नावजीबुवा साळुंखे-किवळकर

नावजीनाथ साळुंखे(ससे पाटील,किवळकर),हे श्री केदारनाथाचे(ज्योतिबाचे) भक्त होते.देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्नग्रहन करायचे नाही असा त्यांच नित्यक्रम होता.

जोतिबाच्या दक्षिणद्वारी कापूर-अगरबत्ती जेथे लावली जाते, त्या पायरीला लागून आडवी मूर्ती आणि ज्यावर भक्तिभावाने गुलाल-फुले वाहिली जातात त्या पादुका परमभक्त नावजी बुवांच्या. देवाच्या दारी पायरीजवळ अजरामर होऊन राहण्याचा मान किवळ (ता. कराड) येथील नावजी साळुंखे (पाटील) यांना लाभला आहे. या पायरीवर दक्षिण बाजूलाच देवालयाच्या शिखरावर नावजींचा बैठ्या स्वरूपातील पुतळा आहे.

नावजीबुवा साळुंखे-किवळकर
ज्योतिबा

श्री ज्योतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते आहे त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते.मूळ मंदिर कराडजवळच्या किवळ येथील संत नावजीनाथ नामक भक्ताने बांधले व त्याचे नंतर आजचे देवालय आहे ते इ.स.१७३० मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजीराव शिंदे यांनी मुळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुनर्रचित करून बांधले.मंदिराचे बांधकाम उत्तम प्रतीच्या वेसाल्ट दगडात करण्यात आले आहे.

नावजीनाथाचे सामाजिक कार्यही उल्लेखनीय आहे.त्यांनी गावात तळे,विहीर,विठ्ठ्ल ,मारुती मंदिर,ग्रामपंचायत कट्टा,मुस्लिम समाजासाठी मशिद ही कामे केली.

आरती नावजीनाथांची

आरती नावजीसंत | ससेवंशा माझी कांत | किवळ पुण्यभूमी नांदे भा‍गीर्थी कांत |   .....आरती नावजीसंत  दया दास परिवारे सुखे नांदती सारे | दारिद्र्य कष्टकाळ उभे नावजी द्वारी |   .....आरती नावजीसंत  विमल भाव नावजीचा पू‍र्ण भक्त केदाराचा | नवविध भक्ती पंथ बसु केला जो‍तिर्लिग |   .....आरती नावजीसंत  नावजी भक्तासाठी कष्टी झाले जग जेठी | वारुवार स्वार झाले प्रेमे पाउले भेटी |   .....आरती नावजीसंत  नावजी पुत्र कांता धन्य जनाबाई माता | भेटले जोतिर्लिग झाले भाव बंधमुक्त |   .....आरती नावजीसंत  प्रपंच हे ताटकरी त्रिवी दत्ताचे निरंजनी | सदाभावे शुभपाती ओवाळीला हरी |   .....आरती नावजीसंत  अखंड ही अल्पसेवा द्यावी नावजी देवा | रघुनाथ लीन पावे माथा ठेवी वरदहस्त |   .....आरती नावजीसंत  

बाह्य दुवे


Tags:

किवळज्योतिबाचा डोंगर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

प्रेमानंद महाराजनागपूरश्रीधर स्वामीजनहित याचिकाउद्धव ठाकरेअजिंठा लेणीऔद्योगिक क्रांतीप्रकल्प अहवालएकनाथ शिंदेराजकीय पक्षघनकचराकाळभैरवसंख्याकर्ण (महाभारत)गंगाखेड विधानसभा मतदारसंघशब्द सिद्धीकुटुंबनियोजनमण्यारइंदुरीकर महाराजराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)संयुक्त महाराष्ट्र समितीभारतातील जातिव्यवस्थानांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील राजकारणग्रामपंचायतव्यापार चक्रमूळ संख्यामहाराष्ट्रातील नद्यांची यादीसिंधुताई सपकाळबुलढाणा विधानसभा मतदारसंघसत्यशोधक समाजभोवळस्वरआकाशवाणीभारत सरकार कायदा १९१९घोरपडभारतीय संस्कृतीपंढरपूरस्वादुपिंडपांडुरंग सदाशिव सानेअभंगलोकसंख्यासंत जनाबाईनक्षलवादमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीजयंत पाटीलभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसजन गण मनदक्षिण दिशाकासारनियतकालिकमराठीतील बोलीभाषाहवामानपोवाडाज्योतिबाजगातील देशांची यादीकोटक महिंद्रा बँकमुळाक्षरभारतातील शासकीय योजनांची यादीराम सातपुतेनोटा (मतदान)मटकाजालना जिल्हाद्रौपदी मुर्मूविले पार्ले विधानसभा मतदारसंघभारताचा इतिहासकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघभारतातील सण व उत्सवभारताचे राष्ट्रचिन्हबडनेरा विधानसभा मतदारसंघभारताचे पंतप्रधानशहाजीराजे भोसलेनक्षत्रजिजाबाई शहाजी भोसलेठाणे लोकसभा मतदारसंघयोनीह्या गोजिरवाण्या घरातमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादी🡆 More