साडी

साडी हे भारतीय महिलांचे मुख्य वस्त्र आहे.

ही जवळजवळ ५ ते १० वार लांबीची असून तो शिवण नसलेल्या वस्तराचा एक लांबट आयताकार तुकडा असतो. साडी ही कमरेला लपेटली (नेसली) जाते. कमरेवरच्या भागावर पोलके (ब्लाऊज) किंवा चोळी (झंपर) घालतात. कोणतीही स्त्री साडीमध्ये सुंदर दिसते. साडी ही वेगवेगळ्या कापडांच्या प्रकारात उपलब्ध असतात.

साडी
प्राचीन ब्रज-मथुरा आणि द्रविडीय परिवारातील स्त्री शिल्पकला अँजेलो २ रे शतक

निऱ्या

साडी कमरेभोवती गुंडाळल्यावर जास्तीचा राहिलेला भाग घड्या घालून नाभीपाशी खोचला जातो त्याला निऱ्या म्हणतात.

काठ

साडीचा जमिनीकडे असणारा तळाचा भाग म्हणजे साडीचा काठ होय. साडीच्या काठावर असणाऱ्या विवक्षित नक्षीमुळे काही साड्यांचे प्रकार सहज ओळखता येतात.

पदर

कमरेला गुंडाळल्यावर उरणाऱ्या साडीच्या आकर्षक तुकड्याला साडीचा पदर, पालव किंवा पल्लू म्हणतात. हा भाग खांद्यावर किंवा डोक्यावर घेतात. काहीजणी त्याला समोरच्या बाजूनेही घेतात. पदराची जास्तीची लांबी कबरेभोवती लपेटतात व उरलेली कमरेशी खोचतात.

प्रकार

भारतातील स्त्रिया वापरतात त्या साडीचे अनेक प्रकार आहेत. काही प्रकारांची नावे साडीच्या रचनेवरून, काठावरून वा तिच्यात वापरलेल्या मालावरून पडतात, तर काही त्या विवक्षित साड्या कुठे बनतात त्या गावाच्या किंवा राज्याच्या नावावरून आहेत. साड्यांची लांबी बेबीसाडी(चारवारी), पाचवारी किंवा गोल साडी, सहावारी किंवा दंडिया, नऊवारी किंवा दहावारी असते. नाशिकच्या सप्तशृंगी देवीला ११ वार साडी लागते. साडीपन्हा हा बेबीसाडी सोडल्यास बहुधा १.२ मीटर, पण क्वचित कमी किंवा जास्त (१.५ मीटर) असतो. साडीला जोडलेला ब्लाऊज पीस असेल तर ब्लाऊज पीसची रुंदी ४४ सेंटिमीटर ते ११२ सेंटिमीटर असते. कापडाच्या मोठ्या गुंडाळीतून कापून मिळालेल्या हव्या त्या लांबीच्या साडीला वायल म्हणतात.


साडीचे प्रकार (दीडशेहून अधिक)

  • अर्धरेशमी
  • ऑरगंडी
  • ऑरगेंझा साडी
  • रुंद काठाची साडी
  • काठा पदराची साडी
  • कोयरीकाठी साडी
  • क्रेप प्रिंटिंगची साडी
  • खडीकामाची
  • गर्भरेशमी
  • चिटाची
  • चिनार
  • चौकटीची साडी
  • छापाची साडी (प्रिंटेड साडी)
  • जरतारी साडी
  • जरीपदरी साडी
  • जरीचे काठ असलेली साडी
  • जाडी भरडी
  • जोडाची साडी (खानदेश)
  • टमटम साडी
  • ठिपक्याची साडी
  • तलम साडी
  • तुकडा साडी
  • दंडिया (सहावारी साडी)
  • नऊवारी साडी
  • नायलॉनची साडी
  • पट्ट्यापट्ट्याची साडी
  • पाचवारी साडी
  • पावडा साडी (हाफ साडी) (तामिळनाडू)
  • प्लॅस्टिक जरीची
  • प्लेन एकरंगी किंवा बहुरंगी साडी
  • बांधणी (राजस्थानी-गुजराथी)
  • वायल
  • रुंद पदराची साडी
  • रेशमी साडी
  • कृत्रिम रेशमी साडी
  • लखनौ चिकन साडी
  • सहावारी साडी (दंडिया)
  • सुती साडी
  • सुरतेची साडी
  • सेलम साडी
  • हातमागाची साडी

