मोसमी पाऊस

वर्षाच्या विशिष्ट ऋतूत पडणाऱ्या पावसाला मोसमी पाऊस किंवा मॉन्सून म्हणतात.

अर्थात, भारतीय उपखंडातील मोसमी पावसालाही मॉन्सून म्हणतात. भारताच्या बाबतीत हा भारतातील शेतीवर, मानवी जीवनावर आणि भारताच्या आर्थिक बाबींवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. साधारणपणे, ठरावीक काळाने दिशा बदलणारे वारे यांना मॉन्सून म्हंटले जाते.

भारताखेरीज जगातल्या आणखीही काही भागातही मॉन्सून असतो. उदा.

असे असले तरी, वर सांगितलेल्या देशांत पावसाचे अन्य ऋतूही असतात. भारतीय उपखंडाचे तसे नाही. येथे जून ते सप्टेंबर हा पावसाचा ’पावसाळा’ नावाचा एकमेव ऋतू आहे. भारताच्या नैर्ऋत्येकडून हा पावसाळा येतो म्हणून त्याला त्याला ’नैर्ऋत्य मॉन्सून’ म्हणतात. ज्या वाऱ्यांबरोबर हा पाऊस भारतात प्रवेश करतो ते वारे हिंदी महासागरअरबी समुद्र यांवरून येतात.

२३ सप्टेंबर या दिवशी नंतर भारतीय उपखंडातून जेव्हा हा ’नैर्ऋत्य मॉन्सू्न’ परततो तेव्हा परतीच्या वाटेवरील भारताच्या ईशान्य भागाला व पूर्व किनाऱ्याला पाऊस देतो. त्या ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात पडणाऱ्या पावसाला ’ईशान्य मॉन्सून’चा पाऊस असे म्हणतात. हा पडणारा प्रदेशाचे क्षेत्र भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या मानाने अत्यल्प असते. या पावसात विजांचा कडकटाड, विजेचे लोळ आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस या घटना दिसून येतात.

दरवर्षी भारतात पडणाऱ्या या मोसमी पावसाचे प्रमाण आणि स्वरूप एकसारखे नसते. या पावसावर परिणाम करणारे वातावरणात अनेक घटक आहेत. त्यापैकी दक्षिण अमेरिकेजवळून वाहणारे एल निनो व ला निनो हे सागरी प्रवाहही आहेत.

भारतावर मान्सून दाखल झाल्याच्या वर्षागणिक तारखा

  • इ.स. २००५ - ७ जून
  • इ.स. २००६ - २६ मे
  • इ.स. २००७ - २८ मे
  • इ.स. २००८ - ३१ मे
  • इ.स. २००९ - २३ मे
  • इ.स. २०१० - ३१ मे
  • इ.स. २०११ - २९ मे
  • इ.स. २०१२ - ५ जून

वर्ष, भारतावर पडलेल्या पावसाची टक्केवारी आणि दिलेला अंदाज

१९९२ ९३ % ९२ %
१९९३ १०० % १०३ %
१९९४ ११० % ९२ %
१९९५ १०० % ९७ %
१९९६ १०३ % ९६ %
१९९७ १०२ % ९२ %
१९९८ १०५ % ९९ %
१९९९ ९६ % १०८ %
२००० ९२ % ९९ %
२००१ ९१ % ९८ %
२००२ ८१ % १०१ %
२००३ १०२ % ९६ %
२००४ ८७ % ९८ %
२००५ ९९ % ९८ %
२००६ १०० % ९२ %
२००७ १०६ % ९३ %
२००८ ९८ % १०० %
२००९ ७८ % ९३ %
२०१० १०२ % १०२ %
२०११ १०२ % ९५ %
२०१२ ९३ % 99%

Tags:

शेती

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताचे पंतप्रधानअमित शाहस्त्रीवादी साहित्यसुतकबखरमानवी शरीरन्यूटनचे गतीचे नियमकाळभैरवसम्राट अशोक जयंतीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)आकाशवाणीबीड जिल्हाधर्मो रक्षति रक्षितःकुष्ठरोगउचकीराणी लक्ष्मीबाईमहाराष्ट्र विधान परिषदबैलगाडा शर्यतहिमालयकेळकामगार चळवळनिसर्गकलिना विधानसभा मतदारसंघप्रहार जनशक्ती पक्षनाशिक लोकसभा मतदारसंघपृथ्वीचे वातावरणमुघल साम्राज्यसावित्रीबाई फुलेगोदावरी नदीमहाराष्ट्रामधील जिल्हेज्योतिर्लिंग२०१४ लोकसभा निवडणुकाभारतीय पंचवार्षिक योजनाकॅमेरॉन ग्रीनगुढीपाडवाराज्यव्यवहार कोशनितीन गडकरीज्ञानेश्वरअहमदनगर लोकसभा मतदारसंघपरभणी विधानसभा मतदारसंघविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीबंगालची फाळणी (१९०५)प्राथमिक आरोग्य केंद्रस्त्री सक्षमीकरणमण्यारहनुमानसातारा लोकसभा मतदारसंघमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदाजिंतूर विधानसभा मतदारसंघओवाउंबरविद्या माळवदेदेवनागरीमौर्य साम्राज्यरतन टाटासर्वनाममराठी संतसंवादशिवनेरीनैसर्गिक पर्यावरणबिरसा मुंडाधाराशिव जिल्हाभारूडपुणेवाघभारतीय जनता पक्षसोयाबीनथोरले बाजीराव पेशवेभारताची अर्थव्यवस्थामहाराष्ट्रातील राजकारणसोलापूरपांडुरंग सदाशिव सानेहिंदू तत्त्वज्ञानभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीस्वादुपिंडमहाराष्ट्रातील आरक्षणनांदेड जिल्हासोळा संस्कार🡆 More