महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचि स्थापना १९ नोव्हेंबर १९६०ला झाली.

'मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व कला या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रास लाभलेला थोर वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी, मराठी भाषेत विविध विषयांवरील मूलभूत संशोधन व प्रकाशन यांना उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने ही संस्था उभारली. मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते.

महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेली पुस्तके

महाराष्ट्राची भाषा, संस्कृती, साहित्य आणि इतिहास तसेच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणाऱ्या विषयांवर मराठीमध्ये ग्रंथरचना करणे हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या वाङ्मयीन गरजा लक्षात घेऊन सुरुवातीपासूनच मंडळ मौलिक व बहुविध वाङ्मयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे. ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधन स्वरूप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाच्या वतीने २०१५ सालापूर्वी प्रकाशित झालेली ४४४ पुस्तके ई-बुक स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून दिली आहेत. मंडळाच्या [[१]] या वेबसाइटवर ही पुस्तके उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या स्थापनेपासूनच्या अध्यक्षांची यादी क्रमानुसार अशी-(तर्कतीर्थ) लक्ष्मणशास्त्री जोशी, सुरेन्द्र बारलिंगे, यशवंत मनोहर, य. दि. फडके, विद्याधर गोखले, मधुकर आष्टीकर, द. मा. मिरासदार, सुरेश द्वादशीवार, रा. रं. बोराडे, रतनलाल सोनग्रा, मधु मंगेश कर्णिक, बाबा भांड

कोणती पुस्तके उपलब्ध?

या साईटवर 'सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने', 'लिओनार्दो दी विंची'पासून ते 'सुती वस्त्रोद्योग', 'मधुमेह'पर्यंत अनेक विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. महाराष्ट्राचे शिल्पकार या मालिकेत अहिल्याबाई होळकर, महर्षी कर्वे, क्रांतिसिंह नाना पाटील, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, वसंतराव नाईक या सर्वांची चरित्रेही आहेत. भरताव्या नाट्य शास्त्राचा अठ्ठाविसावा अध्याय, स्ट्रॅविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र ते महाराष्ट्रातील काँग्रेसचा स्वातंत्र्यलढा अशी या पुस्तकांची रेंज आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या योजना

  • पुस्तक प्रकाशन योजना - विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित करणे
  • महाराष्ट्राचे शिल्पकार चरित्रमाला योजना
  • उत्कृष्ट ग्रंथांची भाषांतरे योजना
  • ललित व ललितेतर वाड्:मयाच्या प्रकाशनार्थ अनुदान योजना
  • नवलेखक पुस्तक प्रकाशनासाठी उत्तेजनार्थ अनुदान योजना
  • नवलेखक कार्यशाळा अनुदान योजना
  • नियतकालिकांना अनुदान योजना
  • अन्य मराठी साहित्य संमेलनांना अनुदान योजना

