श्रीकृष्ण केशव क्षीरसागर

श्री.के. क्षीरसागर (नोव्हेंबर ६, १९०१ - एप्रिल २९, इ.स. १९८०) हे मराठी लेखक, विचारवंत, समीक्षक होते. प्रा. श्री. के. क्षीरसागर हे टीकाकार म्हणून परिचित आहेत, तसेच ते ‘ज्ञानकोश’कार केतकरांचे समविचारी म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

श्रीकृष्ण केशव क्षीरसागर
200pix
जन्म नाव श्रीकृष्ण केशव क्षीरसागर
जन्म नोव्हेंबर ६, १९०१
पाली, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू एप्रिल २९, इ.स. १९८०
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी, समीक्षा
विषय भाषा, समाज
वडील केशव क्षीरसागर

जीवन

प्रा. श्री.के. क्षीरसागरांचा जन्म नोव्हेंबर ६, १९०१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाली गावी झाला. सातारा जिल्ह्यातल्या टेंभुर्णी गावी शालेय शिक्षण पुरे करून त्यांनी पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात उच्चशिक्षण घेतले. पुढे त्यांनी पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली. इ.स. १९४५ सालापासून त्यांनी महाविद्यालयात प्राध्यापकी केली. ते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कला व विज्ञान महाविद्यालयात (जुने नाव - एमईएस काॅलेज, आत्ताचे नाव - आबासाहेब गरवारे कॉलेज ऑफ आर्ट्‌स ॲन्ड सायन्स) मराठी विभागाचे प्रमुख होते. (संदर्भ - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा वार्षिक अहवाल १९५९-६०)

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
आधुनिक राष्ट्रवादी रवींद्रनाथ ठाकूर समीक्षा १९७०
उमरखय्यामची फिर्याद समीक्षा १९६१
टीकाविवेक समीक्षा १९६५
तसबीर आणि तकदीर आत्मचरित्र १९७६
निवडक श्री.के. क्षीरसागर लेखसंकलन साहित्य अकादमी
बायकांची सभा प्रहसन १९२६
मराठी भाषा: वाढ आणि बिघाड वैचारिक राज्य मराठी विकास संस्था २०००
राक्षसविवाह १९४०
वादे वादे समीक्षा
व्यक्ती आणि वाङ्मय समीक्षा १९३७
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर १९३७
समाजविकास काँटिनेंटल प्रकाशन
स्त्रीशिक्षण परिषदेची वाटचाल १९३३

विशेष

  • प्रा. श्री.के. क्षीरसागर १९५९ साली मिरजेला भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • महाराष्ट्र सरकार दर वर्षी वाङ्मयीन समीक्षेवरच्या एका ग्रंथाला श्री.के क्षीरसागर यांच्या नावाचा पुरस्कार देते. २०१७ साली हा पुरस्कार विश्राम गुप्ते यांना 'नवं जग नवी कविता' या पुस्तकाला मिळाला आहे. २०१४ साली डॉ. शोभा नाईक यांना 'मराठी-कन्नड सांस्कृतिक सहसंबंध' या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार २०१८ साली डाॅ पराग घोंगे यांच्या 'अभिनय चिंतन - भरतमुनी ते बर्टोल्ड ब्रेख्त' या ग्रंथाला मिळाला.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वंजारीलक्ष्मीपोलीस पाटीलमानवी शरीरमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९भारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीवृत्तपत्रतिथीनांदेड लोकसभा मतदारसंघजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)नालंदा विद्यापीठनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघभारतातील राजकीय पक्षसम्राट अशोकमहाराष्ट्रातील राजकारणछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसतुळजाभवानी मंदिरजैवविविधतापोवाडाईशान्य दिशाए.पी.जे. अब्दुल कलामकामगार चळवळभारतातील मूलभूत हक्कहिंदू धर्महिंगोली जिल्हाअश्वगंधालातूर लोकसभा मतदारसंघवि.स. खांडेकरमुंजभारतातील जातिव्यवस्थाबौद्ध धर्मजॉन स्टुअर्ट मिलराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)चैत्रगौरीकोटक महिंद्रा बँककापूसक्षय रोगब्रिक्सनाशिकदलित एकांकिकाभीमराव यशवंत आंबेडकरऋग्वेदजाहिरातशाळासंयुक्त महाराष्ट्र समितीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९गुळवेलविजय कोंडकेभारतीय जनता पक्षतरसइंग्लंडसुतकप्रदूषणआद्य शंकराचार्यसामाजिक समूहमराठी व्याकरणराज्यसभाभाषालंकारजागतिक बँकभीमाशंकरजगातील देशांच्या राजधान्यांची यादीइंदुरीकर महाराजज्यां-जाक रूसोजालना विधानसभा मतदारसंघपानिपतची तिसरी लढाईसंवादराहुल कुलचंद्रबावीस प्रतिज्ञाविशेषणज्ञानपीठ पुरस्कारअमरावती जिल्हाराज ठाकरेदिंडोरी लोकसभा मतदारसंघआनंद शिंदेजेजुरी🡆 More