नाटक नटसम्राट

नटसम्राट हे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी लिहिलेले मराठी भाषेतील नाटक आहे.

या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदू असोशिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर, इ.स. १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला.

नटसम्राट
लेखन विष्णू वामन शिरवाडकर
भाषा मराठी
निर्मिती वर्ष इ.स. १९७०
कलाकार श्रीराम लागू

कलाकार

या नाटकातील नटसम्राट गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे रंगवली. ही भूमिका करण्याची संधी मिळणे ही मराठी नाट्याभिनेत्यांची उत्कट इच्छा असते. ही भूमिका करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे असे समजले जाते. श्रीराम लागूंनंतर सतीश दुभाषी, उपेंद्र दाते, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी, गिरीश देशपांडे नाना पाटेकर हेही नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर झाले होते.

नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या एकाहून अधिक अजरामर कलाकृतींवर बेतले होते. मूळ नाट्यांशांचे ते भाषांतर किंवा रूपांतर नाही. असे असले त्या कथानकांना वि.वा.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले आणि मराठीत एक एकमेवाद्वितीय नाटक अवरतरले. या नाटकाला रंगभूमीवर येऊन दशके लोटली, पण नाटकाचे नावीन्य अजून ओसरलेले नाही.न

या नाटकामध्ये अप्पा बेलवलकर यांच्या पत्नीची "कावेरी" ही भुमिका,'शांता जोग' यांनी अतिशय प्रभावीपणे साकारली होती .कलेसाठी स्वताला वाहून घेतलेल्या माणसासोबत संसार करताना कराव्या लागणाऱ्या तडजोडी व ताण-तणावाच्या काळात प्रेमाने आणि संयमाने घर सावरणारी एक हळवी व खंबीर स्त्री 'कावेरी' या पात्रातून साकारली गेली.नटाची मुले देशोधडीला लागतात अशी त्यावेळी लोकांची समजूत असायची पण "नटसम्राट" नाटकामध्ये कावेरी' ने मात्र मुलांना शिक्षण व विचारांनी समृद्ध बनवले.

"नटसम्राट" हे नाटक अभिनयाचा अभ्यास करायला शिकवते, व खूप गोष्टी शिकवून जाते.

नटसम्राटचे सलग आठ प्रयोग

या नाटकाच्या प्रयोगात अप्पासाहेब बेलवलकारांची भूमिका करणाऱ्या नटाला मानसिक थकवा येतो. असे असून २७ ऑगस्ट २०१३ या दिवशी सकाळी पावणेसहा वाजता सुरू झालेले आणि एकापाठोपाठ सलग चाललेले ’नटसम्राटचे’ एकाच नटसंचातले एकूण आठ प्रयोग २८ ऑगस्टच्या दुपारी दीड वाजता संपले. हे प्रयोग पुण्याच्या बालगंधर्व मंदिरात एकूण ३१ तास ४५ मिनिटे चालले होते. हा बहुधा जागतिक विक्रम असावा. ’तीर्थराज’, ’रंगमैत्री’ आणि दादा कोंडकेफाउंडेशन यांनी हे प्रयोग रंगमंचावर सादर केले होते. गिरीश देशपांडे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते व अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिकाही केली होती.

माध्यमांतर

नटसम्राट या नाटकावरून महेश मांजरेकर यांनी मराठीभाषेत चित्रपट बनवला आहे. या चित्रपटात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत आहेत.

संदर्भ

युटूब वर आपण हे नाटक पाहू शकतो.

Tags:

नाटक नटसम्राट कलाकारनाटक नटसम्राट नटसम्राटचे सलग आठ प्रयोगनाटक नटसम्राट माध्यमांतरनाटक नटसम्राट संदर्भनाटक नटसम्राटइ.स. १९७०मराठी भाषामुंबईविष्णू वामन शिरवाडकर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मुख्यमंत्रीमहाराष्ट्रातील नद्यांची यादीदहशतवादशुभं करोतिरामचलनघटमुखपृष्ठज्वारीउद्धव ठाकरेपुणे जिल्हामहात्मा गांधीबहिणाबाई चौधरीपरभणी विधानसभा मतदारसंघसोनाररामायणहार्दिक पंड्यापत्रबंगालची फाळणी (१९०५)बहिष्कृत भारतछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघअनिल देशमुखमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीहिंगोली जिल्हाजागतिक दिवसशनिवार वाडाहिंदू धर्मलोकसभालॉर्ड डलहौसीसूर्यनमस्काररक्षा खडसेसिंहगडहिंदू कोड बिलकर्नाटककाळूबाईरवी राणाबुद्धिबळभीमा नदीदौलताबादह्या गोजिरवाण्या घरातनिलेश लंकेग्रंथालयसंगीतमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीखंडगजानन दिगंबर माडगूळकरसामाजिक समूहमहाराष्ट्र टाइम्सकेदारनाथ मंदिरविजयसिंह मोहिते-पाटीलमुलाखतराष्ट्रवादी काँग्रेस पक्षजळगाव लोकसभा मतदारसंघभाषा विकाससकाळ (वृत्तपत्र)दिंडोरी लोकसभा मतदारसंघजिल्हा परिषदमराठादशावतारमुंबईशिवाजी महाराजसंत तुकारामसमर्थ रामदास स्वामीगर्भाशयशिवनेरीकौटिलीय अर्थशास्त्रभगतसिंगईशान्य दिशाभारतीय आडनावेजागतिक लोकसंख्यासमाज माध्यमेदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनानामक्लिओपात्राकुणबीफेसबुकपारू (मालिका)गोंदवलेकर महाराज🡆 More