टोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादी

साहित्य निर्माण करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे मूळ संपूर्ण नाव न वापरता वेगळ्याच नावाने साहित्य निर्मितीत वापरलेल्या नावाला टोपण नाव म्हणतात.

मराठीले अनेक लेखक टोपणनावाने लेखन करीत आलेले आहेत, काहीजण अजूनही करतात. अशा टोपणनावाने लिखाण करणाऱ्या लेखकांची ही अपूर्ण यादी :-

  • अरुण टिकेकर : (टिचकीबहाद्दर); (दस्तुरखुद्द)
  • अनिल बाबुराव गव्हाणे : (बापू)
  • अशोक जैन : (कलंदर)
  • अशोक रानडे (दक्षकर्ण)
  • आत्माराम नीलकंठ साधले : आनंद साधले, दमयंती सरपटवार
  • आत्माराम शेट्ये : (शेषन कार्तिक)
  • आनंद बालाजी देशपांडे (आकाशानंद)
  • आनंद साधले : (दमयंती सरपटवार)
  • आनंदीबाई कर्वे : (बाया कर्वे)
  • कृष्ण गंगाधर दीक्षित : (संजीव)
  • कृष्णाजी अनंत एकबोटे (सहकरी कृष्ण)
  • कृष्णाजी लक्ष्मण सोमण : (किरात; काळदंड; सारथी) (काव्यलेखनासाठी किरात आणि भ्रमर)
  • कृ.श्री. अर्जुनवाडकर (पंतोजी)
  • केशव नारायण देव : (पतितपावनदास)
  • डॉ.कैलास रायभान दौंड (कैलास दौंड)
  • गंगाधर कुलकर्णी (रसगंगाधर)
  • गंगाधर बाळकृष्ण देशपांडे : (गंगाधरराव देशपांडे)
  • गणेश दामोदर सावरकर : (बाबाराव सावरकर) (दुर्गातनय)
  • गणेश वामन गोगटे : (लीला)
  • गणेश विठ्ठल कुलकर्णी (कुंभोजकर) : (व्यतिपात)
  • ग.दि. माडगुळकर (गदिमा)
  • गोपाळ गोविंद मुजुमदार : (साधुदास)
  • गोपाळ नरहर नातू : लोककवी (मनमोहन); मीनाक्षी दादरकर
  • गोपाळ हरी देशमुख : (लोकहितवादी; एक ब्राह्मण)
  • चंद्रकांत सखाराम चव्हाण : (बाबूराव अर्नाळकर)
  • चं.वि.बावडेकर : (आलमगीर)
  • चिंतामण रामचंद्र टिकेकर - अरुण टिकेकर यांचे वडील : (दूत)
  • चिं.त्र्य.खानोलकर - आरती प्रभु या नावाने काव्यलेखन व चिं.त्र्य.खानोलकर या नावाने गद्यलेखन
  • जयवंत दळवी : (ठणठणपाळ)
  • तुकारामतात्या पडवळ : (एक हिंदू)
  • तुळसी परब : ओज पर्व
  • दगडू मारुती पवार : कथालेखक (जागल्या)
  • दत्ता टोळ : (अमरेंद्र दत्त)
  • दत्तात्रेय रामचंद्र कुलकर्णी : (श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर)
  • दामोदर माधव कुळकर्णी : (माधवसुत)
  • डॉ. दामोदर विष्णू नेने : (दादूमिया)
  • दासोपंत दिगंबर देशपांडे : (दासोपंत)
  • दिनकर शंकरराव जवळकर : (आग्यावेताळ)
  • देवदत्त टिळक : (लक्ष्मीनंदन)
  • द्वारकानाथ माधव पितळे : (नाथमाधव)
  • द्वारकाबाई हिवरगांवकर/मनोरमा श्रीधर रानडे : (गोपिकातनया)
  • धनंजय चिंचोलीकर : (बब्रूवान रुद्रकंठावार)
  • न.र. फाटक : (अंतर्भेदी), (करिष्मा), (फरिश्ता) आणि (सत्यान्वेषी)
  • नरसिंह चिंतामण केळकर : (अनामिक; आत्‍मानंद)
  • नागावकर : (गंधर्व)
  • नागेश गणेश नवरे : (नागेश)
  • नारायण गजानन आठवले : (राजा ठकार)
  • नागोराव गोविंद साठे : (ब्रह्मानंदाश्रम स्वामी)
  • नारायण जोशी : (साखरेबुवा; नानामहाराज साखरे)
  • नारायण दामोदर सावरकर : (जातिहृदय)
  • नारायण विनायक कुलकर्णी : गोविंदसुत (की विनायकसुत?)
