शेपू

शेपू (इंग्रजी: Dill ; मराठी: बाळंतशेपू , बाळंतशोपा, शोफा, शापू ; शास्त्रीय नाव Anethum graveolens) ही पालेभाजी इंग्रजीत Dill या नावाने ओळखली जाते.

त्याचे शास्त्रीय नाव Anethum graveolens आहे .यास बाळंतशोपा असेही नाव आहे.हिरव्या लहान पानाची ही भाजी शरिरासाठी उपयोगी आहे. ही द्विदलीय फूले असणारी वनस्पती आहे.

शेपू
शेपू

यूरेशियामध्ये शेपू मोठ्या प्रमाणात घेतले जाते जेथे त्याची पाने आणि बियाणे अन्नासाठी चव येण्यासाठी औषधी वनस्पती किंवा मसाला म्हणून वापरली जातात.

या ३० – ९० सेंमी. उंचीच्या ओषधीय बहुवर्षायू पालेभाजीचे मूलस्थान भूमध्य सामुद्रिक प्रदेश असून भारतात तिचा प्रसार सर्वत्र आहे. दक्षिण यूरोपपश्चिम आशियात ती लागवडीत आहे. खानदेश व गुजरातमधील काही भागांत शेपूची मोठया प्रमाणात लागवड करतात. शेपूची पाने संयुक्त त्रिगुण-पिच्छाकृती, शेवटचे दलक रेषाकृती, देठ तळाजवळ रूंदट, फुले लहान पिवळी व संयुक्त चामरकल्प फुलोऱ्यात साधारणतः जुलै-ऑगस्टमध्ये येतात. फळ (आंदोलिपाली) ४ २ मिमी. कंगोरे व अरूंद-पंखाचे बिया सपाट. तैलनलिका व कंगोरे एकाआड एक असतात. पालेभाजी तिखट, कडवट, कफवातनाशक, शुकदोषनाशक, कृमिनाशक समजतात.बी कुटून पाण्यात उकळून व त्यामध्ये त्याची मुळे मिसळून संधिवात व सुजेवर लावतात.

बियांपासून बाष्पनशील तेल मिळते. फळ (बी) स्निग्ध,तिखट भूक वाढविणारी, उष्ण, मूत्ररोधक,बुद्धिवर्धक असुन कफ व वायूनाशक असते. याचे सेवनाने दाह शूळ नेत्ररोग , तहान ,अतिसार यांचा नाश होतो.बाळंतीणीस ही सोप पचनास विडयामध्ये देतात.

भाषा नाव
मराठी शेपू, बाळंतशेपू , बाळंतशोपा, शोफा, शापू
हिंदी सोवा
संस्कृत शतपुष्पी
गुजराती सुवा
कन्नड सब्बसिगे
लॅटिन प्युसिडॅनम गॅविओलेन्स (ॲनेयम सोवा)

लागवड

भारतामध्ये पालेभाजीसाठी पाण्याखाली उन्हाळी व हिवाळी हंगामांत लागवड करतात.

संदर्भ यादी

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेमराठी भाषा दिनपंकजा मुंडेक्रिकेटसंगणक विज्ञानरमाबाई रानडेमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीमलेरियामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीपुरातत्त्वशास्त्रवेरूळ लेणीहिंगोली विधानसभा मतदारसंघगडचिरोली जिल्हाभारतरत्‍नधोंडो केशव कर्वेतुकडोजी महाराजयूट्यूबमानवी हक्कबाबा आमटेऋतुराज गायकवाडपरभणीआकाशवाणीभारताचे राष्ट्रचिन्हजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघकुंभ रासकालभैरवाष्टकरामायणहळदछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसॲडॉल्फ हिटलरकुरखेडा तालुकावर्धा विधानसभा मतदारसंघशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेलगोंधळसैराटआणीबाणी (भारत)हिजडाभारतातील मूलभूत हक्कबलुतेदारदूरदर्शनजपानरायगड जिल्हाअहिल्याबाई होळकरराजपत्रित अधिकारीलहुजी राघोजी साळवेराजरत्न आंबेडकरबीड जिल्हा२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाहिंदू धर्मातील अंतिम विधी२०२४ लोकसभा निवडणुकापरभणी लोकसभा मतदारसंघपाकिस्तानसूर्यनमस्कारबाजी प्रभू देशपांडेयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघफणसश्रीनिवास रामानुजनकेंद्रशासित प्रदेशअष्टांगिक मार्गक्रिकेटचा इतिहासभारताचा इतिहासमहाराष्ट्राचा इतिहासभारताच्या राष्ट्रपतींची यादीवर्षा गायकवाडविनायक दामोदर सावरकरगुरू ग्रहभारूडलोकगीतआईजालना विधानसभा मतदारसंघहस्तमैथुनभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघउदयनराजे भोसलेसंयुक्त राष्ट्रेवृत्तपत्रकावीळ🡆 More