रेशमी साड्यांचे प्रकार

  • शिवशाही पैठणी (ही महाराष्ट्राची खासीयत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या येवल्याची शिवशाही पैठणी खूप प्रसिद्ध आहे).
  • आसामी
  • ओरिसी (संबलपुरी, इक्कत, बोमकल साडी)
  • इरकल (कर्नाटक)
  • इक्कत
  • उत्तर प्रदेशची मलबारी सिल्क साडी, जामदानी, जामेवार
  • इंदुरी (मध्य प्रदेश)
  • इरकल (इल्लकल्ल)
  • इरी सिल्कची (इंडी-इरंडी) साडी (आसाम)
  • उपाडा रेशमी साडी (आंध्र प्रदेश)
  • कलकत्ता बंगाली साडी
  • कलमकारी
  • कांचीपुरम (कांजीवरम) (तमिळनाडू)
  • कांठा साडी (बंगाल)
  • छत्तीसगडी कांठा साडी (राॅ सिल्क साडी)
  • कामीन
  • काश्मिरी (आरी काम असलेली) साडी
  • कुर्गी
  • कोईमतूर साडी (तमिळनाडू)
  • कोसा साडी (छत्तीसगड)
  • खंबायती
  • खादीची साडी (सुती आणि रेशमी)
  • गढवाल (आंध्र प्रदेश)
  • गुजराती साडी
  • मध्य प्रदेशची चंदेरी साडी
  • चंद्रकळा/काळी चंद्रकळा
  • चायना सिल्कची साडी
  • चिनाॅन साडी (जम्मू-काश्मीर)
  • जपानी साडी
  • जरदोजी (बंगाल)
  • जरीची/कच्छी जरीकामाची साडी
  • जामदानी
  • जॉर्जेटची साडी
  • जिजामाता
  • भागलपुरी टसर साडी
  • टसर(वाइल्ड सिल्क)ची साडी : ही साडी बंगालमधील श्रीकलाहस्ती नावाच्या गावात बनते. शेळीच्या दुधाचा वापर करून साडीवर लेखणीने रंगीत नक्षी किंवा चित्रे काढतात. शेंदूर, काजळ, गूळ, जायफळ व हळद यांसारख्या नैसर्गिक गोष्टी वापरून साडीवर रंग भरतात. या साडीवर अनेकदा लग्नाच्या वरातीचे पॆंटिंग असते. टसर साडीला दुधाचा सुगंध येतो, तो साडी अनेकदा धुतल्यानंतरही नष्ट होत नाही.
  • ढाका साडी
  • ढाका मसली साडी
  • राॅ ढाका साडी
  • तंगाईल (जामदानी-पश्चिम बंगाल)
  • तंचोई,तंछोई
  • तबी (टॅबी) सिल्क साडी
  • तुर्की साडी
  • त्रावणकोर
  • दुहेरी पाटन पटोला
  • धर्मावरम (आंध्र प्रदेश)
  • धारवाडी (कर्नाटक)
  • घीचा सिल्क साडी : उत्तम दर्जाच्या नैसर्गिक रेशमापासून ही साडी बनते. साडीचे रूप चकचकीत (Glossy) असते. साडी खूप टिकते. साडी अत्यंत मुलायम व वजनाने हलकी असते, धुतल्यावर आटत नाही. घीचा रेशीम हे टसर सिल्कचे एक बायप्राॅडक्ट आहे. टसर सिल्कच्या ज्या कोशांमध्ये रेशमाचे धागे नैसर्गिकरीत्या मिळत नाहीत त्या कोशांना भोक पाडून त्याच्यातून हातांचा वापर करून घीचा रेशीम काढतात. घीचा सिल्क साड्या बिहार, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांत बनतात. . या साडीवर हल्ली संगमरवरी छपाई करू लागले आहेत. त्यासाठी साडी बारा तास पाण्यात भिजवून वाळल्यावर तिच्यावर लॅमिनेशन करतात.
  • नारायण पेठ
  • पटोला
  • पूना साडी
  • पेशवाई नऊवारी लुगडे
  • पोचमपल्ली (आंध्र प्रदेश)
  • फुलकारी (पंजाब)
  • बंगलोरी
  • बंगाली साडी
  • राजस्थानी बंधेज साडी
  • बनारसी शालू
  • बालुचारी (बंगाल)
  • बिहारची ऑर्गॅनिक टसर साडी
  • बुट्ट्याची साडी
  • बेळगाव साडी
  • भरजरी
  • मंगलगिरी साडी (आंध्र प्रदेश)
  • मदुराई (केरळ)
  • मलबारी साडी
  • महेश्वरी (मध्य प्रदेश)
  • मालेगावची साडी
  • मिलची साडी
  • मुंगा सिल्कची साडी (ही साडी आसाममध्ये बनते. मुंगा सिल्कला रंगवता येत नाही, म्हणून ही साडी फक्त क्रीम रंगात असते.)
  • यंत्रमागावरची साडी
  • येवल्याची साडी
  • राजस्थानी साडी
  • शुद्ध रेशमी साडी
  • लखनवी
  • लुगडे
  • वारसोवा साडी
  • विष्णूपुरी
  • व्यंकटगिरी
  • शावारी साडी
  • श्रावणकोर
  • संगमनेरी प्रिंटेड साडी
  • ओरिसाची संबळपुरी/संभलपुरी साडी
  • सासर-माहेर साडी
  • सुंगडी (मदुराई)

