अशोक जैन

अशोक चंदनमल जैन (जन्म : घोडेगाव, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत, ११ एप्रिल १९४४; - मुंबई, १८ फेब्रुवारी २०१४) हे एक मराठी पत्रकार व लेखक होते.

ते काही काळ महाराष्ट्र टाइम्स या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक होते.[ संदर्भ हवा ]

अशोक जैन
जन्म नाव अशोक चंदनमल जैन
जन्म ११ एप्रिल, इ.स. १९४४
घोडेगाव, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत
मृत्यू १८ फेब्रुवारी, इ.स. २०१४
मुंबई, महाराष्ट्र
कार्यक्षेत्र पत्रकारिता, साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार अनुवाद
प्रसिद्ध साहित्यकृती राजधानीतून, कानोकानी
पत्नी सुनीति अशोक जैन

आरंभिक जीवन

अशोक जैन यांचा जन्म ११ एप्रिल, इ.स. १९४४ रोजी पुण्याजवळील घोडेगाव येथे झाला .

पत्रकारिता आणि साहित्यिक कारकीर्द

इ.स. १९६४ साली जैन यांनी बी.ए.ची पदवी मिळवली . महाविद्यलयात असतानाच त्यांनी पुण्यातील दैनिक सकाळमधून पत्रकारितेचे धडे गिरवायला सुरुवात केली. पुढे पुण्यातील दैनिक तरुण भारतमध्ये काम केल्यानंतर ते केसरीमध्ये रुजू झाले . इ.स. १९६६ साली अशोक जैन यांनी मुंबईला स्थलांतर करून महाराष्ट्र टाइम्समध्ये काम मिळविले.

मुंबईत १२ वर्षे काम केल्यावर अशोक जैन हे महाराष्ट्र टाइम्सचे विशेष प्रतिनिधी म्हणून दिल्लीला गेले. इ.स. १९७८ ते इ.स. १९८९ या काळात त्यांनी दिल्लीहून 'राजधानीतून' या नावाने साप्ताहिक वार्तापत्रे लिहिली. जैन यांची चौफेर दृष्टी, विचक्षणपणा, आणि त्यांच्या खेळकर शैलीने ही वार्तापत्रे चांगलीच गाजली. इ.स. १९८९ साली महाराष्ट्र टाइम्सचे सहसंपादक झाल्यावर मटाच्या 'मैफल' या साप्ताहिक पुरवणीची जबाबदारी अशोक जैन यांना देण्यात आली. विषयवैविध्य आणि नावीन्य यांमुळे या पुरवणीला त्यांच्या काळात प्रतिष्ठा मिळाली. अशोक जैन पुढे महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहसंपादक आणि कार्यकारी संपादकही झाले.

अशोक जैन यांनी कलंदर या टोपणनावाने 'कानोकानी' हे राजकीय-सामाजिक-साहित्यिक-सांस्कृतिक घटना-घडामोडींवर मिश्कील टिप्पणी करणारे सदर लिहायला सुरुवात केली. पुढे 'कानोकानी' या त्यांच्या सदरातील लेखांचे त्याच नावाचे पुस्तक झाले. पुस्तकाचा पुढचा भागही 'आणखी कानोकानी' या नावाने प्रकाशित झाला.

इंग्रजीतील अनेक चांगल्या चांगल्या पुस्तकांचे त्यांनी सुबोध मराठीत अनुवाद केले आहेत. 'इंडिया टुडे'च्या दोन अंकांत पुपुल जयकर लिहीत असलेल्या इंदिरा गांधींच्या आगामी चरित्राचे भाग आले होते. ते वाचल्यावर राजहंस प्रकाशनच्या दिलीप माजगावकर हे त्या पुस्तकाच्या अनुवादाचे हक्क घेण्यासाठी प्रयत्‍न करू लागले. तेव्हा त्याच्या अनुवादासाठी श्रीकांत लागू यांचे नाव आले. माजगावकर त्यांच्याकडे गेले. पण लागूंनी 'याचा माझ्यापेक्षा अशोक जैन चांगला अनुवाद करतील' असे सुचविले . तेव्हा जैन दिल्लीत होते. त्यामुळे त्यांनी लेखकाने अनुभवलेला सगळा काळ, माहोल अनुवादात उतरवण्याचा प्रयत्‍न केला आणि तो अनुवाद चांगलाच यशस्वी ठरला.

अशोक जैन यांच्या पत्‍नीचे नाव सुनीती जैन. शेवटची दहा वर्षे अर्धांगवायूने आजारी असणाऱ्या अशोक जैन यांच्याकडून अपुरे राहिलेले अनुवाद पूर्ण करवून घेण्यात त्यांची मोठीच मदत झाली.

