विश्वास नांगरे पाटील

विश्वास नांगरे पाटील (१ जून १९७३) हे भारतीय पोलीस सेवेतील एक अधिकारी आहेत.

सध्या ते महाराष्ट्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) होते. त्याआधी ते नाशिक शहराचे पोलिस आयुक्त होते. पाटील यांनी १९९७ मध्ये प्रशिक्षण पूर्ण केले.

विश्वास नारायण नांगरे-पाटील
विश्वास नांगरे पाटील
जन्म कोकरूड
१ जून १९७३
कोकरूड, शिराळा तालुका, सांगली जिल्हा
राष्ट्रीयत्व भारतीय
वांशिकत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बी.ए.,एम ए, एम.बी.ए.एल.एल बी
प्रशिक्षणसंस्था शिवाजी विद्यापीठ, उस्मानिया विद्यापीठ
पेशा भारतीय पोलिस सेवा (भा.पो.से.)
कारकिर्दीचा काळ १९९७ पासून
प्रसिद्ध कामे २६/११
मूळ गाव कोकरूड
पदवी हुद्दा पोलिस सहआयुक्त(कायदा व सुव्यवस्था), मुंबई
धर्म हिंदू धर्म
जोडीदार रुपाली नांगरे-पाटील
अपत्ये जान्हवी, रणवीर
वडील नारायण नांगरे-पाटील
पुरस्कार राष्ट्रपती शौर्य पदक (२०१३)


२०१५ मध्ये त्यांना २००८ च्या मुंबई हल्ल्यादरम्यान दहशतवादविरोधी कारवायांमधील त्यांच्या भूमिकेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक (शौर्य) प्रदान करण्यात आले.

सुरुवातीचा काळ आणि शिक्षण

विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म बत्तीस शिराळा या तालुक्यातील कोकरूड गावी झाला. त्यांचे वडील गावाचे सरपंच होते. त्यांनी आपले शालेय शिक्षण तालुक्यातील विद्यालयात पूर्ण केले आणि ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून इतिहास विषयात बी.ए.ची परीक्षा सुवर्ण पदक पटकावून उत्तीर्ण झाले. उस्मानिया विद्यापीठातून एम.बी.ए.ची पदवी घेऊन त्यांनी पुढे प्रशासकीय अभ्यासक्रमाला सुरुवात केली.•आपल्या शालेय जीवनात विश्वास नांगरे पाटील हे खूप हुशार होते. दहावी मध्ये असताना त्यांचा तालुक्यात पहिला क्रमांक आला होता.महाविद्यालयात असताना बारावीला चांगले गुण मिळाले असताना देखील विश्वास नांगरे पाटील यांनी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी अभियांत्रिकीला न जाता कला शाखेला प्रवेश घेतला होता.महाविद्यालयात असताना त्यांना महाविद्यालयाचा उत्कृष्ट विद्यार्थी हा पुरस्कार देखील मिळाला आहे. [ संदर्भ हवा ]

कामगिरी

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण

पुणे जिल्हा ग्रामीण पोलीसदलात अधीक्षक असताना पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी केलेल्या कारवाईमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. पुणे ग्रामीण पोलिसांनी सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील शेतात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर ४ मार्च २००७ला छापा टाकून २८७ तरुण-तरुणींना(२१ तरुणीं) अटक केली होती. प्रयोगशाळेत झालेल्या रासायनिक पृथक्करण अहवालानुसार त्यातील २४९ जणांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले होते.