  • परशराम गोविंद चिंचाळकर : गोविंदसुत
  • प.स. देसाई (सौ.जानकीबाई देसाई) : (सदाराम)
  • पांडुरंग सदाशिव साने : (साने गुरुजी)
  • पांडुरंग ज्ञानेश्वर कुळकर्णी : (पांडुरंग शर्मा)
  • पुरुषोत्तम धाक्रस (फडकरी)
  • पृथ्वीगीर हरिगीर गोस्वामी : पृथ्वीगीर हरिगीर
  • प्रल्हाद केशव अत्रे (केशवकुमार)
  • प्र.न. जोशी : (पुष्पदंत)
  • प्रभाकर जनार्दन दातार : शाहीर प्रभाकर
  • प्रभाकर नारायण पाध्ये : (भाऊ पाध्ये)
  • प्रवीण टोकेकर : (ब्रिटिश नंदी)
  • फोंडूशास्त्री करंडे : द्विरेफ
  • बशीर मोमीन (कवठेकर): (मोमीन कवठेकर)
  • बळवंत जनार्दन करंदीकर : (रमाकांत)
  • बा.सी. मर्ढेकर : (मकरंद)
  • बाळकृष्ण अनंत भिडे : (बी)
  • बाळूताई खरे/मालती बेडेकर : (विभावरी शिरूरकर)
  • ब्रह्माजीपंत ब्रह्मानंद नाझरीकर : (श्रीधर)
  • भागवत वना नेमाडे : (भालचंद्र नेमाडे)
  • भा.रा. भागवत : (संप्रस्त)
  • मनोरमा श्रीधर रानडे/द्वारकाबाई हिवरगांवकर : (गोपिकातनया)
  • महादेव नारायण जोशी : (माधवराव जोशी)
  • महादेव मल्हार जोशी : (स्वामी सच्चिदानंद)
  • मा.गो. वैद्य : (नीरद)
  • महादेव आसाराम घाटेवाळ : (माधव परदेशी)
  • माधव दादाजी मोडक : (बंधु माधव)
  • मालतीबाई बेडेकर/बाळूताई खरे : (विभावरी शिरूरकर)
  • मीनप्पा व्यंकटेश केलवाड : गोविंदशर्मा
  • मुक्ताबाई दीक्षित : (कृष्णाबाई)
  • मुक्ता विठ्ठल कुलकर्णी : (मुक्ताबाई)
  • मृत्युंजय श्रीकृष्ण रिसबूड : (सुमेध वडावाला)
  • मृदुला तांबे : (सृष्टिलावण्या)
  • मेहबूब पठाण : (अमर शेख)
  • मो.ग. रांगणेकर : (धुंडिराज)
  • र.गो. सरदेसाई : (र.गो.स., हरिविवेक)
  • रघुनाथ चंदावरकर : (रघुनाथ पंडित)
  • रघुवीर जगन्नाथ सामंत (कुमार रघुवीर)
  • रविन थत्ते : (रविन मायदेव थत्ते)
  • रामकृष्ण माधव चोणकर : (हरी माधव समर्थ)
  • राम गणेश गडकरी : (बाळकराम)
  • रामचंद्र चितळकर : (सी रामचंद्र)
  • रामचंद्र जोशी : (साखरेबाबा)
  • रामचंद्र विनायक कुलकर्णी : (आनंदघनराम)
  • रामचंद्र विनायक टिकेकर - अरुण टिकेकर यांचे आजोबा : (धनुर्धारी)
  • रामजी गणोजी चौगुले : (रामजी गणोजी)
  • रा.श्री. जोग : (निशिगंध)
  • लक्ष्मीकांत तांबोळी : (लता जिंतूरकर)
  • लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर (लक्ष्मीकांत-प्यारेलालमधील पहिला) : (के.लक्ष्मीकांत, लक्ष्मीकांत)
  • लीला भागवत : (भानुदास रोहेकर)
  • वा.रा.कांत : (कांत)
  • विठ्ठल वामन हडप : (केयूरक)
  • विनायक गजानन कानिटकर : (रा. म. शास्त्री, ग्यानबा)
  • विनायक नरहरी भावे : (विनोबा)
  • वि.ल. बर्वे : (आनंद)
  • वि.शा. काळे  : (बाबुलनाथ)
  • विश्वनाथ वामन बापट : (वसंत बापट
  • विष्णू भिकाजी गोखले : (विष्णूबाबा ब्रह्मचारी)
  • विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज )
  • विष्णूशास्त्री चिपळूणकर : (गोल्या घुबड)
  • वि.ह. कुलकर्णी (चंद्रहास, रत्नपारखी, शरदचंद्र, सुहास)
  • वीरसेन आनंद कदम : (बाबा कदम)
  • शंकर दाजीशास्त्री पदे : पिनाकी, भ्रमर, शंकर
  • शिवराम महादेव गोऱ्हे : (चंद्रशेखर; चंद्रिका)
  • श्रीधर व्यंकटेश केतकर : गोविंदपौत्र
  • श्रीपाद रामचंद्र टिकेकर - अरुण टिकेकर यांचे काका : मुसाफिर
  • स.अ. शुक्ल : (कुमुद)
  • संजीवनी मराठे (जीवन)
  • सतीश जकातदार : (अमोघ श्रीवास्तव; सलील आदर्श)
  • संतोष दौंडे (संतोष मधुकर दौंडे)
  • सुनंदा बलराम कुलकर्णी : (सानिया)
  • सुलोचना देशमुख : (एस्; एन्)
  • सेतुमाधव पगडी : (कृष्णकुमार)
  • पी. विठ्ठल
  • ज्ञानेश्वर नाडकर्णी : (तुकाराम शेंदाणे)
  • (?) अप्पा बळवंत
  • (?) (वामनसुता)
  • (?) (देशभगिनी)
  • (?) (लक्ष्मीतनया)

कवी

मराठी भाषेत जेव्हा काव्यरचनेला सुरुवात झाली तेव्हापासून कवी बहुधा आपले पहिले नाव कविनाम म्हणून वापरत असत. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, मोरोपंत, सगनभाऊ ही या कवींची प्रथम नावे होती. प्रथम नाव, मधले नाव आणि नंतर आडनाव लिहायची पद्धत नंतरच्या काळात सुरू झाली. आधुनिक काळातदेखील इंदिरा, कवी गोविंद, दत्त, नीरजा, पद्मा, मनमोहन, माधव, मीरा, यशोधरा, विनायक, संजीवनी या कवी-कवयित्रींनी स्वतःच्याच पहिल्या नावाने काव्यलेखन केले. अनेक कवींनी आपल्या सग्यासंबंधींच्या नावाला अग्रज, अनुज, कुमार, जूलियन, तनय, सुत, इत्यादी प्रत्यय लावून आपापली टोपणनावे सिद्ध केली. इतरांनी या पद्धतींशी फारकत घेऊन अत्यंत स्वतंत्र टोपणनावे घेतली आणि आपले काव्यलेखन केले.

