सुंदरलाल बहुगुणा

सुंदरलाल बहुगुणा ( मारोडा-टेहरी, उत्तराखंड, ९ जानेवारी १९२७, २१ मे २०२१) हे एक प्रख्यात भारतीय पर्यावरणवादी असून चिपको आंदोलनाचे प्रणेते होते.

सुंदरलाल बहुगुणा
सुंदरलाल बहुगुणा टेहरी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना

चिपको आंदोलन

महात्मा गांधींच्या तत्त्वांना अनुसरून सुंदरलाल बहुगुणा यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध लोकांना एकत्र केले. त्यासाठी त्यांनी हिमालयातील जंगले आणि आणि पर्वतांमधून ४ हजार सातशे किलो मीटरचा पायी प्रवास केला. त्यावेळी मोठ्या प्रकल्पांमुळे हिमालयातील नाजुक पर्यावरणावर होणारे गंभीर दुष्परिणाम त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे खेड्यांतील लोकांच्या जीवनावर होणारा परिणामही त्यांनी जवळून अनुभवला. यातूनच १९७३ साली चिपको आंदोलनाची सुरुवात झाली. हिमालयाच्या पायथ्याच्या प्रदेशात असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशाने मोठ्या प्रमाणात तोडली जाणार होती. त्या विरोधात चंडीप्रसाद भट्ट आणि सुंदरलाल बहुगुणा यांनी मोठे आंदोलन उभे केले. जंगले व झाडे वाचवण्यासाठी सुंदरलाल बहुगुणांनी दुर्गम भागांतील खेड्यापाड्यांतील जनतेला झाडे तोडण्यासाठी आलेल्या कामगारांना थोपवण्यासाठी झाडांना मिठी मारून चिपकण्याची कल्पना दिली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा करून त्यांनी १९८० साली वृक्षतोडीवर १५ वर्षांची बंदी आणली.

टेहरीसाठी उपोषण

टेहरीसारख्या मोठ्या धरणालाही सुंदरलाल बहुगुणा यांचा विरोध होता. १९९५ साली हे धरण होऊ नये यासाठी त्यांनी ४५ दिवसांचे उपोषण केले. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी टेहरी धरणामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली. धरणाचे काम सुरूच राहिल्यांने बहुगुणांनी महात्मा गांधींच्या समाधिस्थळाजवळ बसून ७४ दिवसांचे प्रदीर्घ उपोषण केले. काम तात्पुरते थांबले. मात्र २००१ साली या धरणाचे काम परत सुरू झाल्यावर सुंदरलाल बहुगुणा यांना अटक झाली.

भागीरथी नदीच्या काठी कोटी या गावाजवळ त्यांचे पर्यावरण रक्षणाचे काम आजही (२०१७ साली) चालू आहे.

पुरस्कार

संदर्भ

Tags:

सुंदरलाल बहुगुणा चिपको आंदोलनसुंदरलाल बहुगुणा टेहरीसाठी उपोषणसुंदरलाल बहुगुणा पुरस्कारसुंदरलाल बहुगुणा संदर्भसुंदरलाल बहुगुणाउत्तराखंडपर्यावरण

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सावता माळीहवामाननामभाषाऊससोनेबाराखडीकल्याण (शहर)संत तुकारामभारताचे राष्ट्रपतीबसवेश्वरभारतीय रिझर्व बँकअमरावती जिल्हामराठवाडारक्तगटउदयनराजे भोसलेइंदिरा गांधीयशवंत आंबेडकरखडकवासला विधानसभा मतदारसंघघनसावंगी विधानसभा मतदारसंघप्रेमानंद गज्वीमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनगगनगिरी महाराजवर्धा लोकसभा मतदारसंघभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळगोवावंचित बहुजन आघाडीजागतिक कामगार दिनहदगाव विधानसभा मतदारसंघशेकरूचंद्रयेवलामहाराष्ट्र गीतमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेप्रदूषणकमळपरतूर विधानसभा मतदारसंघतरसविठ्ठल रामजी शिंदेसंदीप खरेइतर मागास वर्गप्रेमकरमाळा विधानसभा मतदारसंघसायबर गुन्हाप्रज्ञा पवारज्ञानेश्वरअर्थसंकल्पमतदार नोंदणीशिवनेरीहळदबहिणाबाई पाठक (संत)नाणेप्राथमिक आरोग्य केंद्रशिर्डी लोकसभा मतदारसंघपुरस्कारछत्रपती संभाजीनगरकुत्राकर्ण (महाभारत)व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेलमेष रासपंचशीलजगातील देशांची यादीकळसूबाई शिखरतूळ रासअर्थशास्त्रशाहू महाराजप्रतापराव गणपतराव जाधवघोरपडडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारहृदयकुणबीसह्याद्रीदौंड विधानसभा मतदारसंघरिसोड विधानसभा मतदारसंघउद्धव स्वामीआंतरराष्ट्रीय नाणेनिधीशिवाजी महाराजकुस्ती🡆 More