कोन्स्टान्स सरोवर

कोन्स्टान्स सरोवर किंवा बोडनसे (जर्मन: Bodensee) हे युरोपातील एक मोठे सरोवर आहे.

आल्प्स पर्वतरांगेच्या उत्तर पायथ्याशी ऱ्हाईन नदीवर असलेल्या ह्या सरोवराचा जगातील महत्त्वाच्या गोड्या पाण्याच्या सरोवरांमध्ये समावेश होतो. सरोवराच्या भोवताली जर्मनीची बाडेन-व्युर्टेंबर्गबायर्न ही राज्ये, ऑस्ट्रियाचे फोरार्लबर्ग हे राज्य तर स्वित्झर्लंडची थुर्गाउसांक्ट गालेन ही राज्ये वसलेली आहेत.

कोन्स्टान्स सरोवर (बोडनसे)
Bodensee  
कोन्स्टान्स सरोवर (बोडनसे) Bodensee - बोडनसेचा नकाशा
कोन्स्टान्स सरोवर (बोडनसे)
Bodensee - बोडनसेचा नकाशा
बोडनसेचा नकाशा
स्थान युरोप
गुणक: 47°39′N 9°19′E / 47.650°N 9.317°E / 47.650; 9.317
प्रमुख अंतर्वाह ऱ्हाईन नदी
प्रमुख बहिर्वाह ऱ्हाईन नदी
पाणलोट क्षेत्र २,३१,००० वर्ग किमी
भोवतालचे देश जर्मनी ध्वज जर्मनी

ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड

कमाल लांबी ६३
कमाल रुंदी १४
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ५३६
सरासरी खोली ९०
कमाल खोली २५४
पाण्याचे घनफळ १० घन किमी
उंची १,२९६

हे सरोवर समुद्रसपाटीपासून ३९५ मी उंचीवर स्थित आहे. याची लांबी ६३ किमी असून रुंदी साधारणपणे १४ किमी आहे. याचे आकारमान ५७१ किमी-वर्ग असून युरोपातील तिसरे सर्वात मोठे सरोवर आहे. हे सरोवर मुख्यत्वे ऱ्हाइन नदीचाच एक भाग असून हिमयुगात त्याची उत्पत्ती झाली.

कोन्स्टान्स सरोवर
बोडन से सरोवर
कोन्स्टान्स सरोवर
बोडन से सरोवर

सरोवराचे चार मुख्य भाग आहेत.

  • १. ओबर-से (भाषांतर- सरोवराचा वरचा भाग)
  • २. युबरलिंगर- से
  • ३ उंटर-से (भाषांतर- सरोवराचा खालचा भाग)
  • ४ ग्नाड-से

सीमा

सरोवराच्या दक्षिणेला स्वित्झर्लंड असून उत्तरेला व पश्चिमेला जर्मनी आहे व पूर्वेचा काही भाग ऑस्ट्रियामध्ये येतो. तिन्ही देशांच्या मते तिन्ही देशांची सीमा सरोवराच्या मध्यभागी स्थित आहे.

प्रदूषण नियंत्रण

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात औद्योगिक प्रगतीमुळे सरोवराच्या प्रदूषण पातळीमध्ये खूप वाढ झाली. १९७० च्या दशकामध्ये साधारणपणे १९७६-७७ मध्ये याच्या प्रदूषणाने उच्च पातळी गाठली. याच्या प्रदूषणाचा मुख्य परिणाम सरोवरातिल मच्छिमारीवर झाला. अनेक माशांच्या प्रजाती ज्या एकेकाळी मोठ्या प्रमाणावर सरोवरात होत्या त्याची संख्या लक्षणीयरित्या रोडावली. तसेच या काळात जर्मनीतील अनेक नद्यादेखील अतिप्रदूषणामुळे ग्रासलेल्या होत्या. यानंतरच्या काळात नद्या, तळी व सरोवरे शुद्धीकरणासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने सरोवराकाठच्या सर्व शहरे व गांवामधील सांडपाणी सरोवरात तसेच सरोवरात येउन मिळणाऱ्या लहान नदी नाल्यांमध्ये सोडण्यावर अंत्यंत कडक निर्बंध लादण्यात आले. या निर्बंधात ऱ्हाइन नदीच्या वरच्या भागातील शहरे व गावे सुद्धा समाविष्ट करण्यात आली. या साठी ऑस्ट्रिया, इटली व स्विझर्लंड याचे आंतराष्ट्रिय सहकार्य घेण्यात आले. सरोवरात पोहण्यावर बंदी घालण्यात आली. सरोवराकाठच्या रस्त्यांची पुनर्रचना करण्यात आली. सरोवरकाठाला काही ठिकाणी संरक्षित अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. सरोवरच्या जवळील क्षेत्रातील शेतीवर देखील रासायनिक खते वापरण्यावर निर्बंध आहेत. यासाठी येथील सरकार शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई देते.