अशोक जैन यांचे गाजलेले लेख

  • नाट्य-चित्रअभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या 'परमेश्वराला रिटायर करा' हा लेख.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशक / प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.) भाषा टिप्पणी
अंतस्थ अनुवादित मराठी मूळ लेखक : पी.व्ही. नरसिंह राव
अत्तराचे थेंब लेखसंग्रह २००९ मराठी
आणखी कानोकानी लेखसंग्रह २००३ मराठी
इंदिरा- अंतिम पर्व अनुवादित मराठी मूळ लेखक : पी.सी. अलेक्झांडर
इंदिरा गांधी अनुवादित मराठी मूळ लेखिका : पुपुल जयकर
इंदिरा गांधी, आणीबाणी आणि भारतीय लोकशाही अनुवादित मराठी मूळ लेखक : पी.एन. धर
कस्तुरबा - शलाका तेजाची अनुवादित मराठी मूळ लेखक : अरुण गांधी
कानोकानी लेखसंग्रह १९९६ मराठी
डॉक्युमेन्ट कादंबरी अनुवादित मराठी मूळ लेखक : आयर्विंग वॉलेस
फॅन्टॅस्टिक फेलुदा अनुवादित पुस्तक मालिका मराठी मूळ लेखक : सत्यजित राय
बॅचलर ऑफ आर्ट्‌स अनुवादित मराठी मूळ लेखक : आर.के. नारायण
राजधानीतून लेखसंग्रह २००३ मराठी
लतादीदी अनुवादित मराठी मूळ लेखक : हरीश भिमाणी
लक्ष्मणरेषा अनुवादित १९९८ मराठी आर.के. लक्ष्मण यांचे आत्मचरित्र
वॉकिंग विथ द लायन अनुवादित मराठी मूळ लेखक : नटवरसिंग
व्योमकेश बक्षी - रहस्यकथा अनुवादित मराठी मूळ लेखक : शरदिंदू बंडोपाध्याय
लालबहादूर शास्त्री-राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम अनुवादित मराठी मूळ लेखक : सी.पी. श्रीवास्तव
शेषन चरित्र अनुवादित मराठी मूळ लेखक : के.गोविंदन कुट्टी
सोंग आणि ढोंग मराठी
स्वामी व त्याचे दोस्त अनुवादित मराठी मूळ लेखक : आर.के. नारायण

पुरस्कार

संदर्भ व नोंदी

Tags:

अशोक जैन आरंभिक जीवनअशोक जैन पत्रकारिता आणि साहित्यिक कारकीर्दअशोक जैन यांचे गाजलेले लेखअशोक जैन प्रकाशित साहित्यअशोक जैन पुरस्कारअशोक जैन संदर्भ व नोंदीअशोक जैनब्रिटिश भारतमराठी भाषामहाराष्ट्र टाइम्समुंबई प्रांतविकिपीडिया:संदर्भ द्या

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लिंग गुणोत्तरभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशदेवेंद्र फडणवीसजयगडसर्वनामकुटुंबठाणे लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीभारतीय रिझर्व बँकभारताचा इतिहासपारू (मालिका)लोणार सरोवरहिरडादादाभाई नौरोजीबुलढाणा जिल्हापंचांगनदीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघगुरू ग्रहआयझॅक न्यूटनआकाशवाणीपानिपतची तिसरी लढाईअजिंठा-वेरुळची लेणीताज महालआळंदीअण्वस्त्रभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीमुंबई उच्च न्यायालयशमीसाडेतीन शुभ मुहूर्तमहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीनागपूर लोकसभा मतदारसंघवाघवर्धा लोकसभा मतदारसंघअण्णा भाऊ साठेहस्तमैथुनमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्राचा इतिहासनिर्मला सीतारामनउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघजळगावशांताराम द्वारकानाथ देशमुखगोपाळ कृष्ण गोखलेमांजरहवामान बदलआंबेडकर जयंतीभुजंगप्रयात (वृत्त)ग्रामपंचायतप्रणिती शिंदेजांभूळस्त्री सक्षमीकरणऔंढा नागनाथ मंदिरभारतातील जातिव्यवस्थासूर्यनमस्कारसुप्रिया सुळेराजाराम भोसलेअजित पवारस्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट)भारतीय लष्करनाशिक लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)अर्जुन पुरस्कारपाणीनरसोबाची वाडीस्मृती मंधानानांदेड लोकसभा मतदारसंघहिंदू धर्मसदा सर्वदा योग तुझा घडावाबावीस प्रतिज्ञाखाशाबा जाधवमानवी शरीरज्ञानेश्वरतेजश्री प्रधान🡆 More