२६/११चा दहशतवादी हल्ला

२६/११च्या मुबंई हल्ल्याच्यावेळी ताजमहाल हॉटेलमध्ये पोहचणाऱ्या पहिल्या अधिकाऱ्यांपैकी ते एक होते.[ संदर्भ हवा ] सोबत दोन कॉन्स्टेबल आणि एक अंगरक्षक तसेच अंगावर सुरक्षाकवच(बुलेटप्रुफ जाकीट) नसतांनाही ते गोळीबार सुरू असलेल्या ताजमध्ये शिरले.[ संदर्भ हवा ] प्रतिकारासाठी त्यांनी ९ एमएम पिस्तुलातून गोळीबार केला. दहशतवाद्यांचा पाठलाग करत ते सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचले. त्यांच्या या कारवाईने दहशतवाद्यांना ताजमहाल हॉटेल नवीन इमारतीत जाण्यापासून रोखले[ संदर्भ हवा ]. त्यानंतर नांगरे-पाटील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कंट्रोल रूममध्ये पोहोचले व सीसीटीव्हीच्या मदतीने दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती वरिष्ठांना देत राहीले. [ संदर्भ हवा ]सकाळी सात वाजता एनएसजीचे कमांडो कारवाईत प्रत्यक्षात सहभागी होईपर्यंत विश्वास नांगरे-पाटील यांची लढाई सुरू होती.[ संदर्भ हवा ]

कारकीर्द

  • अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक(अज्ञात दिनांक - २८ नोव्हेंबर २००५)
  • पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक(२९ नोव्हेंबर इ.स. २००५ - ३ जून इ.स. २००८)
  • मुंबई पोलीसदल उपायुक्त (४ जून इ.स. २००८- ?)
  • ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
  • अप्पर पोलीस आयुक्त, मुंबई दक्षिण विभाग
  • नाशिक पोलीस आयुक्त
  • सद्यस्थितीत पोलीस सहआयुक्त(कायदा व सुव्यवस्था), मुंबई

पुरस्कार

  • राष्ट्रपती शौर्य पदक (२०१३)

संदर्भ

बाह्य दुवे

मन में है विश्वास लोकसत्ता खित 'मन में है विश्वास' या आत्मकथनपर ...

२२ मे, २०१६ - राजहंस प्रकाशनातर्फे पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील .

Tags:

विश्वास नांगरे पाटील सुरुवातीचा काळ आणि शिक्षणविश्वास नांगरे पाटील कामगिरीविश्वास नांगरे पाटील कारकीर्दविश्वास नांगरे पाटील पुरस्कारविश्वास नांगरे पाटील संदर्भविश्वास नांगरे पाटील बाह्य दुवेविश्वास नांगरे पाटीलभारतीय पोलीस सेवा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भगतसिंगभारताचे पंतप्रधानभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हव्हॉलीबॉलतानाजी मालुसरेअर्थसंकल्पपोपटशाहू महाराजकायदाफेसबुकशेतकरीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनावि.स. खांडेकरपुरंदर किल्लाजिल्हा परिषदपारिजातककडुलिंबभूगोलसायना नेहवालभारतीय संविधानाची उद्देशिकामाढा लोकसभा मतदारसंघनांदेड लोकसभा मतदारसंघसाईबाबाऊसमहेंद्र सिंह धोनीपक्षीमोगरानगर परिषदग्रामपंचायतमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीरामटेक विधानसभा मतदारसंघवल्लभभाई पटेलएकांकिकानृत्यदत्तात्रेयठरलं तर मग!मराठी व्याकरणराजू देवनाथ पारवेसरोजिनी नायडूभारताचे राष्ट्रपतीछत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयगटविकास अधिकारीक्रांतिकारकविष्णुइतिहासघोडाराज्यशास्त्रराशीफैयाजअनंत गीतेवंचित बहुजन आघाडीसातारा लोकसभा मतदारसंघपारू (मालिका)कोकणअजिंक्य रहाणेसापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य फरकप्रकाश आंबेडकरसंधी (व्याकरण)लोकशाहीविनायक मेटेभारताची अर्थव्यवस्थासामाजिक समूहपंकजा मुंडेप्रज्ञा विवर्धन स्तोत्रमराठी संतसंत तुकारामहळदअमरावती लोकसभा मतदारसंघघारसदा सर्वदा योग तुझा घडावापृथ्वीराज चव्हाणमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीसहकारी संस्थाशुद्धलेखनाचे नियममधमाशीनातीभारताच्या राष्ट्रपतींची यादीनटसम्राट (नाटक)इंडोनेशिया🡆 More