जलसिंचन पद्धती: Project 2

जलसिंचन- पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त पिकांना दिलेल्या पुरक पाण्याला जलसिंचन असे म्हणतात.

भारतातील ४५० जिल्ह्यांपैकी बागायत क्षेत्र असलेल्या ४४ जिल्ह्यांमधून देशाच्या अन्नधान्य उत्पादनापैकी ५०% उत्पादन होते. या ४४ जिल्ह्यांपैकी जास्त सिंचन क्षेत्र असणाऱ्या १४ जिल्ह्यांत देशाच्या २५% अन्नधान्याचे उत्पादन मिळते. यावरून शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व लक्षात येते. पृथ्वीचा ७१% भाग पाण्याने व्यापलेला आहे. यापैकी ९७% पाणी खारे असून ते समुद्रात आहे.जागतिक पाण्याच्या वितरणाच्या बाबतीत भारताचा जगात ब्राझिल, रशिया, चीन, कॅनडा नंतर पाचवा क्रमांक लागतो. परंतु जलसिंचनाखालील क्षेत्राच्या बाबतीत भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो. भारतात सरासरी ११९ सेमी पाउस पडतो. भारतात एकूण ४०० दशलक्ष हेक्टर पाणी मिळते. त्यापैकी ११५ दशलक्ष हेक्टर मी. पाणी वाहून जाते, २१५ दशलक्ष हेक्टर मी. जमिनीत मुरते व ७० दशलक्ष हेक्टर मी. पाण्याची वाफ होते. पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पाण्यापैकी १५ दशलक्ष हेक्टर मी. पाणी धरणात अथवा तळ्यात साठविले जाते.धरणाच्या पाण्यापैकी वाफे द्वारे नष्ट होणारे पाणी – २०.५% तळ्यातील पाण्यापैकी वाफे द्वारे नष्ट होणारे पाणी – ४०% कालव्यातून होणारी पाण्याची गळ – २० ते ३०% प्रत्यक्षात पिकांना मिळणाऱ्या पाण्यापैकी ९९% पाण्याचे बाष्पोत्सर्जन होते व उरलेले १% पाणी पीक वाढीसाठी वापरले जातात.भारतीय नद्यांच्या १८६९ क्यूबिक किमी पाण्यापैकी ६९० क्यूबिक किमी पाणी उपयुक्त आहे. तर भूगर्भातील ४३२ क्यूबिक किमी पाणी उपयुक्त आहे.

जलसिंचन पद्धती: जलसिंचनाचे कार्यपद्धती, जलसिंचन पद्धती, जलसिंचनाच्या आधुनिक पद्धती
दुजियांगयान सिंचन प्रणाली

जलसिंचनाचे उद्देश

  • मोसमी पास असल्यामुळे इतर ऋतूत पीके घेणे
  • वर्षातून एकापेक्षा जास्त पीके घेणे
  • नगदी पीके घेणे
  • रासायनिक खते लागू पडण्यासाठी
  • दर हेक्टरी जास्त उत्पादन घेणे

जलसिंचनाचे कार्यपद्धती

विहीर जलसिंचन महाराष्ट्रात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या १९९५ च्या आकडेवारीनुसार ११ लाख ४३ हजार विहिरी आहेत. यापैकी सुमारे १० लाख विहिरींवर ऑईल इंजिन किंवा विद्युत पंप बसविलेले आहेत. विहिरींमधून २,५४,७१० हेक्टर मीटर पाणी उपसा करण्यासाठी उपलब्ध होते आणि दरवर्षी पावसाचे जे पाणी भूगर्भात मुरते त्याचा विचार करता ३२१८१० हेक्टर पाणी वापरासाठी मिळू शकते. महाराष्ट्रातील भूमिगत पाण्याच्या एकूण साठ्याचा अंदाज पाहता आणखी ११ लाख ८२ हजार विहिरी खोदता येतील.

तलाव जलसिंचन महाराष्ट्रात तलाव जलसिंचनाचे प्रमाण १५ टक्के आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भामध्ये भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयात तलावाच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जातो. या प्रदेशात तलावाद्वारा होणाऱ्या जलसिंचनाचे प्रमाण सुमारे ६० टक्के आहे.

