उंबर

उंबराचे (Ficus racemosa) झाड खूप मोठे असते.

या झाडाचे खोड पांढरट रंगाचे असते. याची पाने हिरव्या रंगाची असतात. या पानांचा आकार लांबट असतो. तसेच या झाडांच्या पानांवर फोडफड असतात. हे झाड साधारणपणे ४० ते ४५ फूट उंच असते.या झाडाला खोडाच्या जवळ झुपक्यांनी गोल फळे येतात. ही फळे कच्ची असताना हिरवी, तर पिकल्यावर लाल रंगाची होतात.

उंबर
उंबर
उंबराचे खोड
उंबर
उंबराची फळे

वैशिष्ट्ये

या झाडाखाली सद्गुरू दत्ताचे स्थान असते अशी लोकांची श्रद्धा आहे. म्हणून याला औदुंबर असे म्हटले जाते. हे झाड जमिनीतील पाण्याचा साठा दर्शवते. हे झाड जिथे असेल तिथे पाण्याचा साठा निर्माण होतो. शिवाय हे २४ तास प्राणवायू हवेत सोडते. या झाडाचे फूल कधीच दिसत नाही. उंबर हेच याचे फूल. उंबरामध्ये फुलाचे सर्व अवयव दिसतात. उंबरात किडे असतात. (उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिती लीला! जग हे बंदीशाला ... राजा परांजपे यांच्या 'जगाच्या पाठीवर' चित्रपटातले गीत)

धार्मिक महत्त्व

या झाडाच्या सुकलेल्या काड्या होमहवनात समिधा म्हणून अर्पण करतात. या झाडाची पूजा केली जाते.

औषधी उपयोग

या झाडाची पाने वाटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात. गालगुंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावल्यास त्याची तीव्रता कमी होते. या झाडाच्या पानांवरील फोडांचा उपयोग वांतीवर केला जातो. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात.

इतर उपयोग

उंबराची फळे खाता येतात. याची पाने शेळी बकरी आवडीने खातात. पक्षी या झाडाची फळे खातात. या झाडाच्या सावलीत बसून पवित्र ग्रंथ पोथ्या वाचन करतात.

इतर माहिती

अशा या पूजनीय बहुउपयोगी झाडाचा बीजप्रसार पक्ष्यांमार्फत होतो.

जीवशास्त्रीय रचना

उंबर किंवा औदुंबर (शास्त्रीय नाव: Ficus racemosa, फायकस रेसिमोझा ; कुळ: मोरेसी; ) हा मुख्यतः भारत, श्रीलंका, म्यानमार, ऑस्ट्रेलिया या देशांत आढळणारा सदापर्णी वृक्ष आहे. जवळपास १२ ते १५ मी. उंच वाढणाऱ्या या वृक्षाची पाने किंचित लांबट, अंडाकृती, टोकदार व गडद हिरव्या रंगाची असतात. उंबराचे फळ म्हणजे नर, मादा, नपुंसक फुलांचा समूह असतो. फळ कापल्यास ही फुले दिसतात. ब्लास्टोफॅगा सेनेस हा चिलटाएवढा कीटक आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत, त्यांच्या सहजीवनातून या कीटकाचे प्रजनन आणि उंबर या वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात. वड, पिंपळ, उंबर व अंजीर या फळांची रचना ही फळात फुले' अशी आहे.यातील नर जातीची फुले ही फळांच्या पुढच्या भागात असतात, तर स्त्री जातीची फुले ही देठाकडील भागात असतात. या दोन्हीच्या मधल्या भागातील फुले मात्र नपुंसक असतात.

वैशिष्ट्ये व वापर

उंबराच्या झाडाला पार बांधलेला असेल तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात. याची सावली अतिशय शीतल असते झाडाचा पाला, फळे, साल गुरांना चारा म्हणून वापरतात. उंबराचे झाड हे पक्षी, कीटक, खारी यांचे आवडते वसतिस्थान असते. माणसे फळे खातात व औषध म्हणून झाडाचा उपयोग करतात. जिथे उंबर असतो तिथे पाण्याचा स्रोत असतो अशी ग्रामीण भागात मान्यता आहे.

याचे लाकूड पाण्यात दीर्घकाळ टिकाव धरते म्हणून या लाकडाचा दाराच्या चौकटीत खालचे बाजूस उंबरा किंवा उंबरठा बनविण्यासाठी वापरतात.त्यायोगे सरपटणारे प्राणी घरात शिरण्यासही अटकाव होत होता.

सूर्योदयाच्या आधी झाडाला खरवडले तर खोडातून चीक येतो. हा चीक गालगुंड झालेल्या गालाला लावला तर आराम मिळतो. हा चीक शीतगुणांचा असून त्यायोगे दाहाचे शमन होते. रक्तस्राव थांबविण्यासाठी तसेच विषावर उतारा म्हणूनही याचा उपयोग करतात.

आख्यायिका

विष्णूने नृसिंहावतारात हिरण्यकश्यपूचा वध उंबऱ्यावर बसून केला.त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्याने नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचे शमन केले.लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांमुळे होणारा दाह थांबला.

आराध्यवृक्ष

हा कृत्तिका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

चित्रदालन

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

  • "कुमार विश्वकोश".

संदर्भ

Tags:

उंबर वैशिष्ट्येउंबर धार्मिक महत्त्वउंबर औषधी उपयोगउंबर इतर उपयोगउंबर इतर माहितीउंबर जीवशास्त्रीय रचनाउंबर वैशिष्ट्ये व वापरउंबर आख्यायिकाउंबर आराध्यवृक्षउंबर चित्रदालनउंबर हे सुद्धा पहाउंबर बाह्य दुवेउंबर संदर्भउंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मातीनगर परिषदकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघजगातील देशांची यादीमानवी शरीरईशान्य दिशागुळवेलमाहिती अधिकारमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थासेवालाल महाराजमहाराष्ट्ररविकांत तुपकरप्रीतम गोपीनाथ मुंडेधनगरहातकणंगले विधानसभा मतदारसंघसंयुक्त महाराष्ट्र चळवळगुरू ग्रहसुभाषचंद्र बोससंग्रहालयपृथ्वीचे वातावरणबडनेरा विधानसभा मतदारसंघसंवादभारतातील राजकीय पक्षदिशालोकमान्य टिळकमराठवाडासूर्यमालाएप्रिल २५समासदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघभारतीय रिझर्व बँकभारतीय आडनावेवायू प्रदूषणनितंबमहाराष्ट्रातील लोककलामण्यारअध्यक्षगोंदवलेकर महाराजमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९महाराष्ट्राचे राज्यपालजया किशोरीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमहाराष्ट्रातील नद्यांची यादीज्वारीपोलीस पाटीलपूर्व दिशाज्ञानेश्वरीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेबाळ ठाकरेमहाराष्ट्रातील राजकारणरेणुकाभारतीय संस्कृतीखडकभारताचा ध्वजधृतराष्ट्रदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाकाळभैरवग्रंथालयसोयाबीनतुकडोजी महाराजक्षय रोगशाहू महाराजबुलढाणा विधानसभा मतदारसंघभारताच्या अधिकृत भाषांची यादीजिंतूर विधानसभा मतदारसंघशेतीउद्धव ठाकरेपरभणी विधानसभा मतदारसंघअष्टांगिक मार्गभरती व ओहोटीपसायदाननांदेड लोकसभा मतदारसंघउत्तर दिशातूळ रासजागतिक लोकसंख्यामतदानमहाराष्ट्र पोलीस🡆 More