इ.स. १९६०पासून टोपणनावाखाली कविता करण्याची पद्धत मराठीतून बहुधा हद्दपार झाली आहे. (अपवाद - सौमित्र)

काही मराठी आणि अन्य कवी/लेखकांच्या टोपणनावांची ही यादी :

टोपण नाव खरे नाव
अकिंचन वासू. ग. मेहेंदळे
अनंततनय दत्तात्रेय अनंत आपटे
अनंतफंदी अनंत भवानीबावा घोलप
अनंतसुत विठ्ठल, कावडीबाबा विठ्ठल अनंत पिंपळगावकर
आनंद साधले आत्माराम नीलकंठ साधले; दमयंती सरपटवार
अनिल आत्माराम रावजी देशपांडे
अनिल भारती शान्ताराम पाटील (या कातरवेळी, तो सलीम राजपुत्र)
अशोक (कवी) नारायण रामचंद्र मोरे
अज्ञातवासी दिनकर गंगाधर केळकर
आधुनिक नीळकंठ बळवंत ऊर्फ बापूसाहेब भवाळकर
आनंद विनायक लक्ष्मण बरवे
आनंदतनय गोपाळ आनंदराव देशपांडे
आरती प्रभू चिंतामण त्र्यंबक खानोलकर
इंदिरा इंदिरा संत
इंदुकांत दिनकर नानाजी शिंदे
उदासी/हरिहरमहाराज नीलकंठ रामकृष्ण पाळंदे
उद्धवचिद्धन/उद्धवचैतन्य/उधोबाबा/ उद्धव xxxx कोकिळ
एकनाथ, एकाजनार्दन एकनाथ सूर्यनारायण पैठणकर
एक मित्र, विनायक विनायक जनार्दन करंदीकर
कलापी, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे
कबीर [[]]
कवीश्वरबास भानूभट/भास्करभट्ट xxxx बोरीकर
कावडीबाबा/अनंतसुत विठ्ठल विठ्ठल अनंत पिंपळगावकर
कांत वा.रा. कांत
काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे
काव्यशेखर भास्कर काशीनाथ चांदूरकर
किरात/भ्रमर कृष्णाजी लक्ष्मण सोमण
कवी कुंजविहारी हरिहर गुरुनाथ सलगरकर
कुमुदबांधव स.अ. शुक्ल
कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर
कृष्णकेशव अनुपलब्ध
कृष्णाग्रज अनुपलब्ध
केशवकुमार प्रल्हाद केशव अत्रे
केशवसुत कृष्णाजी केशव दामले
केशवसुत नारायण केशव बेहेरे
के.स.रि. केशव सदाशिव रिसबूड
कोणीतरी नरहर शंकर रहाळकर
गिरीश शंकर केशव कानेटकर
गोपिकातनया कु.द्वारका हिवरगावकर(सौ.मनोरमा श्रीधर रानडे)
गोपीनाथ गोपीनाथ तळवलकर
गोमा गणेश गणेश कृष्ण फाटक
गोविंद गोविंद दत्तात्रय दरेकर
गोविंदपौत्र श्रीधर व्यंकटेश केतकर
गोविंदप्रभु गुंडम अनंतनायक राऊळ
गोविंदाग्रज राम गणेश गडकरी
ग्यानबा, रा. म.शास्त्री वि.ग. कानिटकर
ग्रेस माणिक गोडघाटे
चक्रधर श्रीचांगदेव राऊळ
चंद्रशेखर चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे
चेतोहर परशुराम नारायण पाटणकर
जगन्नाथ जगन्नाथ धोंडू भांगले
जगन्मित्र रेव्हरंड नारायण वामन टिळक
जननीजनकज पु.पां गोखले
टेंबे स्वामी/वासुदेवानंद सरस्वती वासुदेव गणेश टेंबे
ढोलीबुवा/महीपतिनाथ सखाराम केरसुणे
तुकाराम/तुका तुकाराम बोल्होबा/बाळकोबा मोरे/अंबिले/आंबले
तुलसीदास [[]]
दत्त दत्तात्रय कोंडो घाटे
दमयंती सरपटवार आनंद साधले, [[आत्माराम नीलकंठ साधले]
दया पवार दगडू पवार
दामोदर वीरेश्वर सदाशिव ऊर्फ तात्या छत्रे
दा.ग.पा. दामोदर गणेश पाध्ये
दासोपंत/ दिगंबरानुचर दासो दिगंबर देशपांडे
