासायबर गुन्हासोलापूर लोकसभा मतदारसंघमाढा लोकसभा मतदारसंघसमुपदेशनशिवसेनाभगवद्‌गीताभारतीय टपाल सेवाशिरूर लोकसभा मतदारसंघसंशोधनप्राथमिक आरोग्य केंद्रसंगणकाचा इतिहासकर्पूरी ठाकुरपुन्हा कर्तव्य आहेवाळामहाराष्ट्रसोळा संस्कारमाहिती अधिकारक्रियापदगृह विभाग (महाराष्ट्र शासन)शहाजीराजे भोसलेपश्चिम दिशाभगवानगडअमित शाहसेरियमटोपणनावानुसार मराठी लेखकपहिले महायुद्धपक्षांतरबंदी कायदा (भारत)वेरूळ लेणी🡆 More