धम्म

बौद्ध धर्मानुसार धम्म (पाली: धम्म ; संस्कृत: धर्म) म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण आणि त्या शिकवणीनुसार दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग होय.

धम्म हे त्रिशरणांपैकी एक आहे. धम्म म्हणजे बुद्ध तत्त्वज्ञान किंवा बौद्ध तत्त्वज्ञान असून ते धर्म (Religion) याहून अधिक भिन्न शब्द आहे.

धम्म
धम्मचक्र

व्युत्पत्ती व भाषांनुसार नामभेद

धम्म हा पाली भाषेतील शब्द धर्म या "योग्य व न्याय्य मार्ग" अश्या अर्थाच्या संस्कृत शब्दावरून आला आहे.

पूर्व आशियात धम्म या संज्ञेसाठी 法 हे चिन्ह वापरले जाते; ज्याचा मॅंडरिन भाषेत फा, जपानी भाषेत होकोरियन भाषेत बेओप असा उच्चार होतो. तिबेटी भाषेत या संज्ञेसाठी चोस असा शब्द आहे. उय्गुर, मंगोलियन व अन्य काही मध्य आशियाई भाषांमध्ये धम्म या संज्ञेस नोम हा शब्द असून, तो प्राचीन ग्रीक भाषेती नोमोस (ग्रीकः νόμος) या "कायदा" असा अर्थ असलेल्या शब्दावरून आला आहे.

चार आर्यसत्य

दुःख आहे, दुःखाची उत्पत्ति आहे, दुःखातून मुक्ती आहे आणि मुक्तिगामी आर्य आष्टांगिक मार्ग ही चार आर्यसत्ये म्हणून ओळखली जातात.

आष्टांगिक मार्ग

प्रज्ञा १) सम्यक दृष्टी २) सम्यक संकल्प

शील ३) सम्यक वाचा ४) सम्यक कर्मान्त ५) सम्यक आजीविका

समाधी ६) सम्यक व्यायाम ७) सम्यक स्मृती ८) सम्यक समाधी

धम्म परिषद

पहिली धम्म परिषद -

 इ.स.पू.४८७ मध्ये गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर त्यांचे अनुयायी राजगृह येथे जमले. हीच पहिली बुद्ध धम्म सभा होय. यावेळी मगध चा सम्राट अजातशत्रू हा होता. या धम्म सभेला ५०० भिक्षु हजार होते. 

गौतम बुद्धांचा सर्वात प्रिय शिष्य या सभेला हजर होता.गौतमाच्या शिकवणुकील तत्वे ह्यावेळी एकात्र करण्यात आली.त्यांना त्रिपितक असे म्हणतात.(यांमध्ये विनयपिटक,सुत्तपिटक, अभिधम्मपितक असे तीन भाग निर्माण झाले यांना त्रीपितक असे म्हणतात) दुसरी धम्म परिषद-

 पुढे इ.स.पू.३८७ मध्ये दुसरी धम्म परिषद भरली. यावेळी मगध छा सम्राट कालाशोक होता. सभेला ७०० पेक्षा जास्त भिक्षु होते. ह्यानंतर बौद्ध धर्मात महायान व हिनयान हे दोन पंथ निर्माण झाले. 

तिसरी धम्म परीषद -

  इ.स.पू.२४०मध्ये तिसरी धम्म परिषद पाटलीपुत्र येथे भरली. यावेळी मगध सम्राट अशोक होता. मोगलीपुत्त तिस्स सभेचे अध्यक्ष होते. धर्मपरिषदेला १००० हून जास्त  भिक्षु आले होते. 

या धर्मसभेमध्ये अनावश्यक गोष्टी काढून टाकून धर्मग्रंथांना उजाळा देण्याचा प्रयत्न केला गेला. तचेच या सभेत बौद्धधर्माच्या प्रचारासाठी धर्माप्रचारकांना परदेशात पाठविण्याचे अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.सीरिया, इजिप्त,जपान, चीन या देशात धर्मप्रचारक पाठविण्यात आले.अशोकाचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांनी सीलोन मध्ये धर्मप्रचार केला.

