भावना कंठ

भावना कंठ ह्या भारतातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिकांपैकी एक आहे.

त्यांना त्यांच्या दोन सहकारी मोहना सिंग आणि अवनी चतुर्वेदी यांच्यासह पहिली लढाऊ वैमानिक म्हणून घोषित करण्यात आले आहे. जून २०१६ मध्ये या तिघींना भारतीय हवाई दलाच्या फायटर स्क्वॉड्रनमध्ये सामील करण्यात आले होते. त्यांना तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी औपचारिकपणे नियुक्त केले होते. भारत सरकारने प्रायोगिक तत्त्वावर महिलांसाठी भारतीय हवाई दलात लढाऊ विभाग उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, या तीन महिलांची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली. मे २०१९ मध्ये, लढाऊ मोहिमा हाती घेण्यासाठी पात्र ठरणारी ती भारतातील पहिली महिला लढाऊ पायलट ठरली.

फ्लाईट लेफ्टनंट
भावना कंठ
भावना कंठ
भावना कंठ
जन्मनाव भावना तेज नारायण कंठ
जन्म १ डिसेंबर, १९९२ (1992-12-01) (वय: ३१)
दरभंगा, बिहार
Allegiance भारत ध्वज भारत
सैन्यशाखा भावना कंठभारतीय वायुसेना
हुद्दा भावना कंठ फ्लाईट लेफ्टनंट
पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार
भावना कंठ
डावीकडून मोहना सिंग, अवनी चतुर्वेदी आणि भावना कंठ

वैयक्तिक आयुष्य

कंठ यांचा जन्म १ डिसेंबर १९९२ रोजी दरभंगा, बिहार येथे झाला. त्यांचे वडील तेज नारायण कंठ इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत आणि आई राधा कंठ घरगृहिनी आहेत. मोठे होत असताना कंठ यांना खो खो, बॅडमिंटन, पोहणे आणि चित्रकला या खेळांची आवड होती.

शिक्षण

कंठ यांनी बरौनी रिफायनरी येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी कोटा, राजस्थान येथे अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेची तयारी केली होती. कंठ पुढील शिक्षणासाठी बेंगळुरूच्या बीएमएस कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये बॅचलर ऑफ इंजिनीअरिंगमध्ये दाखल झाल्या. त्यांनी २०१४ मध्ये पदवी प्राप्त केली आणि आयटी क्षेत्रातील दिग्गज टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये त्या भरती झाल्या.

कारकीर्द

कंठ या नेहमीच विमाने उडवण्याचे स्वप्न पहात असत. त्यांनी हवाई दलाची सामाईक प्रवेश परीक्षा दिली आणि लवकरच त्यांची हवाई दलात नियुक्ती होण्यासाठी निवड झाली. स्टेज I प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून, त्या लढाऊ प्रवाहात सामील झाल्या.

जून २०१६ मध्ये, कंठ यांनी हैदराबादमधील हकिमपेट एर फोर्स स्टेशनवर किरण इंटरमीडिएट जेट ट्रेनर्सवर सहा महिन्यांचे स्टेज-II प्रशिक्षण घेतले, त्यानंतर त्यांना डुंडीगल येथील एर फोर्स अकादमीमध्ये कॉम्बाइंड ग्रॅज्युएशन परेड स्प्रिंग टर्ममध्ये फ्लाइंग ऑफिसर म्हणून पद मिळाले.

कंठ यांनी हॉक प्रगत जेट ट्रेनर उडवले. त्यांना व त्यांच्या गटातील इतर दोन सदस्यांना MIG 21 बायसन स्क्वॉड्रनमध्ये हलवण्याची योजना आहे.

फ्लाइंग ऑफिसर भावना कंठ यांनी १६ मार्च २०१८ रोजी मिग-२१ 'बायसन'चे एकट्याने उड्डाण केले. कंठ यांनी सुमारे १४०० तास अंबाला एरफोर्स स्टेशनवरून मिग-21चे एकट्याने उड्डाण केले.

कंठ यांनी काही मॉडेलिंग असाइनमेंट देखील करून पाहिले आणि त्याच बरोबर जाहिरातींमध्ये देखील काम केले.

९ मार्च २०२० रोजी कंठ यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

भावना कंठ 
२०२० मधील नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांसह, नरेंद्र मोदी

त्या भारतीय वायुसेनेच्या क्रमांक-३ स्क्वॉड्रन कोब्रासमध्ये तैनात आहे.

संदर्भ

Tags:

भावना कंठ वैयक्तिक आयुष्यभावना कंठ शिक्षणभावना कंठ कारकीर्दभावना कंठ संदर्भभावना कंठअवनी चतुर्वेदीमनोहर पर्रीकरमोहना सिंग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सृष्टी देशमुखसत्यशोधक समाजमहाराष्ट्रातील पर्यटनरयत शिक्षण संस्थामहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीजास्वंदआंबेडकर जयंतीगजानन महाराजजिजाबाई शहाजी भोसलेभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मपाणलोट क्षेत्रअहवालकृष्णा नदीप्रज्ञा विवर्धन स्तोत्रभोकरमुलाखत१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धदूरदर्शनगोदावरी नदीनामदेवकोरोनाव्हायरस रोग २०१९शब्दनारायण मेघाजी लोखंडेसुजात आंबेडकरअहिल्याबाई होळकरदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनानेतृत्वशरद पवारसमाजशास्त्रआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकमहाराष्ट्रातील आरक्षणघनकचरामाती प्रदूषणपुरस्कारजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पकुटुंबजगातील देशांच्या राजधान्यांची यादीगालफुगीमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीशिवसेनाअहमदनगरअहमदनगर जिल्हाकर्कवृत्ततुळजाभवानी मंदिरशुद्धलेखनाचे नियमनेपाळदादाजी भुसेभारतीय संस्कृतीदीनबंधू (वृत्तपत्र)कालिदासमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९भारताचे सरन्यायाधीशअभंगशांता शेळकेगंगा नदीआईलक्ष्मीकांत बेर्डेहिंदू धर्मनांदेडराष्ट्रवादी काँग्रेस पक्षपवन ऊर्जाभारत छोडो आंदोलनरोहित पवारइंडियन प्रीमियर लीगवर्णमालाभाऊराव पाटीलहिंदू कोड बिलभारताचा भूगोलसीतागेटवे ऑफ इंडियाउजनी धरणराष्ट्रीय स्वयंसेवक संघबुद्धिमत्ताअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनजैवविविधताशिवकेदारनाथदिनकरराव गोविंदराव पवार🡆 More