कुमार गंधर्व: हिन्दुस्तानी गायक

शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व (एप्रिल ८, १९२४;सुळेभावी-बेळगाव - जानेवारी १२, १९९२;देवास) हे भारतातील हिंदुस्तानी शास्त्रीय गायक होते.

१९२४">१९२४;सुळेभावी-बेळगाव - जानेवारी १२, १९९२;देवास) हे भारतातील हिंदुस्तानी शास्त्रीय गायक होते. तत्कालीन हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील घराण्यांच्या पारंपरिक भिंती भेदून त्यांनी स्वतःची आगळ्या ढंगाची गायकी घडवली.[ संदर्भ हवा ]

शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ
कुमार गंधर्व: कुमार गंधर्व यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके, पुरस्कार व सन्मान, संदर्भ
डावीकडून राजन, टी.एन. कृष्णन व कुमार गंधर्व
उपाख्य कुमार गंधर्व
आयुष्य
जन्म एप्रिल ८, १९२४
मृत्यू १२ जानेवारी, १९९२ (वय ६७)
पारिवारिक माहिती
वडील सिद्धरामय्या कोमकलीमठ
जोडीदार
भानुमती कंस
(ल. १९४७; मृ. १९६१)
,
अपत्ये मुकुल शिवपुत्र, यशोवर्धन कंस, कलापिनी कोमकली
संगीत साधना
गुरू बी.आर. देवधर
गायन प्रकार हिंदुस्तानी गायन
नाट्यसंगीत
निर्गुणी भजने
घराणे ग्वाल्हेर
संगीत कारकीर्द
कार्य संगीत प्रसार
गौरव
गौरव पद्मभूषण

कुमार गंधर्व यांचे वडील गायक होते. घरातच गायकी असल्याने तिचा प्रभाव पडून कुमार वयाच्या सहाव्या वर्षीच गाऊ लागले. त्यांचे गाणे ऐकून गुरूकल्ल मठाचे स्वामी यांनी त्यांना वयाच्या सातव्या वर्षी कुमार गंधर्व हे नाव ठेवले. हेच पुढे त्यांचे अधिकृत नाव झाले.[ संदर्भ हवा ]

अलाहाबादच्या अखिल भारतीय संगीत परिषदेतील गायनाने एकदम प्रसिद्धी मिळून कुमार गंधर्व यांच्यावर बक्षिसे व पदके यांचा वर्षाव झाला. त्यांनी इ.स.१९३६ पासून पुढे अकरा वर्षे मुंबई येथे बा. र. देवधर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले.[ संदर्भ हवा ] १९४७ साली त्यांचे मराठी गायिका भानुमती कंस यांच्याशी लग्न झाले. त्यानंतर कुमारांना क्षयाची बाधा झाल्याने त्यांचे एक फुफ्फुस काढावे लागले. मोकळ्या स्वच्छ हवेसाठी त्यांनी मुंबई सोडली आणि ते मध्य प्रदेशातील देवास येथे राहू लागले. भानुमती कोमकली यांनी नवऱ्याची शुश्रूषा करून त्यांना बरे केले.[ संदर्भ हवा ] इ.स. १९५५ साली त्यांना मुकुल शिवपुत्र नावाचा मुलगा झाला, पुढे चालून तो देखील गायक बनला. इ.स. १९६१ मध्ये भानुमती वारल्या आणि कुमारांनी १९६२ मध्ये वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी लग्न केले. त्यांना जी मुलगी झाली तिचे नाव त्यांनी प्रख्यात पेटीवादक विठ्ठलराव सरदेशमुख यांनी सुचवल्याप्रमाणे 'कलापिनी' ठेवले.[ संदर्भ हवा ]

कुमार गंधर्वांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार वगैरे सर्व घराण्यांचे सार काढून नवीनच गायकी निर्माण केली. माळवी लोकगीतांचा विशेष अभ्यास करून त्यांवर आधारित असे ‘गीत वर्षा’, ‘गीत हेमंत’, ‘गीत वसंत’ इ. कार्यक्रम सादर केले व संगीताला एक नवीनच क्षेत्र उपलब्ध करून दिले.[ संदर्भ हवा ] १९६५ साली अनुपरागविलास हा नव्या–जुन्या रागांत स्वतः बांधलेल्या बंदिशींचा संग्रह प्रसिद्ध केला.[ संदर्भ हवा ] सूरदास, कबीर, मीराबाई यांच्या पदांच्या गायनाचे कार्यक्रम व खास माळवी लोकगीतांच्या मैफली यांसारखे नवनवीन यशस्वी प्रयोग त्यांनी सादर केले. त्यांचे प्रयोगशील मन सतत काहीतरी नवीन करण्याच्या उद्योगात असे.

