अनंत आत्माराम काणेकर

अनंत आत्माराम काणेकर (जन्म : २ डिसेंबर, इ.स. १९०५; - - ४ मे इ.स. १९८०), हे मराठी कवी, लेखक, व पत्रकार होते. १९३५ ते १९३९ अशी चार वर्षे ते आधी 'चित्रा’ आणि नंतर `आशा’ या साप्ताहिकांचे संपादक होते.

अनंत आत्माराम काणेकर
जन्म नाव अनंत आत्माराम काणेकर
जन्म २ डिसेंबर १९०५
मुंबई
मृत्यू ४ मे १९८०
वांद्रे , मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय अनंत आत्माराम काणेकर
कार्यक्षेत्र साहित्य, लेखन
साहित्य प्रकार कवी, लेखक, पत्रकार
वडील आत्माराम काणेकर

अनंत काणेकर यांचे शालेय शिक्षण मुंबई-गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. मुंबई विद्यापीठातून १९२७मध्ये बी.ए. झाल्यावर त्यांनी १९२९ साली एल.एल.बी.ची पदवी संपादन केली व वकिलीचा व्यवसाय केला. १९३३ मध्ये चांदरात या पहिल्या काव्यसंग्रहाचे आणि पुढील वर्षी पिकली पाने या लघुनिबंध संग्रहाचे प्रकाशन झाल्यानंतर त्यांनी १९३५ साली वकिली पैशाला रामराम ठोकला आणि साहित्य सेवेत स्वतःला वाहून घेतले.

इ.स. १९४१मध्ये अनंत काणेकर हे मुंबईच्या खालसा महाविद्यालयात प्राध्यापक झाले. आणि तेथे पाच वर्षे नोकरी झाल्यावर सिद्धार्थ महाविद्यालयात आले. तेथूनच ते निवृत्त झाले.

`प्रभात’च्या `माणूस’ चित्रपटाचे ते संवादलेखक होते. तसेच नाट्यमन्वंतर या नाट्य संस्थेचे संस्थापक सदस्य होते.

अनंत काणेकर हे मुंबईतील वांद्रे येथील साहित्य सहवास वसाहतीत ’झपूर्झा’ या इमारतीत रहात. काणेकरांच्या निधनानंतरही त्यांच्या पत्नी कमल या तेथे रहात होत्या. कमल काणेकर यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी १८ जानेवारी २००८ रोजी निधन झाले. त्यांना दोन मुली, एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी 'अनन्वय' या अनंत काणेकरांच्या आठवणींच्या पुस्तकाचे संपादन केले.

अनंत काणेकर यांच्या स्मरणार्थ मुंबई विद्यापीठ एक व्याख्यानमाला चालवते.

महाराष्ट्र सरकार ललित लेख असलेल्या एखाद्या पुस्तकाला अनंत काणेकर यांच्या नावाचा पुरस्कार देते. आतापर्यंत हा पुरस्कार मिळालेले लेखक :- १. विनायकदादा पाटील यांना ‘गेले लिहायचे राहून’ या ललितलेखांच्या पुस्तकाला (१९९५) २. गो.पु. देशपांडे (१९९६).३. नागोराव घनश्याम देशपांडे (१९८७), वगैरे.

प्रकाशित साहित्य

काव्यसंग्रह

  • चांदरात, १९३३

लघुनिबंध

  • अनंतिका
  • उघड्या खिडक्या, १९४५
  • तुटलेले तारे
  • पाण्यावरल्या रेषा, १९६५
  • पिकली पाने, १९३४
  • प्रकाशाची वारे, १९७०
  • शिंपले आणि मोती

ललित लेखसंग्रह

  • आचार्य अत्रे विविधदर्शन
  • उजेडाची झाडे
  • घरकुल
  • निवडक गणूकाका
  • विजेची वेल