चौथी धम्म परिषद -

 चौथी धम्म परिषद सम्राट कनिष्कच्या कारकीर्दीत काश्मीर मधील कुंडलवन ( इ.स.पाहिले शतक) येथे झाली. यावेळी धर्मग्रंथावर टीकाग्रंथ लिहिण्यात आले. त्रिपितटकावर महविभाषा नावाचा टीका ग्रंथ लिहिण्यात आला.या सभे ५००भिक्षु उपस्थीत होते.सभेचे अध्यक्ष वसुमित्र आणि उपाध्यक्ष अश्वघोष होते. 

संदर्भ -१ प्राचीन भारत - नी. सी.दीक्षित

    २ प्राचीन भारत - मा. म.देशमुख 

बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मविषयक दृष्टिकोण

बाबासाहेबांनी एक नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुने जग उलथवण्याची शक्ती असलेले साहित्य उभे राहिले . तो शब्द म्हणजे ‘ धम्म ’ . ‘ धम्म ’ या शब्दाने समाजात माणसाचे श्रेष्ठत्व आणि ऐहिकता या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली. या नव्या जीवनमूल्यांना त्यांनी धम्म म्हटले .[ संदर्भ हवा ] बाबासाहेबांनी एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला, असे झाले नाही. तर, निखळ प्रज्ञा आणि करुणेचे त्यांना जिथे जिथे अपूर्व मिश्रण आढळले , त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला. अंधश्रद्धांवर आधारलेल्या जीवनपद्धतीकडून प्रेम आणि निर्मळ बुद्धीच्या बळावर चालणाऱ्या जीवनपद्धतीचा त्यांनी स्वीकार केला[ संदर्भ हवा ]. या बुद्धिनिष्ठ जीवनपद्धतीचे नाव ‘ धम्म ’ असे आहे[ संदर्भ हवा ].

भारताच्या राष्ट्रपतींच्या खुर्चीवर "धम्म चक्र प्रवर्तनाय" हा बुद्धाचा प्रथम संदेश कोरला आहे[ संदर्भ हवा ]. याचा मूळ हेतू हाच की भारत एक धम्मशासित राज्य निर्माण व्हावे आणि एक उज्ज्वल राष्ट्र घडावे[ संदर्भ हवा ]. सारा भारत बौद्धमय व्हावा, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आंतरिक इच्छा होती[ संदर्भ हवा ].

संदर्भ

अधिक वाचन

Tags:

धम्म व्युत्पत्ती व भाषांनुसार नामभेदधम्म चार आर्यसत्यधम्म परिषदधम्म बाबासाहेब आंबेडकरांचा विषयक दृष्टिकोणधम्म संदर्भधम्म अधिक वाचनधम्मगौतम बुद्धत्रिशरणधर्मपाली भाषाबौद्ध धर्मसंस्कृत भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळकेळपंचशीलनियतकालिककिशोरवयमातीमुंजस्त्री सक्षमीकरणजपानवाक्यअर्जुन पुरस्कारसिंधुदुर्गरत्‍नागिरीमाढा लोकसभा मतदारसंघबहिणाबाई चौधरीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगतणावतूळ रासप्रहार जनशक्ती पक्षतुळजाभवानी मंदिरजालना लोकसभा मतदारसंघवाघभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हवर्णनात्मक भाषाशास्त्रस्त्रीवादी साहित्यशीत युद्धआनंद शिंदेसातव्या मुलीची सातवी मुलगीकुटुंबनियोजनवेरूळ लेणीकुपोषणसंगीत नाटकज्यां-जाक रूसोबाळमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)महाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीधोंडो केशव कर्वेसम्राट अशोकहिंदू लग्नमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागलिंगभावखडकभारताचे संविधानचांदिवली विधानसभा मतदारसंघतिथीसंभोगकावीळभारताची संविधान सभाजागतिक व्यापार संघटनाशरद पवारकावळासूर्यमालामहाराष्ट्रातील स्थानिक शासनहिंदू धर्मातील अंतिम विधीन्यूझ१८ लोकमतनोटा (मतदान)भारतीय संविधानाची उद्देशिकाविधानसभावायू प्रदूषणकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघपुन्हा कर्तव्य आहेगणितनालंदा विद्यापीठगोपाळ कृष्ण गोखलेसंयुक्त महाराष्ट्र चळवळअकोला जिल्हानृत्यभारताचे राष्ट्रचिन्हऋतुराज गायकवाडरावेर लोकसभा मतदारसंघभारतातील शासकीय योजनांची यादीउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघहिंगोली विधानसभा मतदारसंघपुरस्कारसूत्रसंचालनशाश्वत विकास ध्येये🡆 More