साडी नेसण्याचे प्रकार

  • शायना एन.सी. या बाई पाचवारी साडी नेसण्याचे ५५ प्रकार शिकवतात.
  • दिल्लीची एक संस्था साडी नेसण्याचे १२५ प्रकार शिकवण्याचा दावा करते.
  • २८ मार्च २०१२ रोजी नाशिक येथे एका कार्यशाळेत, साडी डे्पिंगमधील तज्ज्ञ नूतन मेस्त्री यांनी उपस्थित महिलांना महाराणी, कुर्गी, टर्की, सासर - माहेर, वार्सोवा, जपानी, नऊवारी, सहावारी या साड्या कशा नेसायच्या हे प्रात्यक्षिकांसह शिकवले होते. साडी केवळ नेसायची कशी हेच नाही, तर प्रत्येक साडी विशिष्ट स्टाईलमध्ये कशी नेसायची याचीही माहिती यावेळी दिली गेली. खादीपासून ते कांजीवरमपर्यंत विविध प्रकारच्या साड्या नेसताना कोणती काळजी घ्यावी याचेही मार्गदर्शन या वर्कशॉपमध्ये केले गेले. असेच एक वर्कशॉप महाराष्ट्र टाइम्सतर्फे २४ जानेवारी २०१२ला आयोजित झाले होते.

Tags:

साडी निऱ्यासाडी काठसाडी पदरसाडी प्रकारसाडी चे प्रकार (दीडशेहून अधिक)साडी रेशमी साड्यांचे प्रकारसाडी नेसण्याचे प्रकारसाडी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

प्रतापराव गणपतराव जाधवब्राझीलची राज्येधनु रासजगातील देशांची यादीभारतीय निवडणूक आयोगपन्हाळालता मंगेशकरसम्राट अशोक जयंतीदेवेंद्र फडणवीसभद्र मारुतीत्र्यंबकेश्वरशहाजीराजे भोसलेपक्षीपारनेर विधानसभा मतदारसंघसूत्रसंचालनमहाराष्ट्र भूषण पुरस्कारनितीन गडकरीबलुतेदारॲडॉल्फ हिटलरकराड उत्तर विधानसभा मतदारसंघविष्णुसहस्रनामकोल्हापूर लोकसभा मतदारसंघवंचित बहुजन आघाडीहिंदू धर्मपुरस्कारसुशीलकुमार शिंदेक्रियापदस्वामी समर्थमहाराष्ट्र शासननवनीत राणामराठी भाषेमधील साहित्यिकांची यादीपृथ्वीगांडूळ खतशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीवाघहवामानविद्यमान भारतीय राज्यपालांची यादीपळसकोरेगावची लढाईभारतलोकगीतलोकमतगजानन दिगंबर माडगूळकरजालना लोकसभा मतदारसंघसोवळे (वस्त्र)ओवामराठीतील बोलीभाषामहात्मा गांधीभारतीय संविधानाची उद्देशिकाअर्जुन वृक्षपुन्हा कर्तव्य आहेरामरक्षाशुभं करोतिनाथ संप्रदायसातवाहन साम्राज्यकुंभ रासअन्नप्राशनमहाराष्ट्रातील किल्लेहिंदू लग्नढेकूणसकाळ (वृत्तपत्र)लोणार सरोवरसोळा संस्कारजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)अकोला लोकसभा मतदारसंघटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीअमेरिकेची संयुक्त संस्थानेपंचशीलगोंधळभगवानबाबान्यायपेशवेनांदेड लोकसभा मतदारसंघघनसावंगी विधानसभा मतदारसंघटी.एन. शेषनमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाइतिहास🡆 More