दित्जू/माधव जूलियन माधव त्र्यंबक पटवर्धन
नामदेव नामदेव दामाशेटी शिंपी
नारायणसुत श्रीपाद नारायण मुजुमदार
निरंजन वसंत सदाशिव बल्लाळ
निशिगंध रा.श्री. जोग
निळोबा निळा मुकुंद पिंपळनेरकर
नीरजा नीरजा साठे
नृसिंहसरस्वती नरहरी माधव काळे
पठ्ठे बापूराव श्रीधर कृष्ण कुलकर्णी(रेठरेकर)
पद्मविहारी रघुनाथ गणेश जोशी
पद्मा पद्मा गोळे
पी.सावळाराम निवृत्तिनाथ रावजी पाटील
पुरु.शिव. रेगे पु.शि. रेगे
पूर्णदास बाबा उपसकर-राजाध्यक्ष
प्रभाकर शाहीर प्रभाकर जनार्दम दातार
फुलारी/बी रघुनाथ भगवान रघुनाथ कुळकर्णी
बहिणाबाई बहिणाबाई नथूजी चौधरी
(संत) बहिणाबाई कु.बहिणा आऊदेव कुळकर्णी (सौ.बहिणा रत्नाकर पाठक)
बापरखुमादेवीवर/बापविठ्ठलसुत ज्ञानदेव विठ्ठलपंत कुळकर्णी
बाबा आमटे मुरलीधर देवीदास आमटे
बाबुलनाथ विनायक श्यामराव काळे
बालकवी/कलापि त्र्यंबक बापूजी ठोंबरे
बाळा बाळा कारंजकर
बी ; B बाळकृष्ण अनंत भिडे
बी; BEE नारायण मुरलीधर गुप्ते
बी रघुनाथ/फुलारी भगवान रघुनाथ कुळकर्णी
बोधलेबुवा माणकोजी भानजी जगताप
भगवानकवि भवान रत्नाकर कऱ्हाडकर
भानजी भास्कर त्रिंबक देशपांडे
भानुदास/मामळूभट भानुदास पैठणकर(एकनाथांचे पणजोबा)
भावगुप्तपद्म पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी
भावशर्मा के.(केशव) नारायण काळे
भालेंदु भालचंद्र/गुलाबराव सीताराम सुकथनकर
भ्रमर/किरात कृष्णाजी लक्ष्मण सोमण
मंदार एकनाथ पांडुरंग रेंदाळकर
मध्वमुनीश्वर त्रिंबक नारायणाचार्य ( आडनाव अनुपलब्ध)
मनमोहन गोपाळ नरहर ऊर्फ मनमोहन नातू
मनोहरबंधू भास्कर कृष्ण उजगरे
महिपती महिपती दादोपंत कांबळे-ताहराबादकर
महीपतिनाथ/ढोलीबुवा सखाराम केरसुणे
माणिक/माणिकप्रभू/माणिकबाबा माणिक मनोहर नाईक, हरकुडे
माधव माधव केशव काटदरे
माधव जूलियन, दित्जू/मा.जू./एम्.जूलियन माधव त्र्यंबक पटवर्धन
माधव मिलिंद कॅ. मा.कृ. शिंदे
माधवसुत दामोदर माधव कुळकर्णी
माधवानुज काशीनाथ हरी मोडक
मार्क ट्वेन सॅम्युएल लॅंगहाॅर्न क्लेमन्स
मीरा मीरा तारळेकर
मीराबाई [[]]
मुकुंदराज ?
मुकुंदराय मुकुंद गणेश मिरजकर
मुक्ताबाई/मुक्ताई मुक्ता विठ्ठलपंत कुळकर्णी
मुक्तिबोध शरच्चंद्र माधब मुक्तिबोध
मुक्तेश्वर मुक्तेश्वर चिंतामणी मुद्गल
मोरोपंत मोरेश्वर रामचंद्र पराडकर
यशवंत यशवंत दिनकर पेंढरकर
यशोधरा यशोधरा साठे
योगेश भालजी पेंढारकर
रंगनाथस्वामी(निगडीकर) रंगनाथ बोपाजी घोडके
रघुनाथ पंडित रघुनाथपंडित चंदावरकर/तंजावरकर; रघुनाथ गणेश नवहस्त/नवाथे
रमेशबाळ बाळ सीताराम मर्ढेकर
राजहंस यादव शंकर वावीकर
रा. देव [[]]
राधारमण कृष्णाजी पांडुरंग लिमये
रामजोशी/कविराय राम जनार्दन जोशी
रामदास नारायण सूर्याजी ठोसर
रा. म. शास्त्री, ग्यानबा वि.ग. कानिटकर
वसंत वासुदेव बळवंत पटवर्धन
डॉ. वसंत अवसरे शांता शेळके (श्री अवसरे मुळात शान्ताबाईंचे स्नेही होते.)
