शं.ना. नवलगुंदकर

डॉ.

शंकर नागेश नवलगुंदकर (२७ सप्टेंबर, १९३५:संगमनेर, महाराष्ट्र - ) हे पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.

कौटुंबिक माहिती आणि शिक्षण

यांचे मूळ गाव संगमनेर असून त्यांचे वडील तेथे संस्कृतचे शिक्षक होते. नवलगुंदकरांचे शालेय शिक्षण संगमनेरच्या पेटिट हायस्कूलमध्ये आणि कॉलेज शिक्षण नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयामध्ये झाले. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सुचवल्यामुळे संस्कृतऐवजी अर्थशास्त्र विषय घेऊन नवलगुंदकरांनी पदवी मिळवली. त्यांनी स्‍वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर पीएच.डी.ची पदवी मिळवली.

१९५८ च्या सुमारास नवलगुंदकर पुण्यात आले आणि सराफ विद्यालय (आत्ताचे भारत हायस्कूल) येथे इंग्लिश आणि गणिताचे शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर शाहू महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठात त्यांनी अध्यापन केले. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाल्यावरही ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठात अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे विषय शिकवीत. नवलगुंदकर २०१६पासून संगमनेरच्या शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष आहेत.

लेखन

नवलगुंदकरांनी राज्यशास्त्र व अर्थशास्त्राविषयीच्या अनेक पाठ्यपुस्तकांचे लेखन केले. आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत हे त्यांचे पहिले पुस्तक होते. सुलभ राज्यशास्त्र (भारतीय शासनसंस्था) पुस्तक हे त्यांनी बाराव्या इयत्ते करिता लिहिले.

अन्य पुस्तके

  • आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत
  • आनंद तरंग ( विनोद आणि संस्कार) भाग १, २, ३.
  • पसायदान : हिंदुत्वाचा जाहीरनामा
  • वि. दा. सावरकर
  • स्वातंत्र्यवीर सावरकर विचारविश्व (१९९९)

Tags:

इ.स. १९३५पुणे विद्यापीठमहाराष्ट्रसंगमनेर२७ सप्टेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भीमाशंकरमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीभारतीय स्टेट बँकप्राजक्ता माळीगोंधळएकनाथतिवसा विधानसभा मतदारसंघदशरथउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघकादंबरीम्हणीखडकमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभगवानबाबादक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीबखरसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेअलिप्ततावादी चळवळबिरसा मुंडामानवी विकास निर्देशांकशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकयवतमाळ विधानसभा मतदारसंघपरभणी विधानसभा मतदारसंघअचलपूर विधानसभा मतदारसंघविरामचिन्हेदिल्ली कॅपिटल्सक्रियाविशेषण२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्र भूषण पुरस्कारनवनीत राणाभारतीय प्रजासत्ताक दिनहिंगोली लोकसभा मतदारसंघजयंत पाटीलध्वनिप्रदूषणज्ञानेश्वरझाडशाश्वत विकासनवग्रह स्तोत्रसत्यशोधक समाजविजयसिंह मोहिते-पाटीलश्रीनिवास रामानुजननगदी पिकेअष्टांगिक मार्गफकिराशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीलोकसभासुधा मूर्तीमहाराष्ट्राची हास्यजत्रातणावपोलीस महासंचालकडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लराहुल गांधीमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगहातकणंगले विधानसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारदिवाळीअमरावती लोकसभा मतदारसंघनियतकालिकसतरावी लोकसभाहिंगोली जिल्हाप्रल्हाद केशव अत्रेपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरबहिणाबाई चौधरीसंदीप खरेगुणसूत्रभारतातील मूलभूत हक्कसातारा जिल्हाहत्तीपोक्सो कायदारामदास आठवलेश्रीया पिळगांवकरयूट्यूबयोनीसमासईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघसंग्रहालय🡆 More