प्रवासवर्णन

  • आमची माती, आमचे आकाश (१९४९, उत्तर भारत)
  • खडक कोरतात आकाश (१९६४, अमेरिका)
  • गुलाबी प्रकाशात बोलक्या लेखण्या (१९६९, युरोप)
  • धुक्यातून लाल ताऱ्याकडे (१९३७, युरोप व रशिया)
  • देशोदेशीच्या नवलकथा (माहितीपर)
  • निळे डोंगर, तांबडी माती (१९५०, दक्षिण भारत)
  • रक्ताची फुले (१९५९, पंजाब)
  • सोनेरी उन्हात पाचूची बेटे (१९५९, कोलंबो, हॉंगकॉंग)

कथा संग्रह

  • अनंत काणेकर निवडक कथा (भाग १, ..) (पॉकेट बुक्स)
  • काळी मेहुणी व इतर कथा
  • जागत्या छाया
  • दिव्यावरती अंधार
  • मोरपिसे
  • रुपेरी वाळू (रूपककथा)

चित्रपट संवाद

  • माणूस, १९३९
  • आदमी, १९३९

नाटक

  • धूर व इतर एकांकिका
  • सांबर (एकांकिका)
  • निशिकांताची नवरी
  • पतंगाची दोरी

इतर

  • नाट्यमन्वंतर या नाट्यसंस्थेची स्थापना

अनंत काणेकर यांनी लिहिलेली आणि गाजलेली ध्वनिमुद्रित गाणी

अनंत काणेकरांवरील साहित्य

  • अनन्वय (अनंत काणेकर यांच्यावरील लेख, आत्मपर लेखन व भाषण) : (संपादित ग्रंथ)
  • अनन्वय (अनंत काणेकर - जीवन व साहित्य) (संपादिका कमल काणेकर)
  • अनंत काणेकर (चरित्र : लेखक -अच्युत बाळकृष्ण परमानंद)

गौरव

संदर्भ

संदर्भसूची

  • माणूस (चित्रपटाविषयीची नोंद). https://www.marathifilmdata.com/. २७ जून २०१९ रोजी पाहिले.
  • साठे, शरद (संपा.). मराठी ग्रंथसूची. p. ९६७.

Tags:

अनंत आत्माराम काणेकर प्रकाशित साहित्यअनंत आत्माराम काणेकर इतरअनंत आत्माराम काणेकर अनंत काणेकर यांनी लिहिलेली आणि गाजलेली ध्वनिमुद्रित गाणीअनंत आत्माराम काणेकर अनंत काणेकरांवरील साहित्यअनंत आत्माराम काणेकर गौरवअनंत आत्माराम काणेकर संदर्भअनंत आत्माराम काणेकर संदर्भसूचीअनंत आत्माराम काणेकर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जागतिक दिवसशेतकरीजया किशोरीसमासनिसर्गहवामान बदलकवितासोयाबीनऋतुराज गायकवाडवि.वा. शिरवाडकरबाटलीकापूसकावळाझाडकालभैरवाष्टकभारताची अर्थव्यवस्थालातूर लोकसभा मतदारसंघरमाबाई रानडेपंचायत समितीनितीन गडकरीकराड उत्तर विधानसभा मतदारसंघक्रियाविशेषणशिवस्थानिक स्वराज्य संस्थाहळदपोलीस पाटीलनाशिकबाबरमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)अमोल कोल्हेयेसूबाई भोसलेनवग्रह स्तोत्रगौतम बुद्धराजरत्न आंबेडकरप्रकल्प अहवालबहावानागरी सेवाभारताच्या अधिकृत भाषांची यादीहृदयगंगा नदीमहाराष्ट्र शासनपंढरपूरहरितक्रांतीचिपको आंदोलनअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीजगातील देशांच्या राजधान्यांची यादीपुरस्कारराशीअमित शाहमहाड सत्याग्रहकांजिण्याताराबाई शिंदेभारतीय संसदकुर्ला विधानसभा मतदारसंघपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हामहाभारतप्रेमभारत सरकार कायदा १९१९प्राथमिक आरोग्य केंद्रमटकानिलेश लंकेबुलढाणा जिल्हाइतर मागास वर्गदूरदर्शनकुपोषणक्रियापदचाफासिंहगडजीवनसत्त्वबाळखो-खोमहाराष्ट्र गीतसदा सर्वदा योग तुझा घडावामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारगुढीपाडवाहिरडासोनार🡆 More