वर्षास्तरीमेघ

इंग्रजी नाव - Nimbostratus Cloud

इंग्रजी खुण - Ns

मेघतळ पातळी निम्न

भृपृष्ठ ते २००० मीटर

आढळ अंटार्टीका वगळून सर्व जगभर.
काळ संपूर्ण वर्षभर

मध्य पातळीवर तयार होणाऱ्या ह्या ढगाचा रंग राखाडी किंवा काळसर असतो. ह्या ढगाला विशिष्ट आकार असतं नाही. हे ढग संपूर्ण आकाशभर पसरलेले आणि त्यामुळे सर्व आकाशाला काळसर छटा देणारे असू शकतात. ह्या ढगांच्या जाडीमुळे सूर्यकिरण पूर्णपणे अडवले जातात आणि त्यामुळे ढगांचा तळ सहसा स्पष्टपणे पहावयास मिळत  नाही. वरून प्रकाश पडल्यामुळे हे ढग काहीवेळा आतून प्रकाशमान झाल्यासारखे वाटतात. मध्य पातळीवर तयार होणारे हे ढग उभ्या आडव्या बाजूस प्रसरण पाऊन निम्न पातळीवरही आलेले आढळतात. पर्जन्यवृष्टी होतानाही ते खालच्या पातळीवर येतात त्यामुळे वर्षास्तरी मेघ हे निम्न पातळीवरीलही मानले जातात. ढगांचे तापमान - 10 सें पेक्षा जास्त असल्यास हे ढग सूक्ष्म जलबिंदूचे तर तापमान -10 सें ते -20 सें पर्यंत असल्यास वरच्या भागात हिमकण आणि तळभागात जलबिंदूचे बनलेले असतात. मात्र तापमान जर -20 सें पेक्षा कमी असेल तर हे ढग हिमकणांचे बनलेले आढळतात.

ह्या ढगांपासून हलका पण दीर्घकाळ पाऊस किंवा हिमवर्षाव होऊ शकतो. वृष्टीच्या वेळेस ह्या ढगातून वीज पडत नाही वा गडगडाटही ऐकू येत नाही.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनमहाराष्ट्र राज्य माहिती आयोगछत्रपतीअयोध्यारमा बिपिन मेधावीदलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनचंद्रगुप्त मौर्यघोणसऑलिंपिकज्ञानेश्वरीकार्ल मार्क्सत्रिकोणचीनस्त्रीवादमहाराष्ट्र विधानसभाआडनावबंदिशव्हॉलीबॉलमहादेव कोळीसामाजिक समूहमाती प्रदूषणस्वच्छताविधानसभा आणि विधान परिषदश्यामची आईग्राहक संरक्षण कायदापाणीदादाजी भुसेपालघरलोहगडभौगोलिक माहिती प्रणालीशेतकरीनाशिकमेंढीयोगासनहिंदू धर्मातील अंतिम विधीअटलांटिक महासागररत्‍नागिरीकेदारनाथ मंदिरसविनय कायदेभंग चळवळदुसरे महायुद्धमराठी भाषा गौरव दिनदिशासातारामूलद्रव्यखो-खोराज्यसभासावित्रीबाई फुलेसंशोधनगुरू ग्रहमहात्मा फुलेयेशू ख्रिस्तपाटण (सातारा)अर्थशास्त्रभारतीय संस्कृतीहवामान बदलपाणघोडाभारताची अर्थव्यवस्थाकांजिण्याव्यायामप्राण्यांचे आवाजपहिले महायुद्धहैदराबाद मुक्तिसंग्रामहत्तीसुभाषचंद्र बोसआर्द्रताशुक्र ग्रहभगतसिंगआकाशवाणीभारतीय संसदसरोजिनी नायडूगृह विभाग, महाराष्ट्र शासनभारतीय जनता पक्षमहाराष्ट्राचा इतिहासकुटुंबमोरशेतीपूरक व्यवसायनाशिक जिल्हा🡆 More