फैयाज

फैय्याज (जन्म : ५ जानेवारी, इ.स.

१९४८">इ.स. १९४८) या नावाने ओळखली जाणारी फैय्याज इमाम शेख ही एक नामवंत मराठी नाट्य-अभिनेत्री आणि गायिका आहे. त्यांचा जन्म सोलापूर येथे झाला. सोलापुरात असताना त्या कलापथकात केवळ नृत्य सादर करीत असत. त्यानंतर त्या हौशी रंगभूमीवर आल्या. मुंबईत आल्यावर त्यांनी ’कट्यार काळजात घुसली’ या नाटकात झरीनाची भूमिका केली आणि त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली.

कारकीर्द

इ.स. १९६६पासून त्या मराठी नाटकांत कामे करीत आहेत. सोलापूरमध्ये आपल्या नाट्य कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या फैय्याज यांनी ‘गीत गायिले आसवांनी’ या नाट्यसंपदेचे भावंड असलेल्या विजयश्री प्रॉडक्शनच्या नाटकाद्वारे मुंबईच्या नाट्यसृष्टीत पदार्पण केले.

फैय्याज यांनी गद्य नाटके, संगीत नाटके, पार्श्वगायन, काव्यवाचन, संगीत शिक्षण, हिंदी-मराठी चित्रपट, मराठी मालिका, हिंदी मालिका अशा विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे. गेली अनेक वर्षे अविरतपणे मराठी रंगभूमीची त्या मनोभावे सेवा करीत आहेत. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ कारकीर्द करणाऱ्या नाट्यकलावंतांला मिळणारे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

फैय्याज यांनी निरनिराळ्या पिढीतल्या आणि वेगवेगळ्या स्कूल्सच्या लेखक-दिग्दर्शकांकडे वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. संगीत नाटके, सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, विनोदी अशा सर्वच प्रकारच्या नाटकांतून त्यांनी काम केल्याने त्यांच्यावर एकच एक असा कोणताच शिक्का बसला नाही. गाण्यातही त्यांनी गजल, ठुमरी, लावणी, नाट्यसंगीत असा चौफेर प्रवास केला. गायिका बेगम अख्तर यांच्या गंडाबंद शागीर्द बनण्याची संधी त्यांना चालून आली होती. परंतु त्यावेळी त्यांची नाट्य-कारकीर्द ऐन बहरात असल्याने ती सोडून लखनौला बेगम अख्तरांकडे गाणे शिकायला जाणे त्यांना शक्य झाले नाही. मात्र जेव्हा जेव्हा बेगम अख्तर मुंबईत येत तेव्हा तेव्हा त्या फैय्याज यांना गाणे शिकवीत.

‘अश्रूंची झाली फुले’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘मत्स्यगंधा’, ‘होनाजी बाळा’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘वेड्याचं घर उन्हात’, ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘गुंतता हृदय हे’, ‘पेइंग गेस्ट’ ते अलीकडच्या ‘मित्र’पर्यंतच्या नाटकांत फैय्याज यांच्या भूमिका आहेत. . ‘कट्यार’मधील झरीना तसेच ‘वीज म्हणाली धरतीला’तील जुलेखा या भूमिकांवर तर त्यांनी आपली अमीट नाममुद्रा उमटवली होती. ‘गुंतता हृदय हे’मध्ये कल्याणी साकारणाऱ्या फैय्याज यांनी ‘महानंदा’ चित्रपटात मानूची भूमिका तितक्याच ताकदीने जिवंत केली होती. यातून त्यांच्या अभिनयाची रेंज कळून येते. त्यांना डबिंग मास्टरही म्हटले जाई. ‘जाणता राजा’मध्ये त्यांनी गाणे व निवेदन केले आहे.

दादा कोंडके यांच्या ‘विच्छा’मध्ये साडेसातशे प्रयोगांत त्यांनी गाणी गायिली. सी. रामचंद्र, वसंत देसाई, जयदेव, मदनमोहन, एस. डी. व आर. डी. बर्मन यांसारख्या संगीतकारांकडेही त्या गाणी गायल्या. पंडित सी.आर. व्यास यांच्याकडे गाणे शिकलेल्या फैय्याजना पंडित जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर केलेल्या नाटकांमुळे त्यांच्याकडूनही भरपूर शिकायला मिळाले. पुलंबरोबरही त्यांनी ‘वटवट’मध्ये काम केले होते. या सगळ्या वाटचालीत त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले. जुन्या-नव्या सर्वच पिढ्यांमध्ये सहजपणे मिसळणाऱ्या फैय्याज अजातशत्रू राहिल्या. २०१०सालच्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन फैय्याज यांच्या हस्ते झाले होते. आजही (इ.स.२०१४) त्या त्याच तडफेने कला क्षेत्रात कार्यरत आहेत.

चित्रपट

‘एक उनाड दिवस’, ‘दायरे’, ‘पैंजण’, ‘महानंदा’, ‘वजीर’, या हिंदी-मराठी चित्रपटांत फैय्याज यांनी काम केले आहे.