कुमार गंधर्व हे शेवटपर्यंत नवी मुंबई येथील वाशीतल्या पं. विष्णू दिगंबर स्मारक योजनेचे अध्यक्ष होते.[ संदर्भ हवा ]

त्यांचा पुत्र मुकुल शिवपुत्र आणि कन्या कलापिनी कोमकली हे दोघेही हिंदुस्तानी गायक आहेत.[ संदर्भ हवा ]

कुमार गंधर्व: कुमार गंधर्व यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके, पुरस्कार व सन्मान, संदर्भ
कुमार गंधर्व यांच्यावरील पोस्टाचे तिकीट (२०१४)

कुमार गंधर्व यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके

  • आमचे कुमारजी (संपादिका - वसुंधरा कोमकली)[ संदर्भ हवा ]
  • कालजयी कुमार गंधर्व (खंड१ - मराठी, खंड२ - इंग्रजी-हिंदी, संपादन: रेखा इनामदार साने आणि कलापिनी कोमकली)[ संदर्भ हवा ]
  • कुमार गंधर्व: मुककाम वाशी (संकलन आणि संस्करण: मो.वि. भाटवडेकर) : (१२ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर १९९० या काळात कुमार गंधर्वांनी दिलेल्या मुलाखती आणि संगीत मैफिली यांचे शब्दांकन)[ संदर्भ हवा ]
  • तरी एकाकीच: कुमार गंधर्वांसाठी निरोपाची गाणी (कवितासंग्रह, मूळ हिंदी कवी अशोक वाजपेयी, मराठी अनुवाद: चंद्रकांत पाटील)[ संदर्भ हवा ]

पुरस्कार व सन्मान

संदर्भ

बाह्य दुवे


Tags:

कुमार गंधर्व यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तकेकुमार गंधर्व पुरस्कार व सन्मानकुमार गंधर्व संदर्भकुमार गंधर्व बाह्य दुवेकुमार गंधर्वइ.स. १९२४इ.स. १९९२एप्रिल ८जानेवारी १२देवासभारतविकिपीडिया:संदर्भ द्याहिंदुस्तानी शास्त्रीय संगीत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारत सरकार कायदा १९१९पृथ्वीनवग्रह स्तोत्रभारतातील जातिव्यवस्थादौंड विधानसभा मतदारसंघपोवाडारामसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमराठी भाषा गौरव दिनसमुपदेशनधोंडो केशव कर्वेशुद्धलेखनाचे नियमअजित पवारन्यूटनचे गतीचे नियमजत विधानसभा मतदारसंघलोकमान्य टिळकमहादेव जानकररावणत्रिरत्न वंदनानाथ संप्रदायमुखपृष्ठसंग्रहालयमूलद्रव्यनागरी सेवासाम्यवादभारताचे राष्ट्रपतीमानवी विकास निर्देशांकप्रदूषणतिरुपती बालाजीतानाजी मालुसरेवर्धा लोकसभा मतदारसंघमाती प्रदूषणपद्मसिंह बाजीराव पाटीलक्रिकेटमराठी भाषा दिनकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघकाळूबाईसामाजिक कार्यदत्तात्रेयहिरडास्त्रीवादरॉयल चॅलेंजर्स बंगलोरतापी नदीमहाराष्ट्र पोलीसजवाहरलाल नेहरूव्हॉट्सॲपबुलढाणा जिल्हाधनंजय चंद्रचूडखंडोबाभारतीय रिझर्व बँकरक्तगटगोदावरी नदीभोपळाभारताचा स्वातंत्र्यलढाकर्ण (महाभारत)भारत छोडो आंदोलनचंद्रगुप्त मौर्यपानिपतची तिसरी लढाईमहाराष्ट्रातील आदिवासी समाजमराठवाडाउंबरमुंबईप्रज्ञा विवर्धन स्तोत्रअमर्त्य सेनउमरखेड विधानसभा मतदारसंघमानसशास्त्रवसंतराव नाईककांजिण्याअजिंठा-वेरुळची लेणीअश्वत्थामापुरस्कारमराठी साहित्यमिरज विधानसभा मतदारसंघहिमालयडाळिंबहोमी भाभाबाराखडीतिथी🡆 More