टांकसाळ

नाणी बनवणाऱ्या कारखान्याला टांकसाळ असे म्हणतात.

टांकसाळी सामान्यतः सरकारी मालकीच्या असतात. खाजगी टांकसाळींवर कडक सरकारी नियंत्रण असते. एखाद्या देशातील टांकसाळी इतर देशांसाठीही नाणी तयार करतात.

कामे

१) देशात रोज वापरली जाणारी नाणी बनवणे

२) अचूक मापाची वजने तथा मापे बनवणे

३) सरकारी सोने तथा चांदीच्या लगडी बनवणे

४) विविध सरकारी खाते तसेच सेना दलांसाठी गौरवपर पदके, मानचिन्हे (वीरचक्र ,कीर्तिचक्र इत्यादी), गणवेशावरील बिल्ले बनवणे

५) अधिकृत व्यापाऱ्यांकडून कच्चे सोने घेऊन त्यांना शुद्ध सोन्याच्या लगडी बनवून देणे.

टांकसाळ खूण

प्रत्येक नाण्यावर ते नाणे कुठल्या टांकसाळीने बनवले आहे याची खुण असते. सामान्यतः नाणे कुठल्या साली बनवले गेले या वर्षाच्या आकड्याखाली टांकसाळ खुण असते. नाणेसंग्रह करणारे अनेक जण विशिष्ट टांकसाळ खुणेची नाणी जमवत असतात.

भारतातील नाण्यांवरच्या टांकसाळीच्या खुणा खालील प्रमाणे असतात -

१) मुंबई टांकसाळ - वर्षाच्या आकड्या खाली पत्त्यातील चौकटची खूण किंवा B हे अक्षर किंवा M हे अक्षर (१९९६ नंतर छापलेल्या नाण्यासाठी).

२) कलकत्ता टांकसाळ - कुठलीही टांकसाळ खूण नसते

३) हैदराबाद टांकसाळ - पंचकोनीय तारा (*)

४) नॉयडा टांकसाळ - छोटा किंवा मोठा ठिपका (° किंवा o)

भारतातील आधुनिक टांकसाळीचा इतिहास

१) १७५७ साली इंग्रजांनी कोलकाता येथे पहिली टांकसाळ उघडली. सध्या वापरात असणारी कोलकाता येथील 'अलीपूर टांकसाळ' दुसऱ्या महायुद्धापूर्वी बांधणे सुरू झाले. १९५२ साली तत्कालीन अर्थमंत्री श्री चिंतामणराव देशमुख यांनी तिचे उद्घाटन केले.

२) सिकंदराबाद (हैदराबादचे जुळे शहर) येथे असणारी चेरलापल्ली टांकसाळ १८०३ साली निजामाच्या शासनासाठी चालू झाली. १९९७ साली या टांकसाळीची जुनी जागा बदलून ती सध्याच्या जागी हलवली.

३) मुंबई येथील फोर्ट विभागात असणारी भारतीय टांकसाळ १८२९ साली तत्कालीन इंग्रज गव्हर्नर यांनी सुरू केली.

४) १९८८ साली सुरू झालेली उत्तर प्रदेश राज्यातील नॉयडा येथील टांकसाळ ही स्वतंत्र भारतात उभारली गेलेली पहिली टांकसाळ आहे. स्टेनलेस स्टील पासून बनवलेली भारतीय नाणी नॉयडा टांकसाळीत प्रथम बनवली गेली.

बाह्य दुवे

Tags:

टांकसाळ कामेटांकसाळ खूणटांकसाळ भारतातील आधुनिक ीचा इतिहासटांकसाळ बाह्य दुवेटांकसाळनाणे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अष्टांगिक मार्गॐ नमः शिवायसंस्‍कृत भाषाऋग्वेदभारतातील राजकीय पक्षअ-जीवनसत्त्वभारतातील जातिव्यवस्थाध्वनिप्रदूषणभालचंद्र वनाजी नेमाडेहोमी भाभासमुद्री प्रवाहउदयभान राठोडशिवज्ञानपीठ पुरस्कारती फुलराणीजागतिकीकरणबदकमंदार चोळकरअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनबेकारीसंयुक्त राष्ट्रेहरितक्रांतीटोमॅटोजैन धर्मदत्तात्रेयपुणे करारबीड जिल्हाआर्द्रतातुळजाभवानी मंदिरगेंडाकुस्तीराजा राममोहन रॉयझी मराठीदूधसेंद्रिय शेतीहिंदू धर्मजेजुरीभारतीय संस्कृतीबावीस प्रतिज्ञाशिवसेनामुद्रितशोधनराहुल गांधीमहाराष्ट्र विधान परिषदअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९नैसर्गिक पर्यावरणवर्तुळकेदारनाथ मंदिरबासरीमराठी भाषेमधील वृत्तपत्रेवि.वा. शिरवाडकरपंजाबराव देशमुखसंत जनाबाईप्रकाश आंबेडकरसचिन तेंडुलकरव्यवस्थापनवसंतराव नाईकओझोननाटकटरबूजग्रहमहाराष्ट्रातील पर्यटनबाळ ठाकरेसंवादव्यायामकडुलिंबक्योटो प्रोटोकॉलवर्णमालाशुक्र ग्रहचंद्रनीती आयोगभारद्वाज (पक्षी)बिरसा मुंडामहाराष्ट्राचा इतिहासअजिंठा-वेरुळची लेणीघारापुरी लेणीगुन्हे अन्वेषण विभाग - महाराष्ट्र राज्यसंगणक विज्ञानभारत छोडो आंदोलनभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्या🡆 More