मॅरिलिन मनरो

मॅरिलिन मनरो (जन्मनाव नॉर्मा जियान मॉर्टेन्सन; १ जून १९२६ - ५ ऑगस्ट १९६२) ही १९५० च्या दशकात अनेक यशस्वी व्यावसायिक बोलपटांमधून प्रसिद्धीस आलेली आणि प्रमुख ‘प्रणय प्रतीक’ बनलेली अमेरिकी अभिनेत्री, मॉडेल व गायिका होती.

मॅरिलिन मनरो
मॅरिलिन मनरो
मॅरिलिन मन्रो
जन्म १ जून १९२६
लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया, अमेरिका
मृत्यू ५ ऑगस्ट १९६२
ब्रेंटवूड, लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया, अमेरिका


मॉडेल म्हणून कारकिर्दीस प्रारंभ केलेल्या मॅरिलीनला सन १९४६ मध्ये एका चित्रपटासाठी ट्वेंटिएथ-सेंच्युरी फॉक्स ने करारबद्ध केले. काही दुय्यम भूमिकांनंतर १९५० मध्ये प्रदर्शित झालेल्या दी ॲस्फाल्ट जंगल आणि ऑल अबाऊट ईव्ह या दोन चित्रपटांमुळे ती प्रसिद्धीस आली. सन १९५२ मध्ये डोंट बॉदर टु नॉक या चित्रपटात तिला मुख्य भूमिका मिळाली. नायगारा या सन १९५३ मधील अतिनाट्यात्मक चित्रपटात तिच्या मादकपणाचा प्रभावी वापर मुख्य भूमिकेत दिसला. ‘डंब ब्लॉंड’ (बुद्धीपेक्षा सौंदर्यावर भर देणारी पिंगट केसांची नायिका) ह्या तिच्या प्रतिमेचा जन्टलमेन प्रिफर ब्लॉंड्स (१९५३), हाऊ टू मॅरी अ मिलियेनर (१९५३) व द सेवन इयर इच (१९५५) या चित्रपटांमध्ये करण्यात आला. आपल्या कौशल्यांमध्ये भर घालण्यासाठी ॲक्टर्स स्टुडिओमध्ये जाऊन तिने अभ्यास केला. बस स्टॉप (१९५६) मधील तिच्या भूमिकेचे समीक्षकांनी कौतुक केले आणि गोल्डन ग्लोबचे नामांकन तिला मिळाले. सन १९५९ मधील सम लाइक इट हॉट या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला.

मॅरिलिनच्या आयुष्याची अखेरची वर्षे आजारपण, वैयक्तिक समस्या आणि कामातील कुचराईसाठी उठून दिसतात. मुख्यतः निद्रानाशावर वापरल्या जाणाऱ्या बार्बिट्युरेट्स गटातील औषधांच्या अधिक मात्रेने तिचा झालेला मृत्यू संशयास्पद ठरला. अधिकृतरीत्या ‘बहुधा आत्महत्या’ असे या मृत्यूचे वर्गीकरण झालेले आहे. मृत्यूनंतरच्या काळात तिच्याकडे पॉप व सांस्कृतिक प्रतीक म्हणून तसेच आदर्श अमेरिकी लैंगिक प्रतीक म्हणून बघितले जाते.

Tags:

अभिनेत्रीगायिकाप्रणय प्रतीक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

छत्रपती संभाजीनगर जिल्हापुणे जिल्हाब्राझीलची राज्येॐ नमः शिवायदख्खनचे पठारमहाराष्ट्राचा भूगोलराष्ट्रकूट राजघराणेभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेहृदयचिन्मय मांडलेकरसंगणक विज्ञानसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेजिल्हाधिकारीभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेरायगड जिल्हाभारताच्या सरन्यायाधीशांची यादीकापूसमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेपुरातत्त्वशास्त्रसदा सर्वदा योग तुझा घडावाअष्टांगिक मार्गमराठी व्याकरणअजिंठा लेणीप्रकाश आंबेडकरकादंबरीनिबंधभारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७जिंतूर विधानसभा मतदारसंघगाडगे महाराजसुतकतिवसा विधानसभा मतदारसंघभौगोलिक माहिती प्रणालीमराठीतील बोलीभाषामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीआंब्यांच्या जातींची यादीमहिलांसाठीचे कायदेस्वामी विवेकानंदकन्या रासमुळाक्षरहिंगोली जिल्हाज्ञानपीठ पुरस्कारगुकेश डीभोपाळ वायुदुर्घटनाभोवळनेतृत्वॲडॉल्फ हिटलरमराठी भाषाताज महालसोलापूरसूत्रसंचालनदुसरे महायुद्धतुतारीलावणीभारतीय तंत्रज्ञान संस्थाचोखामेळाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसवृषभ रासगुंतवणूकयोगरशियन राज्यक्रांतीची कारणेअल्लाउद्दीन खिलजीभारतीय रिझर्व बँकइतर मागास वर्गबखरवस्तू व सेवा कर (भारत)सोनेशिरूर लोकसभा मतदारसंघविधानसभाअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघमहेंद्र सिंह धोनीकुटुंबनियोजनकुंभ रासज्ञानेश्वरमूलद्रव्य🡆 More