परिणामी हळूहळू प्रदूषण पातळी कमी होऊ लागली. अनेक माशांच्या दुर्मिळ प्रजाती पुन्हा मोठ्या संख्येने सरोवरात मिळू लागल्या. साधारणपणे १९९० नंतर प्रदूषण पातळी ही स्थिर आहे. आज हे सरोवर पूर्णतः प्रदूषणमुक्त नसले तरी पातळी प्रदूषण न जाणवण्या इतपत कमी करण्यात यश आलेले आहे. या सरोवराचे प्रदूषण मुक्तिकरण मोहिम ही आज जगातील इतर देशातील सरोवर व तळ्यांसाठी मापदंड ठरली आहे.

बाह्य दुवे

कोन्स्टान्स सरोवर 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

आल्प्सऑस्ट्रियाऑस्ट्रियाची राज्येजर्मन भाषाजर्मनीजर्मनीची राज्येथुर्गाउफोरार्लबर्गबाडेन-व्युर्टेंबर्गबायर्नयुरोपऱ्हाईन नदीसरोवरसांक्ट गालेन (राज्य)स्वित्झर्लंडस्वित्झर्लंडची राज्ये

🔥 Trending searches on Wiki मराठी:

औंढा नागनाथ मंदिरटोपणनावानुसार मराठी लेखकपौगंडावस्थाभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशओशोजत्राभारतीय संविधान दिनवसंतराव दादा पाटीलबुलढाणा जिल्हासायबर गुन्हाजागतिक वारसा स्थानगोविंद विनायक करंदीकरतरसदलित एकांकिकाभूगोलभूकंपसंदीप खरेनातीजैन धर्मसत्यशोधक समाजसमर्थ रामदास स्वामीप्रदूषणनवरी मिळे हिटलरलाभारताच्या राष्ट्रपतींची यादीजगातील देशांच्या राजधान्यांची यादीरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबलवंत बसवंत वानखेडेचिखली विधानसभा मतदारसंघप्रकाश आंबेडकरमानवी शरीरहिंगोली विधानसभा मतदारसंघरक्तमहाराष्ट्राचा इतिहाससोलापूर लोकसभा मतदारसंघगूगलमहादेव जानकरवि.वा. शिरवाडकरसोनेकोटक महिंद्रा बँकमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीभारतीय टपाल सेवाराहुल गांधीजिल्हाधिकारीकादंबरीपृथ्वीउमरखेड विधानसभा मतदारसंघकाळभैरवस्थानिक स्वराज्य संस्थाकोपेश्वर मंदिर (खिद्रापूर)जिंतूर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीध्वनिप्रदूषणकुळीथजन गण मनकिरवंतपारशी धर्मसंगीत नाटकइतर मागास वर्गविंडोज एनटी ४.०भारताचा स्वातंत्र्यलढाधनंजय मुंडेपु.ल. देशपांडेमिया खलिफामहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाशिवसेनामहाराष्ट्र केसरीनाणकशास्त्रकावळाकोरेगावची लढाईस्त्रीवादी साहित्यभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तएकनाथ शिंदेमहाराष्ट्र दिनलिंग गुणोत्तरधाराशिव जिल्हा🡆 More