मनोहर पर्रीकर: भारतीय राजकारणी

मनोहर गोपाळकृष्ण प्रभु पर्रीकर (जन्म : १३ डिसेंबर १९५५; - १७ मार्च २०१९) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी होते.

पर्रीकर इ.स. २००० ते इ.स. २००५ व इ.स. २०१२ ते इ.स. २०१४, तसेच १४ मार्च २०१७ ते १७ मार्च २०१९ या कालावधीत गोवा राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर होते.

मनोहर पर्रीकर
मनोहर पर्रीकर: मृत्यू, चरित्र, पर्रीकरांसंबंधी पुस्तके

कार्यकाळ
९ नोव्हेंबर २०१४ – १३ मार्च २०१७
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील अरुण जेटली
पुढील निर्मला सीतारमण

कार्यकाळ
१४ मार्च २०१७ – १७ मार्च २०१९
मागील लक्ष्मीकांत पार्सेकर
पुढील डॉ. प्रमोद सावंत
मतदारसंघ पणजी
कार्यकाळ
२ मार्च २०१२ – ८ नोव्हेंबर २०१४
मागील दिगंबर कामत
पुढील लक्ष्मीकांत पार्सेकर
कार्यकाळ
२४ ऑक्टोबर इ.स. २००० – २ फेब्रुवारी इ.स. २००५
मागील फ्रान्सिस्को सार्डिन्हा
पुढील प्रतापसिंह राणे

जन्म १३ डिसेंबर १९५५
म्हापसा, गोवा
मृत्यू १७ मार्च, २०१९ (वय ६३)
गोवा
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

त्यांचा जन्म म्हापसा(गोवा) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. १९७८ साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री आहेत. पर्रीकर आणि नंदन निलेकणी हे आयआयटीतील वर्गमित्र आहेत.

ते १९९४,१९९९,२००२,२००७ आणि २०१२च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पणजी विधानसभा मतदारसंघातून गोवा विधानसभेवर निवडून गेले.

पर्रीकर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदावर असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी पर्रीकरांना केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार पर्रीकरांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व ९ नोव्हेंबर २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

मृत्यू

मनोहर पर्रीकर १७ मार्च २०१९ रोजी निधन पावले.

चरित्र

मनोहर पर्रीकर यांचे 'मनोहर कथा' नावाचे चरित्र मंगला खाडिलकर यांनी लिहिले आहे.

पर्रीकरांसंबंधी पुस्तके

  • गोवा राजकारण आणि पर्रीकर (सद्गुरू पाटील)

बाह्य दुवे

संदर्भ

Tags:

मनोहर पर्रीकर मृत्यूमनोहर पर्रीकर चरित्रमनोहर पर्रीकर पर्रीकरांसंबंधी पुस्तकेमनोहर पर्रीकर बाह्य दुवेमनोहर पर्रीकर संदर्भमनोहर पर्रीकरगोवागोव्याचे मुख्यमंत्रीभारतीय जनता पक्ष

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वाचनगाय छाप जर्दाधाराशिव जिल्हाजायकवाडी धरणसह्याद्रीसात आसरानाटोतरसमोसमी पाऊसभारतीय रिझर्व बँकसाडेतीन शुभ मुहूर्तइंदिरा गांधीलोणार सरोवरभारतातील शासकीय योजनांची यादीभारताच्या राष्ट्रपतींची यादीवडभारतरत्‍नगोवाचीनमराठी लिपीतील वर्णमालाशेळी पालनशाहू महाराजपुरंदरचा तहनिसर्गगणपतीख्रिश्चन धर्महातकणंगले विधानसभा मतदारसंघसातारा लोकसभा मतदारसंघपैठणसंस्कृतीप्रल्हाद केशव अत्रेगालफुगीभारतीय निवडणूक आयोगकोरेगावची लढाईभगतसिंगलिंग गुणोत्तरशारदीय नवरात्ररवींद्रनाथ टागोरकल्याण (शहर)मूलद्रव्यबाराखडीतणावगुरू ग्रहनैऋत्य मोसमी वारेदिशाजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रमुंबई उच्च न्यायालयभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाइंदुरीकर महाराजवेदांगजत विधानसभा मतदारसंघदिंडोरी लोकसभा मतदारसंघउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघपुणे लोकसभा मतदारसंघगूगलअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसुधीर फडके२०१९ लोकसभा निवडणुकाभारताचे उपराष्ट्रपतीशाश्वत विकासआलेमुळाक्षर१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धरायगड (किल्ला)पंजाबराव देशमुखपु.ल. देशपांडेन्यायालयीन सक्रियताब्रिक्सराहुल गांधीमराठासामवेदशुभेच्छाहनुमानऊस🡆 More