वसंतविहार शंकर दत्तात्रय जोशी
वा.दा.ओ. वामन दाजी ओक
वामन पंडित वामन तानाजी शेषे / वा शेष
विठाबाई विठा रामप्पा नायक
विठा रेणुकानंदन विठ्ठल मनोहर बडवे-कुलकर्णी
विठ्ठल केरीकर विठ्ठल नरसिंह साखळकर
विठ्ठलदास विठ्ठल अनंत क्षीरसागर्/बीडकर
विंदा करंदीकर गोविंद विनायक करंदीकर
विनायक/एक मित्र विनायक जनार्दन करंदीकर
विष्णूदास कृष्णराव रावजी धांदरफळे
विसोबा खेचर विसोबा चाटे
विहंगम बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर
वैशाख त्र्यं.वि. देशमुख
शारदाश्रमवासी पुरुषोत्तम गोपाळ काणेकर
शुभानंत [[]]
श्रीकांत [[]]
श्रीकृष्ण श्रीकृष्ण नीळकंठ चापेकर
श्रीधर श्रीधर ब्रह्मानंद नाझरेकर/खडके/देशपांडे
श्रीराम श्रीनिवास रामचंद्र बोबडे
संजीव कृष्ण गंगाधर दीक्षित
संजीवनी संजीवनी मराठे
सदानंदस्वामी सदानंद चिंतामणी उपासनी
सरस्वतीकंठाभरण दिनकर नानाजी शिंदे
साधुदास गोपाळ गोविंद मुजुमदार/पाटणकर
सानिया सुनंदा बलराम कुलकर्णी
साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने
सामराज शामभट लक्ष्मण आर्वीकर(राजोपध्ये)
सांवतामाळी सांवता परसूबा माळी
सुधांशु हणमंत नरहर जोशी
सुमंत अप्पाराव धुंडिराज मुरतुले
सुहृद्चंपा पुरुषोत्तम शिवराम रेगे
सौमित्र किशोर कदम
स्वरूपानंद रामचंद्र विष्णू गोडबोले
हरिबुवा हरिबुवा शिंपी(हरीबोवा केरेश्वर भोंडवे)
हरिहरमहाराज/उदासी नीलकंठ रामकृष्ण पाळंदे
प्रीत स्वप्नील चाफेकर
मानसी सरोज नम्रता माळी पाटील
होनाजी होनाजी सयाजी शेलारखाने
ज्ञानेश्वर/ज्ञानदेव/बापरखमादेवीवर/बापविठ्ठलसुत [[ज्ञानदेव विठ्ठलपंत कुळकर्णी]

हे देखील पहा

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ब्रिक्सव्याघ्रप्रकल्पजहाल मतवादी चळवळरक्तगटनारायण मुरलीधर गुप्तेगौतम बुद्धअजिंक्य रहाणेराष्ट्रकूट राजघराणेदशावतारपंचायत समितीभरती व ओहोटीरेखावृत्तशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीए.पी.जे. अब्दुल कलामसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठलोकसंख्या घनताशरद पवारवस्तू व सेवा कर (भारत)स्वादुपिंडभारतरत्‍नकाळाराम मंदिर सत्याग्रहभारताचे संविधानविल्यम शेक्सपिअरपंजाबराव देशमुखगोपाळ गणेश आगरकरचीनव्हॉलीबॉलअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गकाळूबाईकर्ण (महाभारत)ॐ नमः शिवायसचिन तेंडुलकरघारापुरी लेणीआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकदर्पण (वृत्तपत्र)महाराष्ट्रातील वनेमायकेल जॅक्सनबहावाभारतातील महानगरपालिकामानवी हक्कमहाराष्ट्राचा भूगोलजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पव्यवस्थापनधुंडिराज गोविंद फाळकेपहिले महायुद्धसईबाई भोसलेजायकवाडी धरणमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)तलाठी कोतवालभारताच्या पंतप्रधानांची यादीराशीकेदारनाथमनुस्मृतीस्वामी विवेकानंदक्षय रोगभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळबाळ ठाकरेदौलताबादपरमहंस सभाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकसोलापूर जिल्हासंयुक्त महाराष्ट्र चळवळहवामान बदलभारतीय संविधानाची उद्देशिकासत्यशोधक समाजसम्राट हर्षवर्धनहिंदू धर्मलिंगभावविष्णुसहस्रनामदूधरत्‍नागिरीनक्षत्रचाफास्टॅचू ऑफ युनिटीगोपाळ कृष्ण गोखलेसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेप्रेरणा🡆 More