मिरची: वनस्पतीच्या प्रजाती

मिरची हे उष्ण कटिबंधीय अमेरिका येथील फळ आहे असे मानले जाते.

याची चव तिखट असते. हे फळ रंगाने बहुदा हिरवे असते. परंतु पिवळ्या व लाल रंगातही येते. याची पाने गुळगुळीत, एकाआड एक अशी येतात. मिरचीच्या फळांमध्ये अ, ब, क आणि ई जीवनसत्त्वे असतात. तसेच यात कॅल्शिअम, फॉस्फरस ही खनिजे असतात. मिरचीमध्ये असलेल्या कॅपसायसीन नावाच्या पदार्थामुळे मिरचीला तिखट चव प्राप्त होते.

मिरची: लागवड, मिरच्यांच्या जाती, मिरचीचे लाल तिखट बनविण्याची पद्धत
मिरचीचे झाड

लागवड

दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, इजिप्त, स्पेन, चीन, जपान, व्हिएतनाम, ब्रह्मदेश, मलेशिया, इंडोनेशिया, पाकिस्तान या देशात मिरची लागवड केली जाते. मिरचीच्या उत्पादनाच्या बाबतीत जगात भारताचा पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्रात नंदुरबार हे मिरचीच्या बाजारपेठेचे प्रमुख शहर म्हणून ओळखले जाते. या जिल्ह्यात मिरची पिकासाठी पोषक वातावरण असल्याने मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. नंदुरबारमध्ये ओली मिरची पथाऱ्या करून वाळवून प्रक्रिया केली जाते. नंदुरबारच्या मिरचीला तिखटपणा, टिकण्याची क्षमता, वैशिष्ट्यपूर्ण रंग आणि चव यामुळे परराज्यातून विशेष मागणी असते. ऑक्टोबरपासून सुरू होणारा मिरचीचा हंगाम हा फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत असतो.

मिरच्यांच्या जाती

  • अग्निरेखा
  • काश्मिरी
  • जयंती
  • ज्वाला
  • २७५
  • नंदिता रोशनी
  • पंत सी १
  • पांडी
  • फुले ज्योती
  • फुले सई
  • ब्याडगी
  • ब्लॅक सीड
  • मुसळेवाडी सिलेक्‍शन
  • लवंगी
  • संकेश्‍वरी
मिरची: लागवड, मिरच्यांच्या जाती, मिरचीचे लाल तिखट बनविण्याची पद्धत 
मिरचीचे झुडुप

मिरचीचे लाल तिखट बनविण्याची पद्धत

मिरची पिकल्यावर लाल होते, पण ओलसरच राहते. तिला मग उन्हात नीट वाळवून पूर्णपणे सुकल्यावर कुटून तिचे स्वयंपाकात वापरावयाचे लाल तिखट बनते. शेतांत लावण्यासाठी सध्या मिरचीची अनेक वाणे उपलब्ध आहेत; अग्निरेखा, नंदिता रोशनी, ज्वाला, जयंती, २७५, ब्लॅक सीड इत्यादी अशी त्यांची नावे आहेत. नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर येथे, कुही तालुक्यात व मांढळ येथे, तर अचलपूरच्या पथरोट या गावीही मिरचीचे उत्पादन घेतले जाते.

हे सुद्धा पहा

चित्रदालन

Tags:

मिरची लागवडमिरची मिरच्यांच्या जातीमिरची चे लाल तिखट बनविण्याची पद्धतमिरची हे सुद्धा पहामिरची चित्रदालनमिरचीअमेरिकाकॅल्शिअमचवजीवनसत्त्वेफळ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गुरुत्वाकर्षणलक्ष्मीसमर्थ रामदास स्वामीमूकनायकचार धामब्रिज भूषण शरण सिंगभारतातील महानगरपालिकानाथ संप्रदायगुलमोहरगुळवेलशिखर शिंगणापूरस्थानिक स्वराज्य संस्थाभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीसुधा मूर्तीतोरणासिंधुताई सपकाळविठ्ठल उमपजन गण मनभारतव्याघ्रप्रकल्पभारतीय आडनावेनैसर्गिक पर्यावरणआवळाकोरेगावची लढाईभारताची राज्ये आणि प्रदेशशरद पवारपरशुरामभारताचा महान्यायवादीसाडेतीन शुभ मुहूर्तकाळूबाईमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)व्यंजनब्रिक्सओझोनसिंधुदुर्ग जिल्हाब्राझीलजैन धर्मभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारताचा इतिहासधनादेशक्रिकेटचा इतिहासमहाराष्ट्रकोल्हापूर जिल्हाहॉकीअलिप्ततावादी चळवळरतन टाटाकुणबीगुजरातपांढर्‍या रक्त पेशीहडप्पा संस्कृतीजाहिरातविष्णुसहस्रनाममहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळकोकण रेल्वेनारायण विष्णु धर्माधिकारीहत्तीरोगपुरंदर किल्लाबाबासाहेब आंबेडकरमायकेल जॅक्सनकामधेनूआंबेडकर जयंतीकार्ल मार्क्सजवाहर नवोदय विद्यालयराष्ट्रवादकोकणभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेमिया खलिफाभारतीय रुपयाहरिहरेश्व‍रॲडॉल्फ हिटलरराष्ट्रकुल खेळपंचशीलअर्जुन पुरस्कारआंतराराष्ट्रीय नृत्य दिवसबुद्धिबळजागतिक व्यापार संघटनावृत्तपत्र🡆 More