रेब्रांट

रेम्ब्रा हा एक जग प्रसिद्ध डच चित्रकार होता.

सन १६०६ किंवा सन १६०७ साली तो लायडन या शहारात जन्मला. सन १६३२ पासून त्याने मात्र आपले उर्वरित आयुष्य ऍमस्टरडॅम शहरात घालवले. सन १६६९ मधे त्याचा मॄत्यु झाला. प्रकाश आणि सावल्यांचा वापर चित्रकलेत करण्यात तो कुशल होता. त्याचा काळ हा डच चित्रकलेचा सुवर्णकाळ मानला जातो.

रेम्ब्रॉं फान रेन
रेब्रांट
रेम्ब्रॉंने काढलेले आत्मव्यक्तिचित्र (१६६१)
पूर्ण नावरेम्ब्रॉं हार्मेन्स्त्सून फान रेन
जन्म जुलै १५, १६०७
लायडन, नेदरलँड्स
मृत्यू ऑक्टोबर ४, १६६९
ऍमस्टरडॅम, नेदरलँड्स
राष्ट्रीयत्व डच रेब्रांट
कार्यक्षेत्र चित्रकला

रेम्ब्रावर करावागिओ व इतर अनेक इटालियन चित्रकारांचा प्रभाव होता. तो चित्रकलेचा शिक्षक देखील होता.

सन १६३१ मधे लायडनमधे त्याच्या चित्रशाळेची भरभराट होत असतांना तो ऍमस्टरडॅमला आला. तो हॉलंडचा सर्वात प्रसिद्ध व्यक्तिचित्रकार होता. धार्मिकचित्रे आणि अनेक व्यक्तिचित्र काढण्याची कामे त्याला मिळाली. मानाचे आणि संपन्नतेचे जीवन जगत असतांना त्याने १६३४ मधे सास्कीया या सुंदरीशी लग्न केले. पुढे त्याच्या अनेक चित्रांची ती विषय होती. या काळातील त्याच्या चित्रांत प्रकाशाच सुंदर आणि तीव्र वापर केलेला आढळतो. व्यक्तिचित्रांखेरीज तो भूचित्रे (देखावे) आणि धातूंवर कोरीव चित्रे काढण्यात प्रसिद्ध पावला. त्याने स्वतःची देखील अनेक चित्रे काढली. एका अंदाजानुसार त्याने ५० ते ६० व्यक्तिचित्रे काढली.

१६३६ पासून पुढील काळात त्याच्या चित्रांचे विषय शांत, गंभीर आणि वैचारिक वाटतात. पुढील चार वर्षांत त्याची चारपैकी तीन मुले लहानवयात मरण पावली, तर १६४२ मधे त्याच्या पत्नीचे निधन झाले. १६३० ते १६४० च्या दशकांत त्याने प्रामुख्याने भूचित्रे(देखावे) आणि कोरीवचित्रे काढली. 'द नाईट वॉच' हे त्याचे प्रसिद्ध भूचित्र (देखावा) आहे.

रेब्रांट
'द नाईट वॉच' किंवा 'द मिलीशिया कंपनी ऑफ कॅप्टन बॅनिंग कोक' नावाने ओळखले जाणारे तैलचित्र(१६४२). हे चित्र सध्या 'रिक्समुझेउम, ऍमस्टरडॅम' येथे आहे.

१६४० ते १६५० च्या दशकांत त्याला कमी कामे मिळाली आणि त्याची साम्पत्तिक परिस्थिती ढासळली. आजच्या चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी तो एक खरा, मुक्त आणि निर्भीड कलोपासकाचे उदाहरण आहे.

प्रमुख चित्रे

त्याने जवळजवळ ६०० चित्रे, ३०० कोरीवचित्रे आणि १४०० रेखाचित्रे काढली. सेन्ट पॉल इन प्रिझन (१६२७), सपर ऍट इमाओस (१६३०), यंग गर्ल ऍट ऍन ओपन हाफ-डोअर (१६४५), द मिल (१६५०) आणि इतर अनेक चित्रे.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

तैनाती फौजपश्चिम दिशाबहावारवींद्रनाथ टागोरगोपीनाथ मुंडेसभासद बखरमाढा लोकसभा मतदारसंघजागतिक व्यापार संघटनाभारताचा भूगोल२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाफेसबुकद प्रॉब्लम ऑफ द रूपीपाऊसवर्णययाति (कादंबरी)उत्क्रांती३३ कोटी देवटरबूजभारतीय स्थापत्यकलाक्रियापदओशोतिवसा विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीबंगालची फाळणी (१९०५)महादेव जानकरसुप्रिया सुळेकलावडराजकीय पक्षहोनाजी बाळाजैन धर्मगुंतवणूकचलनवाढभारताचे पंतप्रधानमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीरामजी सकपाळमहाराणा प्रतापसमर्थ रामदास स्वामीमांगवस्त्रोद्योगदारिद्र्यरेषाआनंद शिंदेमावळ लोकसभा मतदारसंघनितीन गडकरीविजयसिंह मोहिते-पाटीलभारतीय संविधानाची उद्देशिकाभारतीय तंत्रज्ञान संस्थाबुलढाणा लोकसभा मतदारसंघरशियाचा इतिहासअर्जुन पुरस्कारलोकशाहीतिरुपती बालाजीकासारमूलद्रव्यशेतकरीतापमानमृत्युंजय (कादंबरी)मराठी भाषा दिनगुढीपाडवामहाराष्ट्रातील खासदारांची यादीमराठा साम्राज्यआझाद हिंद फौजकरवंदबहिष्कृत भारतराजरत्न आंबेडकरकेंद्रीय लोकसेवा आयोगभरतनाट्यम्महाराष्ट्राचा भूगोलभारतीय संस्कृतीनामदेवमहाराष्ट्रातील स्थानिक शासननाझी पक्षवर्णमालापंजाबराव देशमुखरशियाफॅसिझमविशेषणजागरण गोंधळ🡆 More