प्रतापराव गुजर

प्रतापराव गुजर (जन्म:१६१५ - मृत्यू:२४ फेब्रुवारी, १६७४) हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे सेनापती होते.

१६१५">१६१५ - मृत्यू:२४ फेब्रुवारी, १६७४) हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे सेनापती होते. साल्हेरच्या लढाईत त्यांनी मोठ्या मुघल सैन्याचा पराभव केला. साल्हेर येथील मराठ्यांचा विजय हा मुघलांच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध त्यांच्या लष्करी प्रक्रियेतील एक निर्णायक वळण म्हणून पाहिला जातो.

प्रतापराव गुर्जर
प्रतापराव गुजर
प्रतापराव गुर्जर यांचा पुतळा
जन्म १६१५
भोसरे (खटाव)
मृत्यू फेब्रुवारी २४, १६७४
नेसारी

५ ऑगस्ट १६६८रोजी मोगलांशी झालेल्या तहानुसार शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना संभाजीनगरला (औरंगाबाद) पाठवले. त्यावेळेस प्रतापराव गुजरही संभाजी महाराजांसोबत होते, अशी जेधे शकावलीत नोंद आहे.

प्रतापराव गुजर यांना आदिलशाही सरदार बहलोल खान यांच्या नेतृत्वाखालील आक्रमक सैन्याचा सामना करण्यासाठी पाठवण्यात आले. मराठा सैन्याने नेसरीच्या ठिकाणी बहलोल खानच्या छावणीला वेढा घातला. प्रतापरावांच्या सैन्याने लढाईत विरोधी सेनापतीचा पराभव करून पकडले. खानाने मराठ्यांच्या प्रदेशावर पुन्हा आक्रमण न करण्याचे आश्वासन दिल्यावर प्रतापरावांनी बहलोल खानला सैन्यासह आणि जप्त केलेल्या युद्धसामुग्रीसह सोडले (१५ एप्रिल १६७३ च्या सुमारास)

महाराज फार रागावले. त्यांनी पत्र लिहिलें, खानाशी ‘सला काय निमित्य केला?’ असा करडा सवाल महाराजांनी केला.

काही महिन्यांनी बहलोलखान पुन्हा करवीरच्या आघाडीवर स्वराज्याच्या रोखाने येत आहे, तो सुटला आहे, तो स्वराज्याला तोशीस देणार, अशा बातम्या येऊन थडकल्या.प्रतापरावानेही इरेला पडून या बहलोलचा फन्ना उडवावा व झालेल्या चुकीची भरपाई करावी या हेतूने महाराजांनी प्रतापरावास लिहिलें होतें,‘…हा (बहलोलखान) घडोघडीं येतो. तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बहलोलखान येतो, याची गाठ घालून, बुडवून फते करणें. नाही तर (पुन्हा आम्हांस) तोंड न दाखविणें.’

२४ फेब्रुवारी १६७४ रोजी प्रतापराव गुजरांची बहलोलखानाशी गाठ पडली. कृष्णाजी अनंत सभासद यांनी केलेल्या वर्णनानुसार, 'त्यावरि प्रतापराव जाऊन बेलोलखानाशीं गाठले. नेसरीवरी नबाब आला. त्याने गाठीले. मोठे युद्ध झाले. अवकाल होऊन प्रतापराव सरनोबत तरवारीचे वाराने ठार झाले. रण बहुत पाडीले. रक्ताच्या नद्या चालिल्या.'

या लढाईत प्रतापराव गुजर यांच्यासोबत आणखी सहा वीरांना वीरमरण आले, अशी इंग्रज दुभाषी नारायण शेणवी यांच्या ४ एप्रिल १६७४ रोजीच्या पत्रात नोंद आहे. कोणत्याही विश्वसनीय साधनात इतर सहा वीरांची नावे सापडत नाहीत.

मराठ्यांच्या इतिहासात नवीन इतिहास घडला गेला होता. हे सर्व महाराजांच्या कानी पडल्यावर महाराज दुःखी झाले. ही नेसरीची लढाई २४ फेब्रुवारी १६७४ रोजी झाली. या प्रसंगावर "वेडात मराठे वीर दौडले सात" ही कविता गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजात प्रसिद्ध आहे. लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) यांनी 'वेडात मराठे वीर दौडले सात' याच नावाचे व्यवसायिक नाटक लिहिले.

प्रतापराव गुजर
Vedat Marathe Veer Daudale Saat Drama 1st Show 1977

'वेडात मराठे वीर दौडले सात' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग, १९ मे १९७७ रोजी मळगंगा नाट्य निकेतन द्वारे सादर करण्यात आला. यात प्रतापराव यांची प्रमुख भुमिका श्री. फक्कड जोशी तर छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका स्वतः बशीर मोमीन यांनी केली होती. नाटकाला मिळालेला प्रतिसाद पाहून लेखक श्री. मोमीन कवठेकर यांनी नाटकाचे रूपांतर वगनाट्यात सुद्धा केले, जे विविध तमाशा फडांनी ग्रामीण महाराष्ट्रात सादर करून लोकप्रिय केले.

