मुतखडा

मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मुतखडा म्हणतात.

लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मुतखडा तयार होतो.

मुतखडा
मूतखडा

मुतखडा तयार होण्याचा धोका असणारे

  • ८०% रुग्ण पुरुष असतात.
  • वारंवार लघवीचा जंतुसंसर्ग होणारे रुग्ण
  • २० ते ४९ वर्षांच्या व्यक्ती
  • कुटुंबातील लोकांना मुतखडा होण्याचा इतिहास असणाऱ्या व्यक्ती
  • ज्या व्यक्तींमध्ये रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण अधिक असते, त्यांना युरिक अ‍ॅसिडपासून मुतखडे तयार होण्याची शक्यता जास्त असते.
  • गर्भारपणात प्रोजेस्टेरॉन नावाचे स्राव वाढल्याने लघवीचा वेग कमी होतो, त्याने खडे तयार होतात.
  • गर्भारपणात कॅल्शियम मूत्रात उत्सर्जित होण्याने मुतखडे तयार होण्याचे प्रमाण वाढते.

मुतखडा तयार होण्याची प्रकिया

  • लघवीचे प्रमाण कमी झाल्याने किंवा लघवीतील मुतखडा तयार करण्याऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा तयार होतो.
  • पाणी अथवा पातळ पदार्थ कमी घेण्याने किंवा श्रम, व्यायाम, जुलाब या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मुतखडा तयार होण्याचे प्रमाण वाढते.
  • मूत्रमार्गात होण्याऱ्या जंतुसंसर्गामुळे त्यामुळे नायडस(??) तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे मुतखड्यात रूपांतर होते.

मुतखड्याचे प्रकार

  • कॅल्शियमचे- कॅल्शियम पासून कॅल्शियम ऑक्झॅलेटचे किंवा कॅल्शियम फॉस्फेटचे खडे तयार होतात.
  • रक्तातील व लघवीतील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याने युरिक अ‍ॅसिडचे मूतखडे तयार होतात.

लक्षणे

मुतखडा 
मुतखड्याच्या वेदना कोणत्या भागात होतात, ते दाखविणारे एक चित्र - पीडित भाग काळ्या रंगाने दाखविलेला आहे.
  • सामान्यतः मुतखड्यामुळे लक्षणे दिसुन येत नाहीत परंतु जेव्हा मूत्रमार्गात त्याची हालचाल होते किंवा अचानक अडथळा निर्माण होतो त्यावेळी तीव्र वेदना सुरू होतात. ह्या वेदना ज्या बाजूला मूतखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होतात.
  • लघवीत रक्त गेल्याने लघवी लाल रंगाची होते.
  • मुतखडा मूत्राशयाच्या जवळ पोहचल्यावर लघवी पुन्हा-पुन्हा आल्याची संवेदना होते किंवा लघवी होताना जळजळ झाल्याची जाणीव होते.
  • यामध्ये जंतुसंसर्ग झाल्यास ताप व थंडी वाजून येते.

तपासणीच्या पद्धती

  • पोटाची सोनोग्राफी केल्यास मुतखड्याचे आकारमान, स्थान समजते.
  • पोटाच्या क्ष-किरण तपासणीमध्ये मुतखड्याचे आकारमान व घनता जाणता येते.
  • मूत्रमार्गाची एंडोस्कोपी ही तपासणी केल्यास मुतखड्याबद्दल अधिक तपशील समजून येतात.

मुतखडा होणे टाळण्यासाठी

१) पाणी जास्त प्यावे

२) लघवीला शक्यतो रोखू नये

मुतखड्यामुळे होणाऱ्या वेदनांवर उपाय

आयुर्वेदानुसार, मुतखड्यामुळे होणारी पोटदुखी थांबण्यासाठी,

  • तातडीचा घरघुती उपाय म्हणून अर्धा कप गरम पाण्यात साजूक तूप टाकून पिण्याने १५ मिनिटात त्यामुळे उद्भवणारी पोटदुखी थांबते.
  • सराटे (काटेगोखरू) याचा काढा तूप टाकून दिल्यास, मुतखडा पडून जाण्यास व वेदना कमी होण्यास मदत होते.
  • कुरडू नावाच्या वनस्पतीची अथवा वायवर्ण्याची साल याचा स्वरस अथवा काढा यावर उत्तम आहे.
  • कडुलिंबाच्या पाल्याची राख दोन ग्रॅंॅंम पाण्याबरोबर नियमित घेतल्याने मुतखडा विरघळून बाहेर पडतो.
  • जर खडा लहान असेल व जास्त जुना नसेलतर मेंदीचे साल बारीक वाटून चूर्ण करावे. हे चूर्ण सकाळी अर्धा चमचा (२-३ ग्रॅंॅंम ) पाण्याबरोबर नियमित घेतल्याने खडा विरघळून लघवी बरोबर निघून जातो.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

मुतखडा तयार होण्याचा धोका असणारेमुतखडा तयार होण्याची प्रकियामुतखडा मुतखड्याचे प्रकारमुतखडा लक्षणेमुतखडा तपासणीच्या पद्धतीमुतखडा होणे टाळण्यासाठीमुतखडा मुतखड्यामुळे होणाऱ्या वेदनांवर उपायमुतखडा संदर्भ आणि नोंदीमुतखडा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मोर्शी विधानसभा मतदारसंघभारताच्या पंतप्रधानांची यादीमुंबई इंडियन्सयकृतमुळाक्षरभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तजालना लोकसभा मतदारसंघश्रीनिवास रामानुजनमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभिवंडी लोकसभा मतदारसंघहनुमानहृदयमौर्य साम्राज्यवसंतराव नाईकएकनाथमाहितीकाळूबाईभारतीय लष्करनवग्रह स्तोत्रसमाजशास्त्रभारताच्या राष्ट्रपतींची यादीपुरंदर विधानसभा मतदारसंघसातव्या मुलीची सातवी मुलगीफारसी भाषाबहावावर्धा लोकसभा मतदारसंघविष्णुराज्यपालताराबाई शिंदेचलनजेजुरीकुंभ राससंत तुकारामउदयनराजे भोसलेज्ञानेश्वरीशिवाजी महाराजांची राजमुद्रासावित्रीबाई फुलेराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)जागतिक कामगार दिनमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीहिंगोली विधानसभा मतदारसंघसोळा संस्कारकमळआर्वी विधानसभा मतदारसंघदिव्या भारतीराम सातपुतेसदा सर्वदा योग तुझा घडावावाशिम जिल्हाबाबा आमटेयशवंतराव चव्हाणसौर ऊर्जाजया किशोरीमाळशिरस विधानसभा मतदारसंघअकोला पूर्व विधानसभा मतदारसंघजिल्हाबलुतेदारभारतरत्‍नबुलढाणा लोकसभा मतदारसंघभारतातील समाजसुधारकमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीपाणीविष्णुसहस्रनामगोदावरी नदीशुभेच्छानर्मदा नदीअक्षय्य तृतीयासमर्थ रामदास स्वामीसंख्याभारतातील शासकीय योजनांची यादीपरभणीविदर्भविजयसिंह मोहिते-पाटीलतुळजाभवानी मंदिरसम्राट अशोक जयंतीक्रियापदसात बाराचा उतारावंजारीराष्ट्रीय लोकशाही आघाडी🡆 More