नेटवर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असलेली पुस्तकांची यादी

  • आरोग्य आणि आहारशास्त्र
  • आर्थिक सिद्धान्त व अर्धविकसित प्रदेश
  • आसरा
  • महाराष्ट्राचे शिल्पकार - तेजस्विनी अहिल्याबाई होळकर
  • आशियाई क्रीडास्पर्धा
  • महाराष्ट्राचे शिल्पकार - भाई उद्धवराव पाटील
  • उद्‌भट आणि त्याचा काव्यालंकार सारसंग्रह
  • एमिली डिकिन्सन : निवडक कविता
  • कबड्डी
  • कल्लपा यशवंत ढाले ह्यांची दुर्मिळ डायरी
  • कात्यायन शुल्ब सूत्रे
  • खानदेशातील कृषक जीवन - सचित्र कोश
  • गजाआडच्या कविता
  • सर्वज्ञ श्री चक्रधर
  • चरियापिटक
  • चिरकालीन सिरॅमिक्स
  • चौदा पत्रे
  • जीवनसंग्राम
  • झुंडशाहीचे बंड
  • टोळ्ळुगट्टी
  • ट्रांझिस्टर
  • डिझेल एंजिन
  • महाराष्ट्राचे शिल्पकार - ताराबाई शिंदे
  • ताऱ्यांचे अंतरंग
  • महाराष्ट्राचे शिल्पकार - दादासाहेब फाळके
  • हुतात्मा दामोदर हरि चापेकर यांचे आत्मवृत्त
  • धन्याचा बंदा गुलाम
  • धर्मकीर्तन
  • महाराष्ट्राचे शिल्पकार –महर्षी धोंडो केशव कर्वे
  • नाट्यमंडप
  • महाराष्ट्राचे शिल्पकार - नाना पाटील
  • पंडिता रमाबाई यांचा इंग्लंडचा प्रवास
  • पाणी पुरवठा
  • प्लॅस्टिकची मेजवानी
  • फळे व भाज्यांपासून टिकाऊ पदार्थ
  • बहुरूपी बहुगुणी कार्बन
  • भरताच्या नाट्य शास्त्राचा अठ्ठाविसावा अध्याय
  • भौतिकी शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते -भाग १ ते ५
  • मधुमेह
  • मराठी वाङ्‍मयकोश खंड दुसरा भाग एक मराठी ग्रंथकार (दिवंगत)
  • मराठी वाङ्‍मयकोश खंड ३ रा (ग्रंथपरिचय) इ.स. १८५८ ते १९६०
  • महात्मा गांधी – रविंद्रनाथ ठाकूर
  • महात्मा ज्योतिराव फुले
  • महाराष्ट्राची सागरी मत्स्यसंपत्ती
  • मानवी आनुवंशिकता
  • माहेरी गेली
  • मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात सुधारणा
  • मोरस कथा दशावतार
  • मोरस-मराठी कविता दशावतार
  • महाराष्ट्राचे शिल्पकार – यदुनाथ थत्ते
  • महाराष्ट्राचे शिल्पकार - बॅ. राजाभाऊ खोब्रागडे
  • लिओनार्दो दा विंची
  • लुकेना
  • वंश आणि वंशवाद
  • महाराष्ट्राचे शिल्पकार – वसंतराव नाईक
  • महाराष्ट्राचे शिल्पकार - डॉ. विठ्ठलराव विखेपाटील
  • विलक्षण जपानी
  • संगीताचार्य पं. विष्णू नारायण भातखंडे
  • महाराष्ट्राचे शिल्पकार - शंकरराव किर्लोस्कर
  • शरीर -एक समरांगण
  • संगीत आणि कल्पकता
  • श्री संत शुभराय महाराज कलाकृतीसंग्रह-चित्रचिरंतन
  • समर्थ रामदासांची साहित्य सृष्टी
  • संहितासमीक्षा आणि पारिभाषिक संज्ञा
  • सुती वस्त्रोद्योग
  • सुब्बण्णा
  • सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने
  • स्ट्रॅविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र
  • हॉकी
  • THE HIGH-CASTE HINDU WOMAN(PANDITA RAMABAI)
  • Maratha Wall Paintings

(अपूर्ण यादी)

मंडळातर्फे मराठी साहित्यसेवेसाठी दिले जाणारे पुरस्कार

  • गौरवमूर्ती पुरस्कार
  • स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‍मय पुरस्कार
  • विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार
  • श्री. पु. भागवत पुरस्कार


अधिकृत संकेतस्थळ

https://msblc.maharashtra.gov.in/ Archived 2018-05-01 at the Wayback Machine. 

Tags:

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेली पुस्तकेमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ कोणती पुस्तके उपलब्ध?महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या योजनामहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ नेटवर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असलेली पुस्तकांची यादीमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मंडळातर्फे मराठी साहित्यसेवेसाठी दिले जाणारे पुरस्कारमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अधिकृत संकेतस्थळमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळतर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कावीळआचारसंहिताराजन गवसभारतातील मूलभूत हक्कराष्ट्रकूट राजघराणेभारतीय निवडणूक आयोगआंब्यांच्या जातींची यादीचलनघटहळदअमरावती विधानसभा मतदारसंघपानिपतची पहिली लढाईभारताचा इतिहाससर्वनामगांधारीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनभारतधाराशिव जिल्हामलेरियानृत्यसमाजशास्त्रकबड्डीबहिष्कृत भारतऔंढा नागनाथ मंदिरसामाजिक कार्यइतर मागास वर्गसंगीत नाटकवाचनमुघल साम्राज्यनाटकशिवाजी महाराजांची राजमुद्रावित्त आयोगपु.ल. देशपांडेमहाराष्ट्रातील किल्लेप्राथमिक शिक्षणझाडकथकदेवेंद्र फडणवीसखडकवासला विधानसभा मतदारसंघनफासुजात आंबेडकरमराठी लिपीतील वर्णमालाजागतिक पुस्तक दिवसहैदरअलीज्ञानेश्वरीशाश्वत विकासकोल्हापूरकल्की अवतारजिंतूर विधानसभा मतदारसंघमहात्मा गांधीजवसपांडुरंग सदाशिव सानेबैलगाडा शर्यतफॅसिझमरक्षा खडसेएकनाथ शिंदेआंबेडकर कुटुंबइतिहासहिंदू विवाह कायदारवी राणाभारताचा भूगोलगोपाळ गणेश आगरकरभीमा नदीपहिले महायुद्धनक्षत्रअकोला पूर्व विधानसभा मतदारसंघसावता माळीशहाजीराजे भोसलेउंबरयंत्रमानवराष्ट्रवादहातकणंगले विधानसभा मतदारसंघपरभणी जिल्हाकोकणगोंदवलेकर महाराजजागतिक बँकपारिजातकभगतसिंगन्यूटनचे गतीचे नियम🡆 More