पाझर तलाव महाराष्ट्र्रामध्ये तलावांच्या साहाय्याने देखील काही प्रमाणात जलसिंचनास फायदा होतो. याचा मुख्य उपयोग प्रदेशामधील भूजल साठा वाढविणे आणि विहिरीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी होतो. महाराष्ट्र्रात १९७२ साली अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा पाझर तलावांची योजना अमलात आणली गेली. यामुळेच अवर्षणग्रस्त प्रदेशात हळूहळू जलसिंचनाचे क्षेत्र वाढू लागले. सध्या महाराष्ट्र्रात पाझर तलावांची संख्या सुमारे १४०० आहे, तर १८०० पाझर तलावांची कामे चालू आहेत. भविष्य काळात आणखी ३००० पाझर तलाव तयार होतील.

उपसा जलसिंचन विहिरी किंवा नदीच्या पात्रातून अथवा जलाशयातून उंच भागातल्या जमिनीला पाणीपुरवठयाची सोय उपलब्ध करून द्यावयाची असेल तर हे पाणी उंचावर न्यावे लागते. यासाठी ऑईल इंजिन्स व विजेचे पंप यांचा वापर केला जातो. महाराष्ट्रात एकूण जलसिंचन क्षेत्रांपैकी ८टक्के क्षेत्र हे उपसा जलसिंचनाचे आहे. महाराष्ट्रात मुख्यत्वेकरून दक्षिण महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर जिल्हा आणि कोकणामध्ये रत्‍नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयात उपसा जलसिंचनाद्वारे जमिनीला पाणीपुरवठा केला जातो.

सिंचन पद्धतीतील तुलनात्मक तक्ता
निकष मोकाट पाट ठिबक तुषार
खर्च कमी साधारण सुरुवातीचा खर्च जास्त खर्च जास्त
श्रम कमी दारे धरण्यास कमी कमी
पाण्याची बचत होत नाही होत नाही उत्तम बचत होते बचत होते
देखभाल कमी खर्च लागतो कमी कमी
जमिनीवर होणारे परिणाम जमिनीचे कण हलतात पिकांना पाणी स्पर्श करते उत्तम पद्धत आहे.उतारापासून सऱ्याची लांबी ठेवावी. जमिनीवर परिणाम नही.तणांची संख्या कमी उंच सखल जमिनीलाही पाणी पुरवठा करता येतो,योग्यवेळी योग्य प्रमाणत पाणी देता येते.

जलसिंचन पद्धती

जलसिंचनाच्या आधुनिक पद्धती

चित्रदालन

संदर्भ

Tags:

जलसिंचन पद्धती जलसिंचनाचे कार्यपद्धतीजलसिंचन पद्धती जलसिंचन पद्धती जलसिंचनाच्या आधुनिक पद्धतीजलसिंचन पद्धती चित्रदालनजलसिंचन पद्धती संदर्भजलसिंचन पद्धतीकॅनडाचीनब्राझिलरशिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

घनकचरायकृतअष्टविनायकमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेजागरण गोंधळकालभैरवाष्टकजॉन स्टुअर्ट मिलमहाराष्ट्रातील खासदारांची यादीयूट्यूबजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)मांगनाशिकइतिहासाच्या अभ्यासाची साधनेतुणतुणेमराठी भाषा दिनप्राथमिक शिक्षणशीत युद्धसंस्कृतीकुळीथक्रिकेटचा इतिहाससोलापूरसंख्यामहासागरचंद्रगुप्त मौर्यमराठीतील बोलीभाषाहोमरुल चळवळडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनपरदेशी भांडवलभारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७फेसबुकअजिंठा लेणीपंचायत समितीपंकजा मुंडेस्वामी समर्थनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीजागतिकीकरणबसवेश्वरसमाजशास्त्रसोनारहोळीमाढा विधानसभा मतदारसंघगौतमीपुत्र सातकर्णीआकाशवाणीशहाजीराजे भोसलेधनगरए.पी.जे. अब्दुल कलामभारतातील जातिव्यवस्थापुरस्कारसिंधुदुर्ग जिल्हाक्षय रोगवर्णनात्मक भाषाशास्त्रसंधी (व्याकरण)राहुल गांधीसमुपदेशनमहानुभाव पंथउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघसंजय हरीभाऊ जाधवआनंद शिंदेविराट कोहलीआरोग्यवातावरणॲडॉल्फ हिटलरसनईनफागोंदवलेकर महाराजनाणकशास्त्रसप्तशृंगी देवीलहुजी राघोजी साळवेहिंगोली जिल्हालोकशाहीविजयसिंह मोहिते-पाटीलवडहळदराज्यपालरवींद्रनाथ टागोर🡆 More