पुलित्झर पुरस्कार

पुलित्झर पुरस्कार हा वृत्तपत्रीय सदरलिखाण, वाङ्मय आणि सांगीतिक रचनेसाठी दिला जातो.

इ.स. १९१७ साली अमेरिकन प्रकाशक जोसेफ पुलित्झर याने हा पुरस्कार सुरू केला.अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठाकडे या पुरस्काराचे व्यवस्थापन आहे. दरवर्षी २१ प्रकारच्या साहित्याला हा पुरस्कार दिला जातो. दहा हजार डॉलर रोख आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. समाजसेवास्वरूप वृत्तपत्रीय लेखनासाठी एक सुवर्णपदकही असते. जोसेफ पुलित्झर यांच्या इ.स. १९०४ च्या मृत्युपत्रानुसार, लेखनास उत्तम प्रोत्साहन प्रदान करण्याच्या हेतूने हा पुरस्कार पुलित्झर यांनी सुरू केला. पत्रकारितामध्ये चार, अक्षरे आणि नाटक श्रेणीत चार, शिक्षण श्रेणीत एक असे पारितोषिके आणि पाच प्रवासी शिष्यवृत्ती यासाठी पुलित्झर दिला जातो. हा पुरस्कार कोलंबिया यूनिवर्सिटीकडून दिला जातो.

पुलित्झर पुरस्कार

या पुलित्झर पुरस्काराला, पुलित्झर सन्मान किंवा पुलित्झर पारितोषिक असेही म्हटले जाते.

पुलित्झर पुरस्कार मिळालेले भारतीय

  • गोविंद बिहारीलाल : हे बर्कले येथील कोलंबिया विद्यापीठात शिकत होते. नंतर ते सॅनफ्रान्सिस्को एक्झॅमिनरमध्ये विज्ञान संपादक झाले. त्यांना १९३७ मध्ये पत्रकारितेत पुलित्झर पुरस्कार मिळाला.
  • झुंपा लहिरी : भारतीय वंशाच्या झुंपा लाहिरी यांना 'इंटरप्रीटर्स ऑफ मेलडीज' या पुस्तकासाठी 'कादंबरी' गटात हा पुरस्कार इ.स. २००० मध्ये मिळाला. त्यांच्या 'द नेमसेक' या कादंबरीवर मीरा नायर यांनी चित्रपट काढला. त्या बंगाली वंशाच्या असून सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या कला व मानवविद्या समितीच्या सदस्या आहेत.
  • गीता आनंद या भारतीय वंशाच्या पत्रकार असलेल्या महिलेस २००३ मध्ये 'पॉम्प डिसीज अ मस्क्युलर कंडिशन' या मालिकेसाठी हा पुरस्कार मिळाला. त्यावर नंतर 'एक्स्ट्रॅऑर्डिनरी मेझर्स' हा चित्रपट निघाला.’बोस्टन ग्लोब’मध्ये त्या पत्रकारिता करीत होत्या.
  • सिद्धार्थ मुखर्जी हे कर्करोगाचे डॉक्टर असून त्यांनी त्या रोगावर संशोधन केले आहे. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. स्टॅनफर्ड विद्यापीठाचे ते पदवीधर असून 'ऱ्होडस स्कॉलर' म्हणून नावाजले गेले आहेत. त्यांना 'नॉन फिक्शन' गटात 'द एम्परर ऑफ ऑल मेलडीज- अ बायोग्राफी ऑफ कॅन्सर' या पुस्तकासाठी २०११ मध्ये पुलित्झर पुरस्कार मिळाला.
  • विजय शेषाद्री - एक भारतीय वंशाचे पत्रकार. यांना ’थ्री सेक्शन्स’ या काव्यसंग्रहासाठी २०१४ साली पुलित्झर पारितोषिक मिळाले आहे. शेषाद्री न्यूयोर्कमधील एका महाविद्यालयात कविता आणि काव्यशास्त्र शिकवतात. गेलीदोन दशके शेषाद्रींचे नाव अमेरिकी कविजगतात प्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्यालेखनाची सुरुवात ’न्य़ूयॉर्कर’ या वृत्तपत्रातून मुद्रितशोधक म्हणून केली होती. अमेरिकेतील ट्विन टॉवर्स पडल्यानंतर शेषाद्री यांच्या त्या विषयावर लिहिलेल्या ’डिस‍ॲपिरन्सेस’ या कवितेने त्यांचे नाव जगभरात गेले.

पुलित्झर पुरस्कार अन्य विजेते

कोल्सन व्हाइटहेड यांच्या "अंडरग्राऊंड रेलरोड" पुस्तकाला पुलित्झर पुरस्कार दिला गेला.

  • "अंडरग्राऊंड रेलरोड" या पुस्तकाला ‘कल्पनारम्य (फिक्शन)’ श्रेणीसाठी पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. या पुस्तकाचे लेखक कोल्सन व्हाइटहेड हे आहेत. हे पुस्तक डबलडेचे प्रकाशन आहे. पुलित्झर पुरस्काराचे हे १०१ वे वर्ष आहे.
  • ️"अक्षरे आणि नाटक" श्रेणीतील विजेते -हीशाम मातर (आत्मचरित्र); हेदर ॲन थॉम्पसन (इतिहास); मॅथ्यू डेस्मंड (सर्वसाधारण), त्येहिम्बा जेस (कविता), लिन नोटेज (नाट्य).

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महारढेमसेमराठी लिपीतील वर्णमालामांगगजानन महाराजअस्वलअकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघभीमा नदीभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यातानाजी मालुसरेइंडियन प्रीमियर लीगनामउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघनागपूर लोकसभा मतदारसंघकेशव महाराजरिसोड विधानसभा मतदारसंघहवामानमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीओमराजे निंबाळकरगूगलपरभणी जिल्हानाशिक लोकसभा मतदारसंघहिंदू धर्मातील अंतिम विधीग्रंथालयभारतीय संसदज्ञानेश्वरनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेलोकसभामेष राससतरावी लोकसभाआनंदराज आंबेडकरमूलद्रव्यजालना जिल्हाबिबट्याॐ नमः शिवायपुणे लोकसभा मतदारसंघकुलदैवतमराठी भाषा गौरव दिनब्राझीलअण्णा भाऊ साठेकरमुखपृष्ठघनसावंगी विधानसभा मतदारसंघवाळाराजाराम भोसलेकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघसाईबाबाभारताची संविधान सभाद्रौपदीचिन्मयी सुमीतहापूस आंबादिव्या भारतीबिरजू महाराजमराठी साहित्यश्यामची आईगृह विभाग (महाराष्ट्र शासन)जन गण मनअहिल्याबाई होळकरजागतिक व्यापार संघटनामहाराष्ट्राचा इतिहासपन्हाळामहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीसोनेअफूनियतकालिकभिवंडी लोकसभा मतदारसंघअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)चैत्रगौरीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमराठवाडापौगंडावस्थायशवंत आंबेडकरधुळे लोकसभा मतदारसंघऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघज्योतिर्लिंगसूत्रसंचालनऋतुराज गायकवाडनक्षत्र🡆 More