सर सेनापती प्रतापराव गुजर यांचे दोन मुले खंडेराव गुजर व जगजीवन गुजर शाहू झुल्फिकारखानानें रायगड फितुरीनें घेतल्यानंतर येसूबाईसाहेब व शाहुमहाराज यांनां औरंगझेबाकडे पाठविण्यांत आलें, त्यावेळी गडावर असलेली कांहीं मानकरी मंडळीहि (केसरकर, गुजर वगैरे) पकडलीं जाऊन औरंगझेबाच्या छावणींत गेली. तींत हा खंडोजीहि होता. या सर्व मंडळींस बाटवून मुसुलमान करण्याची इच्छा औरंगझेबास नेहमी होई. परंतु तिच्या आड त्याची मुलगी येत असे. एके दिवशी मात्र त्यानें आज शाहूस बाटवावयाचेंच असा आग्रह धरला. तेव्हां तोहि त्याच्या कन्येनें मोडला. परंतु शाहूच्या ऐवजी दुसरा कोणी तरी मोठा सरदार बाटविण्याचाच जेव्हां त्यानें हट्ट घेतला, तेव्हां खंडोजी हा आपखुषीनें मुसुलमान होण्यास तयार झाला.

आता आपल्या राजाच्या बचावासाठी आले, 16 मे 1700 मध्ये मोहरम च्या मुहूर्तावर मुसलमान करून त्याचा नावे अब्दुर्रहीम व अब्दुरेहीमान अशी ठेवली खंडोजीचा हा उपकार शाहु राजानी कधी विसरले नाही त्यानें असें धर्मांतर केल्यामुळें शाहूवरील हा प्रसंग टळला.. (जे लोक संभाजी महाराज आणि राजाराम महाराज भावा संबंधाविषयी बोलतात त्यांनीबलक्षात घायवे की प्रतापराव गुजर यांचे कुटुंब जास्त राजाराम महाराजांना जवळ होते ,कारण जानकीबाई ही त्यांची सख्खी बहीण राजाराम महाराजांची राणी होती)

" आमचा मामा आम्हाबदल मुसलमान जाहला" असे उल्लेख समकालीन शाहू महाराजांच्या कागदपत्रे मधुन दिसते स्वराज्यासाठी केलेले हे धर्मांतर खूप मोलाचे होते त्यावर महाराजांनी त्याना परळी खोऱ्यातील साठ गावाची जमीन इनाम म्हणून दिली. खंडेराव आणि जगजीवन गुजर याना हिंदू धर्म मध्ये घ्यायचे प्रयत्न झाले पण खंडेराव यांचे त्यांच्या मुस्लिम बायको वर प्रेम होते आणि तिला पण हिंदू धर्मात घ्या असा खंडेराव यांचा हट्ट होता. मात्र तत्कालीन ब्राह्मणांना ते मंजूर नव्हते आणि परिस्थितीचा वरवंटा या ना त्या कारणाने गुजर कुटुंबावर फिरताच राहिला. त्यांची मुस्लिम वंशज आज देखील परळी नजीक कामठी गावात राहतात भाऊसाहेब हैभतराव गुजर,देशमुख,इनामदार परळी सरकार आणी त्यांचा मुलगा सत्तार अमीन साहेब इनामदार आणी त्यांची मुले १.सिकंदर सतार इनामदार 2.ज़ुबेर सत्तार इनामदार

आज मुस्लिम म्हणून सातारा मध्ये राहतात. आता कामठी हे गाव धरणामध्ये गेले असून त्यांचा सध्याचा रहिवास हा परळी नजीक जकातवाडी या गावामध्ये आहे . या घराण्याचा मोलाचा वाटा स्वराज्याच्या साठी आहे

.

समाधी

प्रतापराव गुजर यांची समाधी कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी नावाच्या गावी (तालुका गडहिंग्लज) आहे.[ संदर्भ हवा ] तर जन्मगावी स्मारक आहे एका स्मारकाची सुरुवात भुईकोट किल्ला रूपाने सुरू झाली होती. परंतु ते काम अपूर्ण राहिले आहे. सध्या ते पडीक एक खंडहर अवस्थेत आहे.[ संदर्भ हवा ]

संदर्भ


Tags:

इ.स. १६१५इ.स. १६७४२४ फेब्रुवारी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कंबर दुखीमहाराष्ट्रहंपीलोकमतपंजाबराव देशमुखअमरावती विधानसभा मतदारसंघभारतातील राजकीय पक्षसंवादटी.एन. शेषनउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघपहिले महायुद्धभारतजुमदेवजी ठुब्रीकरक्रियापदकल्याण लोकसभा मतदारसंघभारताची फाळणीकेंद्रशासित प्रदेशमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनागपूर लोकसभा मतदारसंघकार्ल मार्क्सनामतुळजाभवानी मंदिरजैवविविधताकळसूबाई शिखरवर्धमान महावीरन्यायशिर्डी लोकसभा मतदारसंघदक्षिण दिशामैदानी खेळहोमिओपॅथीबावीस प्रतिज्ञाभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीवि.स. खांडेकरगुढीपाडवापुरस्कारमुंबईनेतृत्वनातीश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीजागतिक पुस्तक दिवसवल्लभभाई पटेलफुफ्फुसमराठी भाषामूळ संख्याशिरसाळा मारोती मंदिरविजयसिंह मोहिते-पाटीलज्ञानेश्वरीसंत तुकारामबंगालची फाळणी (१९०५)मृत्युंजय (कादंबरी)कर्ण (महाभारत)बुद्धिबळजंगली महाराजसाम्यवादकुपोषणरविकांत तुपकरपैठणीपुणे जिल्हादशावतारसातवाहन साम्राज्यक्रांतिकारकसायबर गुन्हापांडुरंग सदाशिव साने१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धशिवनेरीलिंगायत धर्मलोकमान्य टिळकभारतीय रिझर्व बँकहवामानबहिणाबाई पाठक (संत)अहमदनगर लोकसभा मतदारसंघमुख्यमंत्रीमराठी लिपीतील वर्णमालाबुलढाणा जिल्हाइंदुरीकर महाराजराजगडभारताच्या सरन्यायाधीशांची यादीनृत्यमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगे🡆 More