ऑपरेशन ओव्हरलॉर्ड

ऑपरेशन ओव्हरलॉर्ड तथा नॉर्मंडीची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यानची निर्णायक मोहीम होती.

६ जून, इ.स. १९४४ रोजी दोस्त राष्ट्रांनी केलेल्या नॉर्मंडीवरील चढाईने सुरू झालेली ही मोहीम ३० जून रोजी जर्मन सैन्याने सीन नदीपल्याड माघार घेतल्यावर संपली. या मोहीमेच्या अंतर्गत दोस्त राष्ट्रांनी युरोपमध्ये आपले सैन्य कायमचे घुसवले व त्याद्वारे येथून पुढे जर्मनीचा पूर्ण पाडाव केला.

६ जूनच्या पहाटे दोस्त राष्ट्रांच्या १,२०० विमानांनी हजारो सैनिक फ्रांसमध्ये उतरवले व सकाळी ५,००० नौकां नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर चालून गेल्या. एका दिवसात १,६०,००० सैनिक नॉर्मंडीत उतरले व किनाऱ्यावरील अनेक ठिकाणची तटबंदी त्यांनी उद्ध्वस्त केली. अमेरिकन सैन्य युटा बीच, ओमाहा बीच, ब्रिटिश सैन्य स्वोर्ड बीच, गोल्ड बीच तर कॅनडाचे सैन्य जुनो बीच या पुळणींवर उतरले. सुरुवातीच्या या हल्ल्यात यानंतर दोस्तांनी ऑगस्टअखेरपर्यंत नॉर्मंडीतून २०,००,००० सैनिक युरोपमध्ये घुसवले.

ही मोहीम चालविण्याचा निर्णय दोस्त राष्ट्रांनी मे १९४३मध्ये झालेल्या ट्रायडेंट कॉन्फरन्समध्ये घेतला होता. त्याच वेळी अमेरिकेच्या ड्वाइट डी. आयझेनहोवर यांची मोहीमेचे सरसेनापती तर युनायटेड किंग्डमच्या बर्नार्ड मॉंटगोमरी यांची नेमणूक आक्रमक सैन्याच्या सेनापतीपदी करण्यात आली.

ही मोहीम फत्ते करण्यासाठी दोस्तांनी अनेक नवीन तंत्रज्ञाने विकसित केली. जर्मनीची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी ऑपरेशन बॉडीगार्ड ही मोहीम चालवली. याने जर्मनीला युरोपवरील आक्रमणाचे ठिकाण व काळवेळ बिलकुल कळले नाही.

Tags:

इ.स. १९४४दुसरे महायुद्धदोस्त राष्ट्रेनाझी जर्मनीनॉर्मंडीयुरोपसीन नदी३० जून६ जून

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भाषालंकारभारतातील राजकीय पक्षनांदेड लोकसभा मतदारसंघउंबरमांजरआम्ही जातो अमुच्या गावाधनंजय चंद्रचूडऋग्वेदनिवडणूकस्वच्छ भारत अभियानविष्णुट्विटरवंचित बहुजन आघाडीसावित्रीबाई फुलेवल्लभभाई पटेलॲरिस्टॉटलशेतीची अवजारेबावीस प्रतिज्ञावि.वा. शिरवाडकरमकरसंक्रांतफुटबॉलबुध ग्रहमहाराष्ट्राचा इतिहासअजित पवारछत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयस्नायूआळंदीउत्पादन (अर्थशास्त्र)ठरलं तर मग!फळशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीवंजारीमुखपृष्ठभुजंगप्रयात (वृत्त)अतिसारवनस्पतीपंचायत समितीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९म्हणीवातावरणहरितक्रांतीसमाज माध्यमेडाळिंबनागपूरगणपती स्तोत्रेऑलिंपिकबुद्धिबळआंग्कोर वाटबालिका दिन (महाराष्ट्र)इतिहासशिवाजी महाराजांची राजमुद्रामित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)गालफुगीबातमीपोपटकबूतरगटविकास अधिकारीसायकलिंगपक्षीस्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट)दहशतवाद२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाजीवनसत्त्वसाईबाबासदानंद दातेकल्पना चावलाकबड्डीबलुतेदारलोकमतजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेकल्याण लोकसभा मतदारसंघआंतरराष्ट्रीय नाणेनिधीबाबा आमटेगोवाव्हॉट्सॲपजास्वंदमहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीओमराजे निंबाळकरमौर्य साम्राज्य🡆 More