नाटके आणि त्यांतल्या (भूमिका)

  • अंधार माझा सोबती (ज्योती)
  • अश्रूंची झाली फुले (नीलम, सुमित्रा)
  • कट्यार काळजात घुसली (झरीना)
  • किनारा ( जीजी)
  • गीत गायिले आसवांनी (मंझर) - पहिले नाटक!
  • गुंतता हृदय हे (कल्याणी)
  • तो मी नव्हेच (चन्नक्का, प्रमिला परांजपे, सुनंदा दातार)
  • पंडितराज जगन्नाथ (लवंगिका)
  • पेइंग गेस्ट (सुनंदा)
  • प्रीत राजहंसी (मेहजबीन)
  • बावनखणी (चंद्रा)
  • भटाला दिली ओसरी (नटी)
  • मत्स्यगंधा (सत्यवती)
  • मदनाची मंजिरी (?)
  • मित्र (नर्स)
  • मी मालक या देहाचा (सिस्टर)
  • वटवट (विविध भूमिका)
  • वादळवारं (अम्मी)
  • वीज म्हणाली धरतीला (जुलेखा)
  • वेड्याचं घर उन्हात
  • संत गोरा कुंभार (संता)
  • संत तुकाराम (रंभा)
  • सूर राहू दे (?)
  • होनाजी बाळा (गुणवती)

फैय्याज यांची गाजलेली गीते

  • कोन्यात झोपली सतार (चित्रपट: घरकुल)
  • चार होत्या पक्षिणी त्या (नाटकः वीज म्हणाली धरतीला)
  • निर्गुणाचा संग धरिला (नाटक : गोरा कुंभार)
  • या बाळांनो या रे या (भा.रा.तांबे यांची कविता)
  • सांवरियॉं से नैना हो गये चार, हाय राम! लागी करेजवॉं कटार (नाटकः कट्यार काळजात घुसली)
  • स्मरशिल राधा स्मरशिल यमुना (नाटक : वीज म्हणाली धरतीला)

पुरस्कार

  • बोरीवली नाट्य परिषदेचा इ.स.२००९चा स्वररंगराज पुरस्कार
  • अखिल नाट्य विद्यामंदिर समिती(सांगली)आणि अखिल महाराष्ट्र राज्य नाट्य परिषद यांच्या तर्फे इ.स.२०१० चे विष्णूदास भावे गौरव पदक
  • चंद्रलेखा यांच्या तर्फे इसवी २०१०चा ज्येष्ठ रंगकर्मींसाठी असलेला शारदाबाई वाघ पुरस्कार
  • महाराष्ट्र शासनाचा इ.स.२०११चा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार
  • आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा इ.स.२०१२चा रंगकर्मी आचार्य अत्रे पुरस्कार
  • रंगत संगत प्रतिष्ठान आणि फडणीस फाउंडेशनतर्फे इ.स. २०१२चा माणूस पुरस्कार
  • पुण्याच्या रोटरी क्लबचा विशेष गुणवत्ता पुरस्कार (२९-११-२०१४)
  • २०१५ सालच्या ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद.

हे सुद्धा पहा

फैय्याज यांची काही स्मरणीय गाणी

Tags:

फैयाज कारकीर्दफैयाज चित्रपटफैयाज नाटके आणि त्यांतल्या (भूमिका)फैयाज फैय्याज यांची गाजलेली गीतेफैयाज पुरस्कारफैयाज हे सुद्धा पहाफैयाजइ.स. १९४८मराठीमुंबईसोलापूर५ जानेवारी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाविकास आघाडीआयुर्वेदपुणेऋग्वेदकृष्णकबड्डीमहेंद्र सिंह धोनी२०१४ लोकसभा निवडणुकातेजस ठाकरेऊसममता कुलकर्णीपिंपळहोमरुल चळवळबहावामहाराष्ट्रातील आरक्षणभारतीय रेल्वेराजदत्तराष्ट्रीय कृषी बाजारताराबाई शिंदेगोत्रतमाशाटायटॅनिकजागतिक कामगार दिनबाबासाहेब आंबेडकररावेर लोकसभा मतदारसंघभारताची संविधान सभासम्राट अशोकमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीरामजी सकपाळभारताच्या पंतप्रधानांची यादीक्लिओपात्राधोंडो केशव कर्वेभारतीय जनता पक्षप्रेमानंद गज्वीकविताअक्षय्य तृतीयामौर्य साम्राज्यमहाराष्ट्रातील पर्यटननरसोबाची वाडीखो-खोराकेश बापटवर्धा लोकसभा मतदारसंघशहाजीराजे भोसलेआयतचंद्रपूर लोकसभा मतदारसंघजालना लोकसभा मतदारसंघआंबेडकर जयंतीसप्तशृंगी देवीपरभणी जिल्हाठाणे लोकसभा मतदारसंघभारत छोडो आंदोलनस्त्रीशिक्षणबुलढाणा जिल्हाभारतीय अंतराळ संशोधन संस्थाअर्थसंकल्पधनगरमराठी लिपीतील वर्णमालाअमरावती विधानसभा मतदारसंघमैदानी खेळराजगडगुप्त साम्राज्यसाईबाबाअसहकार आंदोलनइंदुरीकर महाराजराजाराम भोसलेपर्यावरणशास्त्रकोकणभौगोलिक माहिती प्रणालीमाढा लोकसभा मतदारसंघअहिल्याबाई होळकरदूधनितीन गडकरीक्रिकेटमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागजागतिक महिला दिनशुभं करोति🡆 More