जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात माडबन-जैतापूर येथे होऊ घातलेला प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प आहे.

तब्बल ९,९०० मेगावॉट क्षमतेचा हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असून, विदेशी सहकार्यातून साकारला जात असलेला भारतातील पहिला प्रकल्प आहे . एकूण एक लाख कोटी रुपयांची प्रचंड गुंतवणूक या प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे.

६ डिसेंबर २०१०ला या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील २ युरोपियन प्रेशराइज्ड अणुभट्यांची बांधणी व २५ वर्षापर्यंत अणूइंधन पुरवण्यासाठी करार करण्यात आला. फ्रान्सचे अध्यक्ष निकोलस सार्कोझी व भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

फ्रान्सची अणुउर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी अरेवा व भारताची अणुउर्जा कंपनी न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या मध्ये हा ९३० कोटी डॉलरचा करार करण्यात आला.

या प्रकल्पामध्ये ६ युरोपियन प्रेशराइज्ड अणुभट्या प्रस्तावित आहेत. या अणुभट्ट्यांची संकल्पना व विकास फ्रान्सच्या अरेवा कंपनीने केला आहे. प्रत्येक अणुभट्टी १६५० मेगावॉट वीज उत्पादन करणार आहे. म्हणजे एकूण ९९०० मेगावॉट वीज या प्रकाल्पातून निर्माण होणार आहे.

या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च अंदाजे १,००,००० कोटी रुपये(?) आहे. या प्रकारच्या अणुभट्ट्या जगात अजून कुठेही कार्यान्वित नाहीत पण फिनलंडमध्ये १, फ्रान्समध्ये १ व चीनमध्ये २ अणुभट्ट्याची बांधणी चालू आहे. चीनने अरेवा बरोबर ३ अनुभट्ट्यांसाठी करार केला आहे. त्यातील ताईशान १ ही अणुभट्टी २०१३त, व ताईशान २ ही अणुभट्टी २०१४मध्ये कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

भौगोलिक माहिती

हा प्रकल्प कोकणात आहे. पश्चिमेस अरबी समुद्र व पूर्वेस सह्याद्री डोंगर आहे. प्रकल्पापासून १० किलोमीटरच्या परीघात ४०७ हेक्टर इतके प्रचंड उत्तम प्रकारच्या खारफुटीचे वनक्षेत्र आहे

अणुभट्ट्या

फ्रान्स देशाच्या अरेवा कंपनीकडून अणुभट्ट्यांचा पुरवठा होणार आहे.

घटनाक्रम

  1. जनहित सेवा समिती, माडबनकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल.
  2. न्यायालयाने प्रकल्पाला स्थगिती दिली.
  3. ही स्थगिती नंतर न्यायालयाने उठविली.
  4. २३ नोव्हेंबर २००९ रोजी मोठ्या संख्येने लोक गोळा झाले. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी देशभरातून अणुऊर्जा प्रकल्प विरोध समितीचे कार्यकर्ते आले होते.
  5. २९ डिसेंबर २००९, १२ जानेवारी २०१० आणि २२ जानेवारी २०१० रोजी प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक नागरिकांची मोठी आंदोलने झाली.
  6. १६ एप्रिल २०१० रोजी प्रकल्पस्थळी जैतापूर प्रकल्पाच्या पर्यावरण अहवालावर केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयातर्फे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जनसुनावणी घेतली. जनसुनावणी. हा अहवाल चार ग्रामपंचायतींना दिलाच नाही. पर्यावरण अहवाल नागपूरच्या 'निरी' (नॅशनल एन्व्हॉयरन्मेन्ट इंजिनीअरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट) संस्थेने तयार केला होता.
  7. २८ नोव्हेंबर २०१०, केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयातर्फे प्रकल्पाला हिरवा कंदिल. वन व पर्यावरण मंत्रालयातर्फे मंजुरीबाबत ३५ शर्ती घालण्यात आल्या आहेत. यापैकी २३ शर्ती या थेट जैतापूर प्रकल्पाच्या उभारणीशी संबंधित.

संदर्भ

संदर्भ आणि नोंदी

बाह्यदुवे

Tags:

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प भौगोलिक माहितीजैतापूर अणुऊर्जा प्रकल्प अणुभट्ट्याजैतापूर अणुऊर्जा प्रकल्प घटनाक्रमजैतापूर अणुऊर्जा प्रकल्प संदर्भजैतापूर अणुऊर्जा प्रकल्प संदर्भ आणि नोंदीजैतापूर अणुऊर्जा प्रकल्प बाह्यदुवेजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पअणुऊर्जामहाराष्ट्रमाडबनरत्‍नागिरी जिल्हाराजापूर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)अश्वत्थामानगर परिषदबैलगाडा शर्यतकेदारनाथ मंदिरगुरू ग्रहबुलढाणा लोकसभा मतदारसंघकेळअमित शाहभारतातील समाजसुधारकयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघहिंदू कोड बिलवर्तुळनोटा (मतदान)मासिक पाळीकोकण रेल्वेभारत सरकार कायदा १९१९ज्यां-जाक रूसोरेणुकावर्णनात्मक भाषाशास्त्रमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीसोळा संस्कारगगनगिरी महाराजसुशीलकुमार शिंदेजगातील देशांची यादीमाढा लोकसभा मतदारसंघगांडूळ खतसोलापूर लोकसभा मतदारसंघबंगालची फाळणी (१९०५)ज्ञानेश्वरीनांदेडप्रेमानंद गज्वीव्यंजनबारामती लोकसभा मतदारसंघवर्षा गायकवाडखडकवासला विधानसभा मतदारसंघॐ नमः शिवायपरातबुलढाणा विधानसभा मतदारसंघगणपतीमहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथबीड जिल्हादहशतवादभारतातील शासकीय योजनांची यादीअर्थशास्त्रविठ्ठल रामजी शिंदेराज ठाकरेधर्मनिरपेक्षताभारताच्या सरन्यायाधीशांची यादीचातककल्याण लोकसभा मतदारसंघसोयाबीनअर्थ (भाषा)३३ कोटी देवअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)सतरावी लोकसभाअमर्त्य सेनपंढरपूरन्यूटनचे गतीचे नियमव्यापार चक्रगाडगे महाराजभारतातील जागतिक वारसा स्थानेभारतीय आडनावेमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीनरेंद्र मोदीनातीशहाजीराजे भोसलेबच्चू कडूसाहित्याचे प्रयोजनसम्राट हर्षवर्धनसंयुक्त महाराष्ट्र समितीशिवबावीस प्रतिज्ञामहिलांसाठीचे कायदेसंभोगवसंतराव नाईकवडग्रामपंचायत🡆 More